आव्हानांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता नाही...आव्हान कशाला म्हणतात हे दाखवलं तरी पुरे! मुलांनी आव्हाने झेलावीत...ती पेलण्याची क्षमता विकसीत करावीत...जोखिम पत्कारणे म्हणजे नेमके काय? हे त्यांना दाखवून दिले तर ते तासनतास मोबाईलवर चिकटणार नाहीत...मोठमोठ्यांदा हॉर्न वाजवात आपल्या गाड्या हाकणार नाहीत...लहान सहान गोष्टींवरून हिंसक होणार नाहीत, जर त्यांना खर्या साहसाचा अर्थ समजला तर! हा अर्थ समजणार तरी कसा...शिक्षकांवर, पालकांवर, प्रशासनावर टिका करून? केवळ टिका केल्याने प्रश्न थोडीच सुटतात...ते तर तुमचे तुम्हालाच सोडवायचे आहेत...त्यासाठी आपल्या परिसरातल्या या काही ठळक गोष्टी...याचे तुम्ही भाग बना...मागे राहू नका...यश तुमच्या पासून दोन पावलेच दूर आहे!
- बंगल्यात राहणारे...फ्लॅटमध्ये राहणारे...चाळीत राहणारे...झोपडीत राहणारे...उच्चपदस्थ...हात मजुरी करणारे...अल्पशिक्षित...उच्चशिक्षीत सारे...सारे जण तयार रहा या कुंभात डुबकी घेण्यासाठी!
कसला कुंभ? कुठली डुबकी? प्रश्न पडला अेसल नाही? बरोबरच आहे...आम्हा नाशिककरांना एकच कुंभ ठाऊक आहे...तो म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा...तो तर नुकताच सरून गेलाय! मग आता हा कोणता नवा कुंभ?
तुमच्या मनात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, हा कुंभच आहे फक्त १२ वर्षातून येणारा धार्मिक, आध्यात्मिक नाही...तरी पण हा कुंभच. कुंभ ही संकल्पनाच मुळात उर्जेशी, शुद्धीशी, दिशा देण्याशी...काही तरी मोठ्या स्वरूपात साजरे करण्याशी निगडीत आहे.
तुम्ही बघतच आहात...आपल्या आसपास काय चाललय आहे ते! धडाधड खुन पडताहेत...कुठे स्त्रियांच्या गळ्यातल्या सोन साखळ्या खेचल्या जाताहेत. आर्थिक फसवणूकी सुरूच आहे. पोलिस काय झोपलेत का? जनप्रतिनिधी काय उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणची सैर करताहेत का? प्रशासकीय अधिकारी होरपळणार्या उन्हात वातानुकूलित कक्षात थंड हवेची मजा घेत आहेत का? एक ना अनेक प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.
नाशिकच्याच मुंबईस्थित एका पोलिस अधिकार्याच्या तरण्या मुलाने तर चक्क आपल्या आईचीच हत्या केली. केवढी मनं सुन्न करणारी घटना. लग्नासाठी दोन दिवस पाहुण्याघरी आलेल्या शाळकरी मुलावर नाशिकरोड परिसरात सपासप वार करून ठार करून टाकण्यात आले. काय तर म्हणे गैरसमजूतीतून हा प्रकार घडला. तप्त उन्हा बरोबरच समाजात ही कोणती अंधाधूंदी सुरू झाली आहे?
या अंधाधुंदीत अधिकार्यांना, शासकीय खात्यांना टिकेचे लक्ष्य करणार आहोत का? सगळेच सरकारी अधिकारी, कर्मचारी सुस्तावलेले अजगर नाहीत, भ्रष्टाचाराच्या चिखलात माखलेले नाहीत, तेव्हा अगोदर आपल्याला आपल्यात डोकावून बघावं लागेल!
आपण आपल्या मुलांसाठी काय करतो? आपल्या म्हणजे स्वत:च्या किंवा कुटुंबातल्याच नव्हे तर ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आस्था आहे किंवा ज्यांचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही, परंतू जे या शहराचे रहिवाशी आहेत, त्यांना आपण योग्य दिशा देत आहोत का? त्यांना उत्तमरित्या गुंतवून ठेवत आहोत का, जेणे करून त्यांना नवनवी आव्हाने झेलायला मिळतील, जोखिमा पत्कारायला मिळेल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल!
नाशिक परिसरात काही संस्था, काही अधिकारी हे कार्य कर आहेत, अगदी इमानेतबार! म्हणूनच म्हंटलं, आपल्या मुलांना या कुंभात पवित्र डुबकी मारायला घेऊन येणार आहात का?
येऊ घातलेले पंधरा ते विस दिवस मुल्लांच्या सुट्ट्यांने अखेरचे दिवस. त्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरू होतील. पावसालाही सुरूवात होईल. सुट्ट्यांच्या याशेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये काही महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यातील मुलांना डुबकी मारण्यासाठी घेऊन जाण्याचे काही प्रमुख कार्यक्रम बघू या!
यातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेने आयोजित केलेला माऊन्टन फिल्म फेस्टिव्हल.
नाशिकमध्ये माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे. भारतातील प्रसिद्ध असा हिमालयन क्लब वैनतेयवर या महोत्सवाची जबाबदारी सोपवली आहे. कॅनडातल्या अल्बर्टा प्रांतातले बांफ राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध अशा रॉकी पर्वतमालेतले काही महत्वाचे डोंगर यात समाविष्ट होतात. बर्फाळ डोंगर, उंचच उंच पर्वतकडे व खोल खोल दर्या, वेगवान पांढरे शुभ्र पाणी खळकळत नेणार्या वेगवान नद्या, दाट जंगले अशी निसर्गातली काही सर्वोच्च आव्हाने झेलत जगभरातले साहसविर आपल्यातल्या असाधारण कौशल्याला नवनव्या उंचीवर नेऊन ठेवतात. बांफच नव्हे, जगात आपआपल्या भागातले साहसवीर पर्वतारोहण, सायक्लिंग, माऊन्टन बायकिंग, पॅराग्लायडींग, पार्कोर, अल्ट्रा रनिंग, स्लॅक लायनिंग, जंगल भ्रमंती अशा एक ना अनेक विषयांवरील खर्या खुर्या साहसावर आधारलेले खरे खुरे चित्रपट बांफ चित्रपट महोत्सवाकरिता पाठवतात. त्यातून परिक्षक व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे पंचवीस निवडक चित्रपट जगाच्या प्रवासाकरिता निघतात. तो हा बांफ चित्रपट महोत्सव. खर्या खुर्या साहसावरचे खरे खुरे चित्रपट बघण्याची ही अपूर्व संधी. अवघ्या काही सेकंदांपासून ते तास दिड तासाचे सुद्धा काही चित्रपट असतात. अशा भन्नाट, डोक्याला गरगरून टाकणार्या या कलाबाजींचा हा महामेळा नाशिकमध्ये येत्या ३ जुनला अवतरणार आहे. हा कुंभ योग!
या पर्वणीत आपण डुबकी घ्यायची म्हणजे काय तर आपण स्वत: तो बघायल यायचं, सोबत आपल्या सगेसोयर्यांना, हितसंबंधिंना, इतकेच काय काही संबंध नसला तरी एक सामाजिक बांधिलकीने सुद्धा आपण लोकांना या महोत्सवाच्या निमीत्ताने जगातील सर्वोत्तम असे काही दाखविण्यासाठी घेऊन येऊ शकतात.
१९७६ साला पासून बांफ चित्रपट जगातल्या प्रमुख शहरात दाखविले जात आहेत. नाशिकला त्या मानाने अंमळ विलंब झाला, तरी आता तिसरे वर्ष असल्याने हा आता नाशिकचा वार्षिक सोहळा ठरू पाहत आहे. लोकही या महोत्सवाची आता आतूरतेने वाट बघत आहेत. ३ जुनला सायंकाळच्या सत्रात कालिदास कलामंदिरात भव्य अशा अल्ट्रा एचडी स्क्रिनवर उत्तम ध्वनीच्या सोबतीने तुम्ही बांफ चित्रपट महोत्सवाची रंगत अनूभवू शकता.
वैनतेयने यंदा त्यात आणखी भर टाकली, इंडियन माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलची. भारतात सुद्धा अचाट, अफाट साहसाची काही कमी नाही. हे साहस कदाचित चित्रपटाच्या चौकटीत बसविण्याचे लोण आपल्याकडे अजून पसरलेले नाही, परंतू इंडिटन माऊन्टेनिअरींग फाऊन्डेशनचा हा पहिला प्रयत्न. त्यामुळे भारतीय भूमितल्या खर्या साहसावरचे चित्रपट या महोत्सवात ४ जुनला म्हणजे रविवारी सकाळच्या सत्रात बघायला मिळेल.
याशिवाय ३ जुनलाच नाशिकमध्ये राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीची चौथी फेरी विल्होळीच्या परिसरात रंगणार आहे. देशातील उत्तमोत्तम दुचाकी चालक व स्कुटर चालक आपल्या थरारक ड्रायव्हिंगचे कसब पणाला लाऊन जेतेपदाकरिता झुंजताना दिसतील. सासळ्या डोंगराच्या दगड खाणींच्या परिसरात एबी इव्हेंट्सचा हा उपक्रम म्हणजे आपल्याकरिता कुंभातले दुसरे शाही स्नानच.
तिसरे शाही स्नानही लगेच, ५ जुनला होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपलं पर्यावरण संस्थेने वृक्षांच्या वाढदिवसाचा भव्य असा कार्यक्रम सातपुर जवळच्या फाशीच्या डोंगराच्या पायथ्याला आयोजित केला आहे. आपल्याला विदित असेलच, की तीन वर्षांपूर्वी हा डोंगर गिरीपुष्ट या एकमात्र विदेशी प्रजातीच्या झाडांनी व्यापला होता. आपलं पर्यावण संस्थेने संमिश्रवृक्ष प्रजातींचे रोपण करण्याचा मोठ कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे पाच हजार नागरिकांनी याठिकाणी येऊन वेगवेगळे वृक्षांचे रोपण केले होते. आपलं पर्यावरणने त्यानंतर सतत तीन वर्षे हे या वृक्षांची काळजी घेतली. परिसराचे कुंपण मजबुत केले, नियमीतपणे पाणी, छाटनी अशी तिन वर्षे अथक मेहनत घेतली. आज हे जंगल कसे बहरलेय! हे बघण्याचा हा योग.
या तिन शाही पर्वण्यांमध्ये सहभागी व्हा! मुलांना जरूर घेऊन जा. कारण त्यांना आव्हाने म्हणजे काय हे कळेल. काही वेळेला मुलांचा मार्ग चुकतो, संगत चुकते व मरण्या मारण्याला ते कचरत नाही. परंतू जाणारा जिवाशी गेल्यावर खरा खेळ सुरू होतो. त्याचे कुंटुंब तर प्रभावित होते, परंतू मारणार्याच्या कुटुंबाची अवस्था तिकीच बिकट होते. रागाचे, बदला घेण्याचे ते काही क्षण असतात, ज्यांचे ते सरत नाहीत, त्यांच्या हातून काहीतरी मोठं, अघटीत घडून जातं व परिणाम दोन्ही बाजुच्या लोकांना भोगावे लागतात; आयुष्यभरासाठी. बर्याचदा नंतर उमगते, आपण जन्म यासाठीच घेतला होता का?
आपल्या परिसरात चांगले काही घडत आहे तर त्याचा तुम्ही भाग बना. नव्या पिढीला तर त्याच्याशी जरूर जोडा, म्हणजे त्यांना कळेल, आयुष्याच खरं साहस हे रस्त्यावर वेडीवाकडी वाहने चालविण्यात नाही, लहान सहान गोष्टींवरून मारामारी करण्यात नाही. खरे साहस तर याहून वेगळा आहे, खुप मोठे आहे, हे त्यांना अशा कार्यक्रमातून समजू शकेल.
आव्हाने पेलायची तर या अफाट पसरलेल्या सह्याद्रीतल्या डोंगरात काही कमी नाही. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे कितीतरी पराक्रम या नाशिकभूमीत घडून गेलेत, त्या एक एक पराक्रमाच्या कथा त्यांना अवगत करून द्या. त्या धारातिर्थांच्या भेटी घडवा. वैनतेय सारख्या काही संस्था या सारखे उपक्रम वर्षभर राबवितात.
सायक्लिंग, दीर्घ पल्ल्याचे धावणे, पोहणे या क्षेत्रात नाशिकच्याच मंडळींनी केवढी मोठी झेप घेतली आहे. महाजन बंधूंनी जगातील सर्वात खडतर रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी चार वीर नाशिकमधून तयार झालेत. अम्मार मियाजी हा आयर्नमॅन पूर्ण करून आला. तीन-चारशे किलो मिटर सायकल चालविणार्यांचे जणू पिक नाशिकला आले आहे.

दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत नाशिककरांचा सहभाग शेकड्यांनी नव्हे तर हजारांनी वाढला आहे. पूर्वी नाशिकमध्ये औषधालाही न सापडणार्या मॅरेथॉन, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांचे आता पिक आले आहे. जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या मुर्शिदाबाद येथील स्पर्धेत नाशिकची मंडळी सातत्याने सहभागी होत आहे.
या अशा प्रतिष्ठा मिळवून देणार्या व मुलांचे आयु्ष्य कायमचे घडविणार्या उपक्रमांकडे मुलांना वळविणे गरजेचे आहे, तसे नाही केले तर त्यांचे आयुष्य बिघडविणार्या अनेक गोष्टी सावज टिपण्यासाठी सज्जच आहेत. म्हणूनच या साहसाच्या या तिन पर्वण्यांमध्ये त्यांना डुबकी मारून आणा. मग बघा अशा कुंभांची त्यांना कशी चटक लागते ती.
बरं यातले सर्वच उपक्रम खर्चिक आहेत का? तर नाही. धावणे तर अगदी बिनखर्चिक. सायकल तर तुम्ही कोणतीही घेऊन तूमच्या क्षमता वाढवू शकतात व भल्या भल्यांना टक्कर देऊ शकतात. पोहणे म्हणाल तर ते एकदा नीट जमू लागले तर तुम्ही नैसर्गिक ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली सराव करू शकतात व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात.
यासाठी तुमची आर्थिक स्थिती, वय व शारिरीक क्षमता असा कुठलाही अडसर येऊ शकत नाही! होय! मी हे खात्रीपूर्वक सांगतोय. विश्वास नसेल बसत तर उत्तम जोशीचं उदाहरण बघा! नाशिक मुंबई सायकल शर्यत जिंकण्याचा त्याने भिम पराक्रम केला. कविता राऊत तर आदिवासी मुलगी आज तिने थेट ओशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकून ऑलिम्पिक गाठले.
सेरेब्रल पाल्सी सारखा निम्म्याहून अधिक अपंगत्व असलेल्या आजाराने ग्रांसलेल्या हंसराज पाटीलने जलतरणातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार पटकायलाय. निट जेवत नाही व शरीर सुद्रुढ नाही, म्हणून आईने व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पाठविलेली वैशाली फडतरे पुढे जाऊन भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार बनली. या सारख्या कितीतरी यशोगाथा नाशिकमध्ये विपुलप्रमाणावर सापडतील. अशा कितीतरी जणांना फार सन्मानाच्या कायम स्वरूपी नोकर्या देखिल मिळाल्यात. तुम्ही बांफ चित्रपट महोत्सवातला पहिला चित्रपट बघा!, पुन्हा कधी कोणी, ' अपंग आहे...वृद्ध आहे', असं म्हंटलं तर तुम्ही त्याला जगातले सर्वोच्च आव्हान पेलणारे वीर आम्ही बघितलेत, नका गाऊ ते रडगाणे', असे म्हणाल! नाशिककरांना उर्जा देणारा, तरूणाईला दिशा देणारा, भरकटलेल्यांना, खर्या आव्हानांची जाणिव करून देणारा हा जुन महिन्यातला कुंभयोग! तो साधण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा!!
(सर्व छायाचित्रे बांफ सेंटरच्या सौजन्याने)