Monday, April 12, 2010

हा रविवार चांगलाच लक्षात राहील...

आपले शरीर हे आरामासाठी किंवा बसल्या जागी काम करण्यासाठी बनलेले नाही...त्यांची सातत्याने हालचाल गरजेची आहे...चांगला आहार घ्यावा व कोणत्या गोष्टी परिक्षाम करतात व दुष्परिणाम करतात यांची गृहिणींनी माहिती घ्यावी....त्या दृष्टीने माझ्या सौ व मुलींकरिता सुद्धा आजचा रविवार ( 11 एप्रिल, 2010) लक्षात राहणारा ठरला...

Wednesday, April 7, 2010

कुठे गेली नाशिकची थंड हवा?




- हा प्रश्‍न बऱ्याच वर्षांपूर्वी मागे पडला आहे. वृक्षवल्लीची अपरिमीत कत्तल, वाहनांची वाढती संख्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पडलेला विसर, यामुळे महाराष्ट्रातील इतर तप्त शहरांप्रमाणे नाशिपकची उन्हाळ्यात भट्टी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक जण अंगाची तगमग कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत मिळणारे धडे प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बालक लासलगावच्या आठवडे बाजारात आपल्या आईसोबत भाजीपाला विक्रीसाठी आले ते मस्तकावर वर्तमानपत्राची टोपी चढवून. नाशिकही उन्हाळ्यात रापतं हे दाखवन देणारे हे चित्र.