थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
Thursday, December 31, 2009
कृपया हे कधीही करू नका :
Always face the ROCKNashik, 30 December 2009 : "आपण निसर्ग यात्री आहोत', "इतिहासाचे आपल्याला ज्ञान आहे', "आपल्या महान संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे', असा समज जर कोणाच्या मनात निर्माण होत असेल तर त्यात काहीही गैर नाही, परंतू याचा गिरीभ्रमणाशी संबंध येतो कुठे? डोंगराचे काही नियम असतात, त्याठिकाणी छोटासा अपघातही परवडण्यासारखा नसतो....
Friday, December 25, 2009
""रान मोकळे मोकळे, बघे भरून नभास त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास''
- कमी पावसामुळे बळीराजा धास्तावलाय, शहरी माणसाला चिंता पाणी वर्षभर पुरेल की नाही याची. या चिंता विसरायच्या तर त्या पावसाच्या, त्या नभाच्या भेटीला जाणेच इष्ट. वरुणराजाने किमान डोंगरांच्या कडेकपारी हिरव्या करून सोडल्यात आणि माणसाला निसर्गाचा समतोल बिघडू देऊ नका, नाही तर तुमचाच तोल बिघडेल, असा इशारा दिला आहे.
त्र्यंबकेश्वरची इतिहासप्रसिद्ध ब्रह्मगिरी प्रदक्षिणा
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, अवघे दोन किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या त्र्यंबकनगरीत इतक्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाची तारांबळ उडते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही साडेतीन लाख भाविकांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे...
.
Nashik, 8 August 2009 :
नाशिकपासून 28 किलोमीटरवर असलेले त्र्यंबकेश्वर कितीतरी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अवघे दोन किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या, तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या इवल्याशा नगरात आध्यात्मिक, ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्रात इतक्या गोष्टी घडून गेल्या आहेत, की त्यांची नोंद ठेवणेदेखील मुश्कील.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर. मूळ गंगा-गोदावरीचे जन्मस्थान. बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा जगप्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरुबंधूंना नाथ संप्रदायाची दीक्षा गहिनीनाथांकडून येथेच प्राप्त झाली. पुढे वारकरी संप्रदायाचा पाया याच ठिकाणी रचला गेला. नाथांनी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आनंदाला येथे वर्षातून दोनदा निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा व उटीच्या वारीच्या निमित्ताने उधाण येते.
गौतम ऋषींनी न्यायशास्त्र या सांख्य दर्शनावरील अलौकिक ग्रंथाची रचना येथे केली. गीतेत कृष्णाने कथन केलेल्या सांख्य दर्शनाचे प्रणेते कपिल महामुनींचा आश्रम या नगराच्या सीमेवर आजही आहे.
इथल्या बोहाड्याने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना चित्रपट निर्मितीची प्रेरणा दिली. अशाप्रकारे त्र्यंबकेश्वर नगरात भारतीय चित्रपटसृष्टीचा श्रीगणेशा झाला. अशा कितीतरी गोष्टी त्र्यंबकनगरीत घडल्या आहेत.
ब्रह्मगिरी पर्वतावरील पाच शिखरे तत्पुरुष-अघोर-इशान-वामदेव-सद्योजात म्हणजे पाच नद्यांचे उगम स्थान. त्यात गोदावरी व वैतरणा या प्रमुख नद्या. या नद्यांचे उगमस्थान तितकेच अद्भुतरम्य. हिरवाईने नटलेले डोंगर, त्यातून वाहणारे असंख्य झरे, धबधबे बघून मन हरखून जाते.
सृष्टीचा हा ठेवा मनात साठविण्यासाठी, निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या भावंडांनी ज्या वाटेवरून शिवशंकराला साद घातली त्या मार्गाची अनुभूती घेण्यासाठी, जेथून गोदेने पृथ्वीवर प्रवेश केला ते ठिकाण बघण्यासाठी या श्रावणातल्या तिसऱ्या रविवारी व सोमवारी लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे.
गेल्या काही वर्षांत प्रदक्षिणेत हुल्लडबाजांचे प्रस्थ माजल्याने प्रदक्षिणेच्या बदलत्या स्वरूपावर अलीकडे टीका होऊ लागली आहे. प्रदक्षिणेच्या काळात भांग, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचा वापर "भोले'चा प्रसाद या नावाखाली वाढल्याने त्याबद्दल टीका होऊ लागली आहे. त्यामुळे काही घरंदाज मंडळी तिसऱ्या सोमवारची गर्दी टाळण्यासाठी श्रावणातील इतर सोमवार निवडू लागले आहेत. त्यामुळेच म्हणून की काय दुसऱ्या सोमवारी दीड ते पावणेदोन लाख भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. तरीही तिसऱ्या रविवारी अडीच ते तीन लाख भाविकांच्या उपस्थितीचा प्रशासनाचा अंदाज आहे.
20 मैल प्रदक्षिणेबरोबरच 40 मैलाच्या प्रदक्षिणेला मोठी गर्दी लोटण्याची शक्यता असून, प्रशासनाने भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रदक्षिणा करण्याचे आवाहन केले आहे. खासगी वाहने नेण्यास बंदी करण्यात आली असून, तळवाडे, तळेगाव, अंबोली, पहिने बारी येथे पार्किंगची खास सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणाहून "एसटी'च्या विशेष फेऱ्या भाविकांची ने-आण करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. सिंहस्थाच्या धर्तीवर छोटेखानी व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन करू नये. महिला, मुले व वृद्धांना धक्काबुक्की होणार नाही, प्रवासात त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्र्यंबकेश्वरमधील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
अनेक भाविक रविवारी रात्री प्रदक्षिणेला सुरवात करतात. त्यामुळे वाटेत आदिवासी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अनेक जण काटेरी कुंपण तोडून अंधारात भरकटतात. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. काही मंडळांतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते; परंतु प्लास्टिकचे द्रोण, ग्लास व पाण्याच्या बाटल्यांचे खच इतस्तत: पसरून प्रदूषण वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन निसर्गप्रेमींतर्फे करण्यात आले आहे.
Wednesday, December 2, 2009
4 हजार कर्कश हॉर्न
कांडुन नष्ट करण्याचा निर्धार
Nashik, 2 Dec : परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण विभाग यांनी शांतता नाशिकसाठी कर्कश वाजणारे 4 हजार हॉर्न जप्त केली असून ते सर्व हॉर्न उद्या ( ता. 3) जेसीबीच्या साहाय्याने कांडुन नष्ट करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी पोलिस आयुक्त व्ही.डी. मिश्रा प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला, लाच प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरीश बैजल उपस्थित राहणार आहे.
नाशिक शहर ध्वनी प्रदूषण मुक्त शहर अभियानाच्या त्यानिमित्ताने आज पर्यंत जप्त केले कर्कश हॉर्न सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बार या दरम्यान ध्वनी प्रदूषण न करण्याची शपथ दिली जाणार आहे. चार हजार कर्कश , मल्टीटोन, प्रेशर हॉर्न्स जेसीबीच्या सहायकाने नष्ट केले जाणार आहेत. गोल्फ क्लब येथील इदगाह मैदानावर चारशे वाहन चालक व दीडशे बसेसच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. भारतात प्रथमच असा कार्यक्रम होत आहे.
नाशिक शहरात गेल्या 12 ऑगष्टला पोलिस आयुक्त व्हीडी मिश्रा यांनी अधिसूचना काढून 19 ठिकाणी सायलेन्स झोन जाहीर केले आहेत. प्रेशर हॉर्नद्वारे ध्वनी प्रदूषण करताना आढळल्यास दोषी चालकास एक लाख रुपये दंड व पाच वर्ष शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. आज पर्यंत आरटीओ कार्यालयाने 951 जणांवर कारवाई करून आठ लाख 47 हजार रुपये दंड केला आहे.
Friday, November 20, 2009
"हरित लवाद'
Fri, 20 Nov
New Delhi, ः पर्यावरणविषयक तंटे मिटविण्यासाठी "हरित लवाद' स्थापन करण्याविषयीचे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
"द नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल बिल, 2009' या नावाने हे विधेयक जुलैमध्येच संसदेच्या पटलावर ठेवण्यात आले असून, ते संमत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. संबंधित लवादाला मुलकी न्यायालयाचे अधिकार देण्याचा प्रस्ताव असून, वनांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हेतू यामागे आहे.

Saturday, September 19, 2009
Catapult Menace claims Rare Birds in Nashik
Nashik, 19 Sept. 09 : बोरगड येथील वन खात्याच्या संवर्धन राखीव वनात घुसून गलोरच्या सहाय्यने दुर्मिळ पक्ष्यांची हत्या करणाऱ्या दोघांना वन खात्याच्या अधीकाऱ्यांनी पकडले असुन त्यांना न्यायालयाने 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बोरगड येथील संरक्षक वनात जंगल रेन बॉबलर, टेलर बर्ड, बुलबुल या सारख्या वन्य पक्षी विहार करीत असतात. या पक्षावर गुजरात मधील घाटवडी येथील राजू सोनु कोगील, लगीन राजीराम धापड या शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली त्यांना गलोरच्या सहाय्यने तेरा पक्षाची निर्घुन हत्या केली. परीसरातील नागरीकांनी पकडुन त्यांनी वन अधीकारी डी.सी. चौधरी, के.एम अहिरे यांच्या ताब्यात दिले. त्यांना आज न्यायालयात उभे केले असता देन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली त्यांचे दोन साथीदार पळून गेले असून त्यांच्या शोधासाठी एक पथक गुजरातला जात आहे. या गुन्हयात आरोपीला सहा वर्ष शिक्षा होऊ शकते. गलोरच्या सहाय्याने होणाऱ्या पक्षी हत्येचा गुन्हा प्रथमच दाखल झाला आहे.
Thursday, May 28, 2009
Tuesday, March 31, 2009
... अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागेल
भेदरलेले विद्यार्थी : ... अन् स्थानिक यंत्रणेचा "क्विक रिस्पॉन्स'?
प्रशांत परदेशी ः
नाशिक, ता. 20 : मुंबईतील "26/11'सारखी एखादी दहशतीची घटना नाशिकमध्ये घडली, तर संरक्षण यंत्रणा कितव्या मिनिटाला प्रतिसाद देतील, हे माहीत नाही. परंतु, मधुमक्षिकासारखा एखादा जैविक हल्ला झाला तर? एक तास, दोन तास, तीन तास...? पंचवटीतल्या एका शाळेचा अनुभव विचाराल, तर याचे उत्तर आठ तास किंवा कदाचित प्रतिसादच नाही! असे देता येऊ शकेल.
आज सकाळी पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणातील बाबूभाई कापडिया प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे शाळेची लगबग सुरू होती. प्राथमिकचे वर्ग सकाळी आठला सुरू होतात, त्यामुळे विद्यार्थी व त्यांना सोडण्यासाठी येणारे पालक अशी वर्दळ साडेसातपासून सुरू होती. पावणेआठ- आठपर्यंत पाचशेच्या आसपास विद्यार्थी व सुमारे पंचवीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबून होते. शाळेत कुणालाही जाऊ दिले जात नव्हते. दाराजवळच विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ढीग जमा झाले होते. मधमाश्यांचे मोहोळ उठल्याची चर्चा एव्हाना सर्वत्र पसरली होती. काही पालकांनी आणीबाणीच्या प्रसंगी आठवणारा 100 क्रमांक फिरवून पाहिला; परंतु अग्निशामक दलाकडून "मधमाश्यांचे नियंत्रण आमच्याकडे नाही,' असे सांगण्यात आले.
तोपर्यंत प्रवेशद्वारासमोरच्या झाडाखाली बसलेल्या मुलांवर मधमाश्या चाल करू लागल्या. चार- पाच मुलांना त्यांनी चावे घेतल्याने मुलांमध्ये एकच हल्लाकल्लोळ माजला. विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या शिक्षकांवर मधमाश्यांचा हल्ला बिनदिक्कत सुरू होता. एखाद- दुसरी माशी असती तर एका क्षणात तिच्यावर नियंत्रण मिळविता आले असते. परंतु, त्यांच्या समूहाची माहिती मिळाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काही पालकांनी एखाद्या पत्रकाराच्या मदतीने सरकारी यंत्रणेची मदत मिळविता येते का, याचा तपास सुरू केला. दोन पत्रकारांना दूरध्वनी करून तातडीने सरकारी यंत्रणेकडून मदत मिळविण्याची याचना करण्यात आली. या पत्रकारांनी लागलीच माहिती घेऊन पेस्ट कंट्रोल विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. परंतु, एवढ्या सकाळी दूरध्वनी खणखणतच राहतील, प्रतिसाद मिळणार नाही, हे ठाऊक होते. कोणीतरी सर्प पकडणाऱ्या सर्पमित्र वा बिबट्यावर नियंत्रण मिळविणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा क्रमांक फिरवून त्यांना घटनेची कल्पना दिली. परंतु, याठिकाणीही निराशाच! मधमाश्या वन्यजीव असल्या, तरी त्या आमच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत व आमच्याकडे तशी यंत्रणा नाही, अशा उत्तरासह संभाषणही तिथेच संपले.
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने पेस्ट कंट्रोल विभागाला माहिती कळविल्याचे सांगितले. त्यामुळे पालक व शिक्षकांच्या जीवात जीव आला. परंतु, एक तास उलटला, दोन तास उलटले, तीन तास उलटले, तरी पेस्ट कंट्रोलकडून कुणीही येईना. तोपर्यंत सर्वच्या सर्व पाचशे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानातील एका झाडाखाली बसविण्यात आले. मुलांनी या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांच्या खुल्या वातावरणातील शिक्षणाचा वह्या-पुस्तकांविनाच आनंद लुटला.
मुलांना शाळेत सोडल्यानंतर पालक निर्धास्त मनाने घरी परततात, त्यामुळे वर्गाविना या मुलांना दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी, नव्हे विवंचना शिक्षकवृंदास भेडसावू लागली. डोक्यावर तो भास्कर मिनिटागणिक आग ओकतच होता. तोपर्यंत पाच ते सात विद्यार्थ्यांना व तीन शिक्षकांना मधमाश्यांनी दंश केला होता.
""शाळेत मोकळी जागा भरपूर असल्याने विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आता शनिवार व रविवारच्या सुटीच्या दिवशी या मधमाश्या नेमक्या कुठून उठल्या, याचा तपास करून पेठ नाक्यावरील कोकणी मजुरांच्या मदतीने पोळी काढली जातील'', अशी माहिती मुख्याद्यापिका नंदा गाला यांनी दिली.

Monday, January 19, 2009
Vasota fortress :
In the midst of thick forest of the Koyna tiger reserve, fort Vasota is a treat to visit…
capital of Matatha kingdom
January has been really breath taking, after Dhodap fort, we successfully trek the Vasota fortress, capital of Matatha kingdom after chatrapati Shivaji Maharaj. I think, no trekker is complete unless and until he visit Vasota. The hill of lord Nageshwar is a bonus. The descent is so steep that with all the loaded sack it can really tire you. The humidity of Konkan really added to our woes.
Yeola Kite : at Durpan Stores
Kite local speciality…
This Year I could enjoy kite flying after a gap of some four to five years. This time around Nashik witness record number of kites. The city sky was filled with numerous kites. I and my dear wife created biggest kite of Nashik, in our local Yeola style. It was really hugh, and we prepared three lagre one's.
Subscribe to:
Posts (Atom)
-
राजाची वाट त्र्यंबकेश्वरच्या जंगलात, 'घोड्याची वाट', म्हणून एक जुना घाट मार्ग आहे. १ जानेवारी १६६४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सु...
-
एका अल्पाईन ट्रिपची गोष्ट रतनवाडी...सांदण दरी...कोकणकडा हा ट्रेक नव्हता...ती होती निव्वळ सहल. एक दिवसाचा एन्जॉय! कमीत कमी खर...
-
नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिड...