हरिहर शिलालेख
तो भीषण आहे.तो रौद्र आहे.तो सुंदर आहे.तो कधी कुणा
समोर व्यक्त होत
नाही. प्रयत्न केला
तरी तो ताकास
तुर लागु देत
नाही. यामुळेच त्र्यंबकेश्वर
रांगेतला हरीहर कील्ला इतीहासातली
एक गुढरम्य कथा
बनला आहे. आज
मात्र तो थोडा
मेहेरबान झाला. त्याच्या जुन्या
शीलालेखाचे गुपीत उलगडले
आणी हरीहराच्या इतीहासातले
एक मानाचे पान
नजरेस पडले.
हरीहरचा शीलालेख म्हणजे, इतीहासाच्या
पुस्तकातले एक खुले
पान. उन वारा
पाऊस सोसत तो
आव्हान देत होता,‘माझ्या अंतरंगात या...कील्ला डोळे भरुन
पाहा...लेखातल्या अक्षराची कुट
भाषा जाणा’. आपण
मात्र त्याला शेंदुर
फासुन अत्यंत मोलाची
माहीती झाकोळुन टाकत होतो.गेली अनेक वर्षे
शेंदराचा थरावर थर साठत
होते. कोणा भल्या
माणसाला हे थर
काढण्याची बुद्धी झाली. त्याने
त्याच्या परीने. तो काढण्याचा
प्रयत्न केला. पण मग
कोणी तरी त्यास
चक्क ओईलपेंटने रंगवले.पीढी दर पीढी
या शीलालेखाची अक्षरे
झीजु लागली. त्यातील
काही तर क्षतीग्रस्त
झाली.
मागच्या पंधरवड्यात म्हणजे २०२०
सालच्या मार्च महीन्याच्या पहील्या
सप्ताहात त्र्यंबकेश्वर मंदीरातील दोन क्षतीग्रस्त
संस्कृत शीलालेखांचे वाचन जुन्या
ग्रंथातुन शोधुन त्यांचे मराठीत
भाषांतर करण्यात त्रींबकचे राजेश दीक्षीत यांना यश आले होते. त्याने
हुरुप वाढला होता.आता हरीहर कील्ल्याच्या
शीलालेखाची माहीती मीळवावी असे
मनात आले. त्यावरुन,या शीलालेखाचे वाचन
कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहे,याचा शोध सुरु
झाला. सर्वात प्रथम
मुंबईचे प्रसीद्ध ब्लॉगर तथा
सतीशीळा, वीरगळ, गद्देगळाचे अभ्यासक
पंकज समेळ यांच्या
महाराष्ट्र देशा या
ब्लॉगमध्ये, हरीहर शीलालेख भागश:वाचायला मीळाला. पुण्यातील संशोधक
महेश तेंडुलकर यांनी,मराठी - संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात
या ६८८ पानी
पुस्तकात या शीलालेखाचे,त्यांना जेवढे शब्द वाचता
आले तीतकेच त्यांनीनमुद केले होते.
|
हरीहर पुष्कर्णी
|
हरीहर कील्ल्याच्या उत्तर माचीवर भल्या
मोठ्या पुष्कर्णीवरचा हा शीलालेख
फार अगोदर पासुन
बघण्याचा योग यायचा
तो श्रावणातल्या ४०
मैल अंतराच्या ब्रम्हगीरी-हरीहर प्रदक्षीणेच्या नीमीत्ताने. आमची जुने
नासीक भागातली मंडळी
ही प्रदक्षीणा नीत्य
नीयमाने करत असु.अनेक वर्षे हा
खटाटोप चालला. जुन्या काळात
कोणी तरी दगडात
कोरलेली काही अक्षरे
इतकेच आमच्या ठायी
त्याचे महत्व होते. सुबक
दगडात घडवीलेल्या या
पुष्कर्णीवर गणपतीचे एक पुर्वाभीमुख
शील्प कारले आहे.त्यावरुन त्यास गणेश कुंड
संबोधले जायचे. त्रींबकची मंडळी यास हरीहरवरचे कुशावर्त संबोधत. त्र्यंबकेश्वर
पासुन पावसात भीजत,इथवर अनवाणी चालत
आल्यानंत या पुष्कर्णीत
पोहण्याची फार मजा
यायची. सगळा शीण
नीघुन जायचा. शेंदुर
फासल्यामुळे शीलालेखावरची अक्षरे स्पष्टपणे वाचता
येत नसायची. ती
काळजीपुर्वक वाचण्याचा कधी प्रयत्न
केला नव्हता.
|
शीलालेखाचे वाचन करतानाराजेश दीक्षीत
|
घरात पीढीजात संस्कृत अध्ययनाची.परंपरा. आजोबांकडुन शीकलेले ज्योतीष
व गणीत. त्र्यंबकेश्वर
परीसराच्या इतीहसाबद्दलची आस्था. धार्मीक व
ऐतीहासीक वीषयांवरील पुस्तके, लेख,चर्चासत्र आदींत नीयमीत सहभाग
या गोष्टींमुळे मीत्रवर्य
राजेश दीक्षीतने हरीहर शीलालेख वाचनाचे
शीवधनुष्य पेलण्याची तयारी दर्शवीली.शीलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक
स्पष्ट झाला होता.छायाचीत्रातुन मात्र तो स्पष्ट
होत नव्हता. मग
प्रत्यक्षात शीलालेख बघण्याची छोटेखानी
मोहीम हाती घेतली.लागोलाग हरीहर कील्ल्याला भेट
दीली. वरच्या भागात
इतीहासाचा अभ्यास करण्याजागे काय
काय सापडते याचा
आढावा घेतला. परतताना
उशीर झाला. सुर्य
मावळतीला गेल्याने पुरेशा उजेडात
शीलालेखाचे अवलोकन करण्याची पुरेशीसंधी मीळु शकली नाही.मग दोन दीवसांनी
फक्त शीलालेख बघण्याचा
बेत आखला. काही
अक्षरे अजीबत लागत नव्हती.काही अक्षरे ओईल
पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली
तर उजव्या बाजुची
काही क्षतीग्रस्त झाल्याचे
जाणवले. शीलालेख कुंडातल्या पाण्याने
स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची
बाजु कोळशाने गीरवीली.त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास
मदत झाली. मग
त्याची छायाचीत्रे घेतली. नंतर
शीलालेख चुलीतल्या राखेने धुवुन
ओल्या वीटेच्या रंगाने
अक्षरे गीरवुन पाहीली. ही
छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली.अगोदर वाचन करताना
अडचण जाणवणारी अक्षरे
हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न
केला. त्याची टीपणे
तयार केली.
|
देखणी अक्षरे व सुंदरनक्षीचा हरीहर शीलालेख
|
घरी परतल्यानंतर छायाचीत्रांचे आवलोकन
केले तेव्हा शक,संवत्सर वाचता आले. दुसऱ्या
ओळीतली श्री गणेशायनम:हे अक्षर पटकन
वाचता येते. अभ्यासकांनी
ते वाचले आहे.त्यापुढची चार अक्षरे
लागत नव्हती. पाचव्या
ओळीत शेवटच्या भागात
पनामा हा शब्द
वाचता येत होता.हा पनामा काय
असेल याचा बोध
होत नव्हता. सहाव्या
ओळीत हरीहर वीलसद्देवता
ही अक्षरे लागतात,पण शेवटचे अक्षर
लागत नव्हते. त्या
खालचे अक्षरही लागत
नव्हते. शंकरात्म सुत श्रीमन्नारायण
ही अक्षरे स्पष्टपणे
वाचता आली. शक
संवत्सर कळाले होते, त्यावरुन
शंकराचा मुलगा नारायण...नारायण
शंकर...या शब्दावरुन
सरदार नारोशंकर यांच्याकडे
संकेत जात होते.
नाशीकचे नारोशंकर मंदीर प्रसीद्ध
आहे. मालेगावचा राजेबहाद्दुरांचा
कील्ला प्रसीद्ध आहे. आता
नारोशंकर यांच्या बद्दलची माहीती
जाणुन घेण्याची जीज्ञासा
नीर्माण झाली. सुदैवाने राजेशचा
स्वत:चा पुस्तकांचा
मोठा संग्रह आहे.या कामी त्याचा मोठा उपयोग झाला. पेशवाईतला
हा अव्वल दर्जाचा
सरदार होता. यांचे
उल्लेख ठीकठीकाणी वाचायला मीळाले.पेशवे घराण्याचा इतीहास- लेखक प्रमोद ओक, पेशव्यांची
बखर - संपादक काशीनाथ
नारायण साने, बखर संस्थानची- सुनीत पोतनीस, मराठ्यांचा इतीहास- संपादक अ. रा.कुलकर्णी - ग. ह.खरे, सातारचे श्रीमंत
छत्रपती शीवाजी महाराज यांचे
वंशज व प्रतीनीधी
आणी अष्टप्रधान यांचा
इतीहास - वीष्णु गोपाळ भीडे,दक्षीणेतील सरदारांच्या कैफीयती - पुरुषोत्तम
वीश्राम मावजी व डी.बी. पारसनीस अशा
काही पुस्तकातुन नारोशंकर
यांचे अनेक उल्लेख
वाचायला मीळाले. एका सरदार
घराण्याकडुन, राजेबहाद्दर हे मुळचे
सासवडचे दाणी असल्याची
महत्वपुर्ण माहीती मीळाली. त्यामुळे
पनामा शब्दाला जोडुन
असेले अक्षर दाण्युपनामा
असल्याचा उलगडा झाला.
|
उठावाची अक्षरे
|
एकीकडे राजेशची एक एक
अक्षराची संगती लावण्याचा प्रयत्न
सुरु असताना. हरीहर
कील्ल्याची माहीती घेण्यासाठी पुस्तके,ब्लॉग्ज धुंडाळण्याची लगबग सुरु
झाली. महत्वाच्या ऐतीहासीक
ग्रंथात हरीहरवर दहा पाच
ओळींचे परीच्छेद शोधणे म्हणजे
दुरापास्त गोष्ट. आज हरीहर
कील्ल्याचे राकट रुप
बघीते की प्रश्नांचा
कोंडावळा उठतो: हरीहर कील्ला
कोणी बांधला ? ‘त्याच्या
भीषण कड्याला अमुर्त
पायऱ्या बांधल्या जाऊ शकतात’,असे अचाट स्वप्न
कोणी रंगवले आणी
मग ते प्रत्यक्षात
साकार केले? ते
कोण बेलदार होते
जे एखाद्या योद्द्या
प्रमाणे कड्याला लटकुन शेकडो
टनाचा दगड फोडत
राहीले ? एखाद्या डोंगराला इतक्या
सुंदर पायऱ्या घडवील्या
तरी जाऊ शकतात
का ? हा समज
सत्यात उतरवीणारी ती राजवट
होती कोणाची ?
हरीहर म्हटले की त्याचा ब्रम्हगीरीशी येणारा संबंध अटळ आहे. या दोन्ही कील्ल्यात
अनेक बाबतीत साम्य
आहे. दोन्हीही डोंगर
बेलाग. त्यावर प्राचीन काळात
बलदंड आणी देखण्या
स्वरुपाचे कातळ कोरीव
बांधकाम करुन अजोड
कील्ले बांधण्यात आले. दोन्ही
कील्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत.पौराणीक साहीत्यानुसार त्रींबक हे त्रीसंध्या
क्षेत्र होते. जगात काहीच
नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी
वीष्णु यांनी सृष्टीच्या आदी
आणी अंताचे कारण
शोधण्याचा प्रयत्न केला. ब्रम्हाने
आदीचा म्हणजे मस्तकाचा
शोध घेतला तर
वीष्णुने अंताचा म्हणजे पायाचा.पुर्ण रुपाचे ज्ञान
मात्र दोघांनाही झाले
नाही. आपणच नीर्माण
केलेल्या सृष्टीचा शोध न
लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला.त्याने गायीची साक्ष ठेवुन
खोटेच सांगीतले, त्याला
मस्तक सापडले. त्यावर
केतकीचे फुल होते.या खोटेपणाचा राग
येऊन भगवान शंकरांनी,तु पृथ्वीवर अपुज्य
होशील असा शाप
दीला. ब्रम्हदेवानेही रागाने,तु पर्वत होशील
असा शाप दीला.तोच ब्रम्हगीरी पर्वत
प्रत्यक्ष शीवशंकर डोंगर बनुन
पृथ्वीवर स्थापीत झाला. ब्रम्हाला
दीलेला शाप त्यांच्या
भोळ्या रुपास बघवला नाही
व त्यांने, हा
पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन
ओळखला जाईल असा वर दीला, अशी ही
पद्मपुराणातील कथा. या
कथेनुसार वीष्णु हरीहर रुपात
डोंगर बनुन प्रकटले,तर इंद्र अंजनेरी
पर्वताच्या रुपाने. त्यांच्या जोडीला
आसपास वेगवेगळे पर्वत
देवी देवताच्या रुपाने
प्रकटले.
|
हरीहराचे सोपान - सह्याद्रीचेदीव्य स्वप्न
|
वीज्ञानाच्या
अंगाने या कथेची
जोड पृथ्वीवर सह्याद्रीची
डोंगररांग नीर्माण झाली त्याच्याशी
जोडली जाऊ शकते.शास्त्रज्ञांनी या डोंगरांगेचा
काळ साडे तीन
कोटी वर्षांपुर्वीचा नीश्चीत
केला आहे. ७०
टक्के पाणी व
३० टक्के भुभाग
असे स्वरुप असलेल्या
पृथ्वीवर सगळी जमीन
ही अस्थीर म्हणजे
तरंगती आहे व
या जमीनीचा प्रवास
अखंडपणे सुरु आहे. साडे सात
कोटी वर्षांपुर्वी ओस्ट्रेलीया
खंड हा युरेशीया कडे तरंगत
तरंगत एकमेकांच्या जवळ
कुर्मगतीने सरकत राहीले
गोंडवाना काळात ते एकमेकांना
भीडले. या महाटक्करीतुन
पृथ्वीच्या गाभ्यात असलेला तप्त
अग्नीरस जमीनीचे बंध झुगारुन
उफाळुन आला. त्यातुन
पृथ्वीवरची सगळ्यात जुनी डोंगररांग
सह्याद्रीच्या रुपाने नीर्माण झाली.स्कंद पुराणाच्या सह्याद्री
खंडा नुसार सह्याद्री
डोंगररांगेचे उत्पत्ती स्थान ब्रम्हगीरी
पर्वत आहे. पुराणांच्या
रचनकारांना याचे ज्ञान
कसे झाले असावे
हे देखील एक
कोडेच आहे. कदाचीत
अग्नीरस त्रीसध्या क्षेत्रातुन म्हणजे
त्रींबक परीसरातुन उद्दीप्त झाला
असावा. तीथुन तो दक्षीणोत्तर
पसरला. काळांतराने थंड झाल्यानंतर
त्यावर जीवसृष्टी अवतरली ही
मांडणी वैज्ञानीकांनी करुन ठेवली
आहेच.
अग्नीयुग संपुन पृथ्वी थंड
झाली तसे डोंगरांवरुन
नद्या जन्मल्या. त्या
सोबत वृक्ष, वेली,द्रुम नीर्माण झाले.वीवीध जीव नीर्माण
झाले, ही कथा
वीज्ञान व पुराणांनी
आपापल्या परीने कथन केली
आहे. आपले भरण
पोषण करणाऱ्या सृष्टीची
आराधना करण्यासाठी हे डोंगर
देवस्वरुप, म्हणुन पुर्वीच्या लोकांनी
त्यांचे पुजन केले.मानववंश प्रगती पथावर असताना
कालांतराने यातील काही डोंगरांचा
वापर राजशकट हाकण्यासाठी
महसुल जमा करण्याचे केंद्र व
संरक्षण केंद्र म्हणुन झाला.नेमके कोणत्या काळात
ही नीर्मीती झाली
याचा शोध इतीहासकारांना
लावता आलेला नाही.त्यावरील बांधकामांवरुन त्यांच्या प्राचीनत्वाचे अनुमान
काढले गेले.
त्रींबकचा परीसर हा पुर्वपार
उपजाऊ. येथुन मोठा महसुल
गोळा होत असे.सर्व जुन्या राजवटीचे
येथे अस्तीत्व होते.याचे दाखले जुन्या
साहीत्यातुन तसेच गडांवरच्या
बंधकामांच्या अवशेषांवरुन अभ्यासकांनी मांडले
आहेत. त्र्यंबकेश्वर व
हरीहर हे दोन्ही
कील्ले शब्दश: बेलाग. त्यावरील
यादव काळाच्या खुणांकडे
अभ्यासक नीर्देश करतात. तर
काहींच्या मते त्या
अगोदरच्या राजवटींचे त्यावर अस्तीत्व
असावे.
|
हरीहर कील्ल्याची थरारकवाट
|
शतक तेरावे
तेराव्या शतकत देवगीरीच्या
यादवांचा त्रींबकगड व परीसरावर
अंमल होता. इसवीसन
१२९४ मध्ये अल्लाउद्दीन
खीलजीने देवगीरीच्या यादवांचा पाडाव
करताच मुसलमानी राजवटींने
या परीसरात आपले
हातपाय पसरायला सुरुवात केली.१३४७च्या सुमारास दक्षीणेत बहामनी
राज्य नीर्माण झाले;१४००च्या सुमारास त्याची शकले
होऊन दक्षीणेत पाच
मुसलमान शाह्या नीर्माण झाल्या.इसवीसन १५५३ला त्रींबकची लीखीत
नोंद आढळते. नीझामशाहाने
३० डीसेंबर १५५३
मध्ये तो ताब्यात
घेतला. त्यावेळची ५८ कील्ल्यांची
यादी सैय्यद अली
तबातबा हा त्याच्या
बुऱ्हाने मासीर या फार्सी
ग्रंथात करतो.
१५६५ च्या तालीकोटच्या
लढाईत वीजयनगरचे वैभवशाली
राज्य लयास गेले
आणी दक्षीण भारताला
एकप्रकारचा सांस्कृतीक धक्का बसला.मुसलमानी राजवटीची राळ उठताना
त्रींबक परीासरातले सत्ताधीश इथले
मुळ नीवासी हींदु
महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार
केला पण तो
शेवट पर्यंत टीकु
शकला नाही.
शहाजींची १६३६ला सोडचीठ्ठी
दक्षीणेत मुघलांचा प्रवेश तब्बल
चाळीस वर्षे रोखला
गेला तो मलीक
अंबरच्या कडव्या प्रतीकारामुळे. यात
मलीक अंबरला बहुतांशी
काळ ‘स्वराज्य संकल्पक’शहाजी महाराजांची मोलाची
साथ होती. मुघलांसारखी
प्रबळ सत्ता दक्षीणेत
आली तर हींद्वी
स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु
शकते यासाठी शहाजींनी
मुघलांच्या वीरोधात खटाटोप केला.शहाजी महाराजांनी क्षीण
होत चाललेली अहमदनगरची
नीझामशाही वाचवीण्याचा अटोकाट प्रयत्न
केला. मलीक अंबरच्या
मृत्युपश्चात नीझामशाहीत मोठी अंधाधुंदी
माजली. नीझामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी
महाराजांनी ९ वर्षांच्या
मुर्तझा नीझामला पेमगीरी कील्ल्यावर
नेऊन गादीवर बसवीले.त्यांनी अनेक मुसलमान
सरदारांकडे नीझामशाही वाचवीण्यासाठी याचना
केली, पण त्यांना
हवी तशी साथ
मीळाली नाही. इकडे मुघलाच्या
आक्रमणाचा धोका भेडसावत
होता. शेवटी त्यांनी
गुप्तपणे राजधानी माहुली कील्ल्यावर
हलवली. त्यांच्या हालचालीचा सुगाव
लागल्याने मुघल व
आदीलशाहा यांनी शाहजींचे व
त्यांच्या सोबतच नीझामशाहीचे पारीपत्य
केले.
हा संघर्ष शहाजींनी शरणागती
पत्कारल्यानंतर संपुष्टात आला. शहाजी
राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे
सुपुर्द केले. त्याच बरोबर
त्यांच्या ताब्यातील नीझामशाही प्रदेश
देऊन टाकला. त्यात
त्रींबकगड व हरीहरगडाचाही
समावेश होता. इसवीसन १६३६ची
ही हरीहरची नोंद
अत्यंत महत्वाची. त्यानंतर या
दोन्ही गडांवर फार अल्पकाळ
हींदुंचा अंमलाखाली राहीला.
|
हरीहर - कर्मकठीण
|
मोरोपंत गड घेतात...
शीवाजी महाराजानी स्वराज्याची भरपाई
करण्यासाठी सुरतेची दुसऱ्यांदा लुट
केली. लुट घेऊन
परतत असताना १७
ओक्टोबर १६७०ला दींडोरी येथे
लढाई झाली. त्याच
सुमारास मोरोपंत पींगळे यांनी
त्रींबकगड घेतला. देवगीरीच्या यादवांनंतर
शहाजी आणी त्यानंतर
मोरोपंत पींगळें असा हा
मोठा कालखंड. शीवाजी
महाराजांनी या गडाचे
नाव बदलुन श्रीगड
ठेवले अशी नोंद
सभासद बखरीत आढळते.इतीहासात युद्ध करुन त्रींबकगड
घेतल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ,त्यातलेच हे एक.त्रींबकगड पडल्यानंतर हरीहर, भास्करगड,अंजनेरी गडाचे काय झाले
याचा मात्र कोणताच
उल्लेख सापडत नाही.
एकदा ताब्यात आल्यानंतर त्रींबकगड
कीमान दहा वर्षे
तरी मराठ्यांकडे राहीला.शीवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत:दक्षीणेत उतरला. त्याने आदीलशाही
व नीझमशाहीचा घास
गीळला. मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार
होत राहीला. १६८२
मध्ये अंकाईचा कील्ला
मसलत करुन मीळाल्यानंतर
औरंगजेबने रामसेज या नाशीक
जवळच्या लहानशा कील्ल्याच्या रुपाने
दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा
प्रयत्न केला. हे द्वार
त्याला दीर्घ काळ उघडता
आले नाही. असे
म्हणतात की, हा
संघर्ष दीड कींवा
तीन वर्षे तरी
चालला असावा. रामसेज
युद्धाच्या वेळेस त्रींबकगडालाही मुघलांचा
वेढा पडला. पण
त्रींबकगड काही त्यांच्या
ताब्यात आला नाही.याच कालावधीत हरीहरचा
कील्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा.
त्रींबकगडावरुन
रामसेजकडे मराठ्यांना पोहोचणारी रसद
मुघलांनी रोखुन धरली. युद्दात
यश येत नाही
असे पाहुन औरंगजेबने
फंदफीतुरीने गड घेण्याचा
प्रयत्न केला. ते सगळे
प्रयत्न वीफल ठरत
होते. १६८३ मध्ये
संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या
राघो खोरा (खोपडा)हा मुघलांना जाऊन
मीळाला. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास
वश करुन गड
मीळवुन देतो असे
आश्वासन बादशाह औरंगजेबला दीले,त्याने ते मंजुर
करुन त्यास ७००
जात व २००
स्वार अशी मनसब
दीली. त्याने त्रींबकगडाच्या
कील्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन
दीले. कील्लेदाराने त्याची
खरडपट्टी काढुन त्यास परत
पाठवीले. त्यामुळे राघो खोरा
पळुन गेला. त्याच्या
मार्फत मध्यस्ती करणाऱ्या जमनाजी
नावाच्या माणसाला मुघलांनी अटक
केली. आपला राघो
खोराशी काहीच संबंध नाही
हे वारंवार पटवुन
दील्यानंतर जमनाजीची सुटका झाली
व त्याची मनसब
कायम ठेवण्यात आली.
|
हरीहर तीर्थाच्या शेजारीअसलेले छोटे कुंड
|
त्रींबकगड औरंगजेबच्या दृष्टीने प्रतीष्ठेचा
प्रश्न बनला. त्याने नासीक
उर्फ गुलशनाबादचा ठाणेदार
मातबरखान यास त्र्यंबकगड
घेण्यास पाठवीले. त्याने सहा
महीने वेढा घातला.गडावर रसदेचा एक
दाणाही जाऊ दीला
नाही. गडाची शीबंदी
हवालदीली झाली. अखेर १६८४
मध्ये कील्लेदार शीवाजी
तेलंगराव व शामराज
हे गडावरुन उतरुन
खाली आले. त्यांना
मुघलाईत मनसबी मीळाल्या. दहावर्षे
शीवशाहीत राहीलेला गड मराठ्यांच्या
हातुन पुन्हा गेला.येणे प्रमाणे हा टकोरबंद
गड जाताच परीसरातले
इतर गड मुगलांच्या
ताब्यात गेले.
मुघलांकडे आता मराठ्यांचे
लहानसे राज्य सोडुन अवघा
हींदुस्तान ताब्यात होता. खुद्द
बादशाह दक्षीणेत तळ ठोकुन
होता. कुतुबशाही व
आदीलशाही बुडवुन त्याचा मराठी
मुलुख घेण्याचा नीकराचा
प्रयत्न सुरु होते.एक गड, एक
मुलुख घेत मुघल
फौजा पुढे जात
व त्या माघारी
मराठे पुन्हा तो
जींकुन घेत. १६८९च्या
फेब्रुवारी महीन्यात संभाजी महाराजांची
औरंगजेबने क्रुरपणे हत्या केली.त्यानंतर त्याला मराठ्यांचा लढा
संपला असे वाटले.पण त्याचे स्वप्न
शेवट पर्यंत पुर्ण
होऊ शकले नाही.मराठेशाही खीळखीळी झाली तरी
राजाराम महाराज आणी त्यांच्या
पश्चात ताराबाईंनी पुढे हा
लढा चालु ठेवला.शेवटी १७०७ साली
वयाच्या ८९व्या वर्षी तो
मरण पावला.
औरंगजेबच्या
मृत्युनंतर भारतीय राजकारणातले चीत्र
वेगाने बदलत गेले.संभाजी पुत्र शाहु मुघलांच्या
कैदेतुन सुटले. महाराष्ट्रात येताच
त्यांनी राज्याची सुत्रे हाती
घेतली. अनेक नामांकीत
सरदारा मंडळी त्यांनी गोळा
केली. बाळाजी वीश्वानाथ
पेशवा आणी मग
त्या पाठोपाठ पहीला
बाजारीव यांच्या नेतृत्वाखाली रणमैदानात
मराठेशाहीचा वारु चौखुर
उधळला. त्याने मुघलांच्या इतकाचअटक ते कटक असा वीशाल प्रदेश
काबीज केला. दील्लीच्या
सुलतानास त्यांनी अंकीत केले.त्रींबक परीसरातुन चौथाई वसुलीचे
अधीकार पेशव्यांकडे होते. त्रींबकगड
मात्र अजुनही मुघलांच्या
वतीने हैदराबादच्या नीझामाकडे
होता. त्र्यंबकेश्वर येथील
इनामदार जोगळेकर यांच्या बखरीतील
हकीगतीत पेशव्यांनी त्रींबकगड कशा
प्रकारे काबीज केला याचे
वर्णन आहे. १७५१च्या
सुमारास नीझामाने तहाची बोलणी
करण्याची तयारी दर्शवीली. त्यासाठी
त्याने त्रींबकगड आपल्याकडेच ठेवण्याची
मागणी केली. पेशव्यांनी
तहाची बोलणी केली.पण गड नीझामाला
काही दीला नाही.अशा रीतीने तब्बल
६२ वर्षांच्या प्रदीर्घ
प्रतीक्षेनंतर त्रींबकगड मुसलमानी जोखडातुन
मुक्त झाला. त्रींबक
पडला की रांगेतले
इतर कील्ले सुपुर्द
होतात तोच कीत्ता
यावेळी कायम राहीला
असण्याची शक्यता आहे. हरीहर
कील्ला कोणत्या परीस्थीतीत पेशव्यांनी
घेतला या संबंधीचे
उल्लेख मीळु शकले
नाहीत, परंतु तो पेशव्यांनी
घेतला हे नक्की.तो त्रींबकगडापुर्वीच पेशव्यांना मीळालाअसावा. हरीहर शीलालेखाचे वाचन त्याकडे संकेत करते.
हरीहर पुष्कर्णीचे गुढ उकलले
त्रींबकचे महत्व मराठ्यांच्या राजकारणात
अनन्यसाधारण होते. म्हणजे त्रींबकगड
मुघलांकडे असला तरी
शीवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी
येत. नानासाहेब पेशव्यांच्या
वेळी त्रींबकगड पेशवाईत
नव्हता तरी ते
त्रींबकराजाच्या भेटीस यायचे. गडाच्या
पायथ्याला कुशावर्त तीर्थात सींहस्थ
कुंभमेळ्यात स्नान करत. आता
गड अधीकृतरीत्या ताब्यात
आला म्हटल्यावर त्यांनी
मंदीराच्या जागी मुघलांनीबांधुन ठेवलेली मशीद पाडुन
१६५५ मध्ये नवे
मंदीर बांधण्याचे काम
सुरु केले. त्यावर
पेशव्यांनी १० लक्ष
रुपये खर्च केला.हे काम सतत
३१ वर्षे सुरु
होते. हे काम
सुरु असतानाच हरीहर
कील्याच्या उत्तर माचीवर वीस्तीर्ण
आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आलीअसावी. ही कोणी बांधली
याबद्दल आजवर अनभीज्ञता
होती. पुष्कर्णीवर उठावाचा
सुंदर असा शीलालेख
शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण
होते. इतीहासाच्या अभ्यासकांनी
वेळोवेळी हा शीलालेख
वाचण्याचा प्रयत्न केला पण
कोणीच त्याचे पुर्ण
वाचन केले नव्हते.अमीत बोरोले यांचे
दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात
हरीहर शीलालेखाचे वाचन
असल्याची माहीती मीळाली, त्यानुसार
ते पुस्तक बघीतले
पण त्यात पुर्ण
वाचन नव्हते.
जी अक्षरे लागत नव्हती
याकरीता काही जुन्या
छायाचीत्रांचा संदर्भ मीळवील. या
कामी नाशीकच्या वैनतेयचे
अंबरीश मोरे यांच्या
एका छायाचीत्राची बरीच
मदत झाली. पण
ते छायाचीत्र सुद्धा
ओईलपेंटचा रंग दील्यानंतरचे
होते. तथापी ते
उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने
त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी
बांधली त्याची माहीती वाचण्यास
मदत झाली. शीलालेखावरचर
हरीहराचे नाव मात्र
स्पष्ट दीसत होते.ते इतर वाचकांनी
त्यांच्या साहीत्यात नमुद केले
आहे. आता हळु हळु
एक एक गोष्ट
उलगडायला लागली. शंकराचा मुलगा
नारायण हे नाव
स्पष्ट झाले. खालच्या ओळीत
पनामा हा शब्द
छळत होता. हा
पनामा काय असावा?यावर खल सुरु
असताना नाशीकमधल्या एका संस्थानीक
घराण्यातुन, राजेबहाद्दर हे मुळचे
दाणी असल्याचे व
ते सासवडचे असल्याची
माहीती मीळाली. मग या
पनामा अक्षराच्या अगोदर
असलेल्या दाणी नावाचा
उलगडा झाला - दाण्युपनामा
ही उकल झाली.शीलालेखावरचे शक व
तीथी मीळाली पण
संवत्सर व महीन्याचे
नाव स्पष्ट होत
नव्हते. पंधराच दीवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर
मंदीराच्या शीलालेखाचे वाचन करण्याचा
योग आल्याने त्याच्या
लगतचे म्हणुन संवत्सराचे
नाव वाचण्यास मदत
झाली. जुन्या संस्कृत
ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट
करता आले. अशा
प्रकारे हरीहराच्या शीलालेखाचे पुर्ण
वाचन झाले. राजेश
दीक्षीतने खरोखरच मोठे कसब
लावत लेखाचे वाचन
व त्याचे भाषांतर
करुन दीले.
|
शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे
|
आठ ओळींच्या या शीलालेखाची
भाषा संस्कृत आहे.
काळ, तीथी आदी
अंकात न
देता शब्दात दीले
आहेत.
श्री
।।श्री गणेशायनम: ।। धात्रवर्ना
मी शुक्रेधवलशरतीथौशंकरात्मसु
त:श्रीमन्नारायणा्ख्येगजगीरीरसक्यु
क्तसत्शालीवाहोशकेदाण्युपनामा
हरीहरवीलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी
ण्यार्तलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय ।।१।।
लेखाचे वाचन व
स्वैर अनुवाद: राजेश
दीक्षीत, त्र्यंबकेश्वर
१) श्री (श्री या
अक्षराने शीलालेखाची सुरुवात आहे)
२) ।।श्रीगणेायनम:।। धात्रव
र्ना (मी) (गणेशाचे
स्तवन हा दंडक
आहे. धात्रवर् = धात्रृ
नावाचे संवत्सर)
३) मी शुक्रेधवलशरतीथौ
शंकरा त्म : सु(शुक्रे = ज्येष्ठ महीना, धवल= शुद्धपक्ष, शर = पंचमीतीथी
शंकरात्म सुत: = शंकराचा मुलगा)
४) त: श्रीमन्नारायणाख्ये
गज गीरी रस
क् यु (शंकर
पुत्र नारायण नामे
वीख्यात, गज = ८,गीरी = ७, रस= ६, क् =१,युक्त )
५) क्त सत
शालीवाहो शके दाण्युपनामा( १६७८ या शालीवाहन
शकात - इसवीसन १७५६ साली,दाणी उपनावाचे)
६) हरीहर वीलसद्देवताकं सुतीर्थं
प्रादद्दी (हरीहर पर्वतावरील वीलास
करणाऱ्या देवतांच्या नावे उत्तम
तीर्थ दीन जनांचा
त्रास कमी करण्यास)
७) ण्यार्त लोकश्रम नीरहरुते
श्रेयसे (आर्त लोकांच्या
श्रम हरण करुन
पुण्यप्राप्तीसाठी)
८) मंगलाय (मंगल श्रेयासाठी
नीर्माण केले)
|
हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर
|
कोण होते नारोशंकर
वेगवेगळ्या
कालखंडात नासीक हे महत्वाच्या
राजवटींच्या राजधानीचे केंद्र होते.जसे यादव, अभीर,राष्ट्रकुट, त्रैकुटक, बागुल इत्यादी.तद्वताच नासीक शहर हे
सरदारांचे शहर म्हणुन
ओळखले जाते. सरदार
रास्ते, सरदार वींचुरकर, सरदार
राजेबहाद्दर, पवार घराणे,अशी काही नावे
आजच्या पीढीला कळतात ती
त्यांच्या शहरात पसरलल्या वास्तु,मंदीरे आदींशी नीगडीत नावांमुळे.गोदावरी नदीच्या कीनाऱ्यावर नारोशंकराचे
मंदीर प्रसीद्ध आहे.हे रामेश्वराचा शीवालय.१७४७ साली हे
मंदीर बांधण्यात आले.त्यास १८ लाख
रुपये खर्च आला.उत्तर महराष्ट्रातले मराठा
काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची
गणना केली जाते.मंदीराची ओळख मात्र
मदीर अशीच
आहे. या मंदीराची
भली मोठी घंटा
नाशीकची सांस्कृतीक ओळख बनली
आहे. नाशीक महानगरपालीकेच्या
मानचीन्हात तीचा वापर
करण्यात आला आहे.ही बहुधा वसईच्या
युद्धात जींकुन आणली असावी.चीमाजी अप्पाने वसईत पोर्तुगीजांच्या
वीरुद्ध नीकराची झुंज दीली.त्याच्या सोबत त्यांचे
वीश्वासु सहकारी नारोशंकर राजोबहाद्दर
हे होते. अशा
आठ पोर्तुगीज घंटा
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठीकाणी बसल्याचे
उल्लेख सापडतात.
नारोशंकराचे
नारोशंकर राजेबहाद्दुर यांच्या कामगीरीवर नजर
टाकली तर ते
पेशवाईतले पहील्या फळीतले सरदार
कशामुळे गणले जात
याची प्रचीती येते.घोड्याच्या पागेची नीगा राखणाऱ्या
साधारण शीपायापासुन त्यानी इतकी
मोठी मजल मारली.नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा
दरारा होता. त्यांनी
बंडखोरी करणारे ओर्च्छाचे राज्य
खालसा केले. झांसी
शहर त्यांनी वसवीले.दील्लीच्या सुलत्तानाचे रक्षक म्हणुन
त्यांची पेशव्यांनी नीयुक्ती केली.पेशव्यांच्या वतीने ते उत्तरेत
वसुलीचे काम करत.त्यांनी दक्षीण भारतातही काही
मोहीमा केल्या. दील्लीत त्यांच्याकडे
पेशवे व शींद्यांचा
खजीना सांभाळण्याची जबाबदारी
होती. पानीपतच्या युद्धात
ते अवघी दौलत
टाकुन पळुन आले
असे बालंट त्यांच्यावर
लागले. परंतु त्यांच्यावर जेव्हा
जेव्हा आरोप झाले
त्या प्रत्येक वेळेस
पेशव्यांना योग्य तो खुलासा
देऊन त्यांनी त्यांजी
नाराजी दुर केली.
नारोशंकर १७४२ ते
१७५९ असे पुढची
पंधरा वर्षे झांसीचे
सुभेदार होते. (मराठी वीश्वकोष
खंड ६) त्यांच्या
काळात झांसी शहराची
भरभराट झाली. तीकडे झासी
शहर वसत होते.पेठा नीर्माण होत
होत्या. कील्ला मजबुत केला
जात होता. इकडे
पेशव्यांना एक छदामही
मीळत नव्हता. त्यावरुन
पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची
कागाळी करण्यात आली. त्यांनी
जातीने हजर राहुन
पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे
उभे केल्याचे पटवुन
दीले. त्यामुळे पेशव्यांची
नाराजी संपुष्टात आली.
|
माचीवर जोत्यांचे अवशेष
|
अहमदशाह अब्दालीने ११ ओगस्ट
१७५७ला दील्लीवर दुसऱ्यांदा व
उत्तरेत चौथी स्वारी
केली. त्याने दील्लीचे राज्य काबीज
करुन नजीब उद्दोला
या रोहील्याकडे दील्लीच्या
राजवटीची कमान दीली.मुघल बादशाह आलमगीर
दुसरा हा अब्दलीचा
मांडलीक बनवीला गेला. वार्षीक २० लाखाची
खंडणी नीश्चीत करण्यात
आली. आब्दाली माघारी
फीरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार
होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे
मदतीची याचना केली. तोवर
अब्दाली नीघुन गेला होता.मराठी फौजांनी दील्ली
चहुकडुन घेरली. दोन आठवड्यांपर्यंत
युद्ध चालले. १७५७च्या
ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी
नीर्णायक वीजय मीळवुन
लाल कील्ल्यात प्रवेश
मीळवला. दील्लीत सदाशीवराव भाऊंनी
दरबार भरवला. यात
नारोशंकर यास राजेबहाद्दुर
ही पदवी देण्यात
आली. त्यांना दील्लीच्या
सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात
आली. त्याच्याकामगीरीबद्दल खुश होऊन बादशाहने
त्यास मालेगाव व
लगतच्या ८ गावांची
जहागीरी दीली. पुढे दक्षीणेत
परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद
श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर
बांधण्याची परवानगी मागीतली. घर
बांधले तरी ते
दीर्घकळ टीकत नाही,असा वीचार करुन
त्यांनी दील्लीहुन कुरैशी या
प्रशीक्षीत बेलदार समुदायाची माणसे
बोलावुन १७५७ मध्ये
दील्लीच्या कील्ल्यासारखा भव्य असा
कील्ला बांधला. त्यावर त्यांनी
अठरा लाख रुपये
खर्च केले. तत्कालीन इंग्रज लष्करी
अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे
नाक असे म्हटले.कील्ला पुरा झाला
तेव्हा, नारोशंकर मुघलांना फीतुर
असल्याची दरबारात कागळी झाली
आणी श्रीमंतांनी जासुद
पाठवुन कील्ला खाली करुन
देण्याचे फर्मान दीले. तोवर
कील्ल्याचे वास्तु पुजन झाले
नव्हते. नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच
नोकर असल्याचे प्रतीपादन
करुन कील्ला खाली
करुन दीला तेव्हा
कुठे पेशव्यांना त्यांच्या
नीष्ठेची प्रचीती आली.
मालेगावचा कील्ला बांधला त्याच्या
आसपासची तारीख हरीहर शीलालेखावर
आढळते. इतका सुबक
शीलालेख व त्यावरची
अक्षरे कोरण्याची पद्धत या
परीसरात दुसरी आढळत नाही.पुष्कर्णी पन्नास फुट लांब
व पन्नास फुट
रुंद असुन तीची
बांधणी अतीशय सुबक पद्धतीने
करण्यात आली आहे.यावरुन मालेगावचा कील्ला बांधणाऱ्या
कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे
काम करवुन घेतले
असावे याचा अंदाज
लावला जाऊ शकतो.पेशव्यांनी १७५५ मध्ये
त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु
केले.
झासीवरुन नारोशंकरांस परत बोलावल्यानंतर
त्यांची हरीहरवर कुठली कामगीरी
झाली असावी का?ज्यामुळे त्यांनी कील्ल्याच्या उत्तर
माचीवर वीशाल आकाराची पुष्कर्णी
बांधली. हा माचीचा
परीसर कील्ल्याच्या मुख्य
वस्तीचा परीसर असावा. हरीहर
कील्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर
असल्याने कील्लेदाराचा वाडा व
महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच
असाव्यात. ही माची
म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन
पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या
डोंगराच्या बाजुला असलेला परीसर.तीथे मोठ्या प्रमाणावर
वाड्यांची जोती दृष्टीस
पडतात. हरीहर कील्ल्यावर मोठ्या
वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा
उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर
वस्ती स्थलांतरीत होत
असावी.
नारोशंकरांची
महत्वपुर्ण कामगीरी ही उत्तर
भारतात झाल्याने त्याच्या नावानीशी
हरीहरावर इतके माठे
बांधकाम करण्यास पेशव्यांनी उगाचच
परवानगी देण्याची शक्यता कमी
दीसते. पेशवाईतली कींवा राजेबहाद्दरांशी
संबंधीत कागदपत्रे तपासली तर
नारोशंकर व हरीहर
हा नेमका संबंध
कशामुळे आले याचा
उलगडा होऊ शकतो.
मालेगाव येथील वकील एडव्होकेट
व डॉक्टर डी.एस. कुलकर्णी
यांनी अस्सल कागदपत्रे
व महीतीच्या आधारे
सरदार नारोशंकर राजेबहाद्दुर हे
पुस्तक प्रकशीत केले आहे.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर
यांची जुनी कागदपत्रे
इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी
नष्ट झाल्याची शक्यता
व्यक्त केली आहे.अजुनही पुण्यातले पेशवा दफ्तर
खंगाळले, अथवा अन्य
संदर्भाची, खास करुन
त्रींबकगड व हरीहर
कील्ला या संबंधीची
माहीती तपासली तर या
वीषयावर महत्वाचा प्रकाश पडु
शकतो.
धन्यवाद!
|
आमच्यासाठी रोजच हरीहरभटकंती...
|
वीशेष आभार:
भगवान बाबा, कळमुस्ते
गीरीश टकले
इलीयास सीद्दीकी
ओम दीक्षीत
बाळा उजे
मनोज खैरनार
सुयोग देवकुटे
अंबरीश मोरे
अनील दुधाणे
रवी पवार
संदर्भ:
-महाराष्ट्र
देशा, पंकज समेळ
-मराठी - संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात,महेश तेंडुलक
-भटकंती नाशीक जील्ह्याची,अमीत बोरोले
-मराठ्यांचा इतीहास,संपादक अ.रा. कुलकर्णी, ग.हे.खरे
-बखर संस्थानची, सुनीतपोतनीस
-पेशवे घराण्याचा इतीहास,प्रमोद ओक
-त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज,महेश तेंडुलकर
-पेशव्यांची बखर, काशीनाथनारायण साने
-सातारचे श्रीमंत छत्रपतीशीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधानयांचा इतीहास, वीष्णु
गोपाळ भीडे
|
हरीहर तीर्थ
|
|
वेताळ
|
|
भीरभीर नजर अनं पायऱ्यातल्याखोबण्या
|
|
दगडातुन कोरलेला वैशीष्ट्यपुर्णप्रवेश मार्ग
|
|
बालेकील्ल्यावर कोरलेलीअक्षरे व चीन्हे
|
|
अनाम वीराची समाधी
|
|
बालेकील्ला
|
|
घुमटाकृती वीटकाम
|
|
शेवटचे प्रवेशद्वार
|
|
उत्तरबाजुच्या कड्यातकोसळणाऱ्या पायऱ्या
|
|
हरीहर महादरवाजा
|
|
धन्यवाद
|
हा शिलालेख मी साधारण 2000 पासून बघत होतो पण कुतुहल वाढलं ते 2007 मध्ये.. तेव्हा पासून आजपर्यंत हा लेख माझ्यासाठी एक कोडं होतं जे आज राजाभाऊंनी सोडवलं खूप खूप धन्यवाद..
ReplyDeleteखूप मोलाचं काम केलंय प्रशांत, विशेष अभिनंदन सर्वांचे...
ReplyDeleteशिलालेखाचे वाचन आणि त्यासाठी कालखंडाचे अचूक विश्लेषण त्यामुळे वाचताना ते प्रसंग अनुभवता आले. यासाठी सर्व परिश्रमार्थींचे कौतुक आणि अभिनंदन!
ReplyDeleteअतिशय छान आणि मोलाची माहिती वाचायला मिळाली .. तुमचे खूप खूप आभार
ReplyDelete