थोडं डोंगर व्हायचं...त्याचं झाडं बनायचं...त्याच्या अथांग आकाशात मनमस्त विहरायचं... बघायचं त्याच्याशी बोलून...पहायचं इतिहासाचं दडलेलं पाने उलगडून... त्याची आठवण काढली की तो लगेच बोलावतो...त्याच्या भेटीला! तेव्हा हळूच एखादी इतिहासातली घटना पहायचे येते का उलगडून!
Friday, August 6, 2010
अस्वस्थ करणारी अस्वस्थता
आज एक अतिशय सुंदर मुलगी आमच्या लहानग्या दुकानात आली होती. आमच्या छोट्याशा हस्तकला केंद्रावर काम करणाऱ्या दोघा मुलींशी तिची गेल्या वर्षभरापासून थोडी मैत्री जमली आहे. कालच सगळ्या जण विचारत होत्या की ती दिसत नाही हल्ली. नेमकी ती थोडं बोलायला आली आणि सगळ्यांनी तिला काल तिचीच आठवण काढल्याची कल्पना दिली. त्यावर तिचे उत्तर अस्वस्थ करणारे होते...
Monday, June 14, 2010
Monday, April 12, 2010
हा रविवार चांगलाच लक्षात राहील...
आपले शरीर हे आरामासाठी किंवा बसल्या जागी काम करण्यासाठी बनलेले नाही...त्यांची सातत्याने हालचाल गरजेची आहे...चांगला आहार घ्यावा व कोणत्या गोष्टी परिक्षाम करतात व दुष्परिणाम करतात यांची गृहिणींनी माहिती घ्यावी....त्या दृष्टीने माझ्या सौ व मुलींकरिता सुद्धा आजचा रविवार ( 11 एप्रिल, 2010) लक्षात राहणारा ठरला...
Wednesday, April 7, 2010
कुठे गेली नाशिकची थंड हवा?
- हा प्रश्न बऱ्याच वर्षांपूर्वी मागे पडला आहे. वृक्षवल्लीची अपरिमीत कत्तल, वाहनांची वाढती संख्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पडलेला विसर, यामुळे महाराष्ट्रातील इतर तप्त शहरांप्रमाणे नाशिपकची उन्हाळ्यात भट्टी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. प्रत्येक जण अंगाची तगमग कमी करण्यासाठी शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळेत मिळणारे धडे प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बालक लासलगावच्या आठवडे बाजारात आपल्या आईसोबत भाजीपाला विक्रीसाठी आले ते मस्तकावर वर्तमानपत्राची टोपी चढवून. नाशिकही उन्हाळ्यात रापतं हे दाखवन देणारे हे चित्र.
Friday, February 19, 2010
Holi with Ayurvedic Colors
the eco friendly culture of INDIA
Ancient scriptures like the Rig-Veda and the Gaduda Purana mention this ritual of people sprinkling colours on each other. They played with gulal - powder made out of spring blossoms, leaf and fruit extracts. The red was Raktachandan (Pterocarpus santali-nus); the green was blended Mehendi and the yellow was dried Amaltas (Cassia fistula) and Marigold / Gainda (Tagetus erecta).
Wednesday, February 17, 2010
जिव्हाग्री टेकलें कवींठ
---
नाशिक, ता. 11 : गेल्या काही दिवसांपासून शेतांमधली कवठाची झाडे भरगच्च फळांनी लगडली आहेत.
कैंसें एकचि केवढें पसरलें। त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकलें ।।
जैसें कां कवींठ घातलें। वडवानळीं।।(एकच मुख-कसे व केवढे पसरले आहे? ज्या प्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्हींही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.)भारतीय संस्कृतीमध्ये वनमहात्मय धार्मिक आणि तात्त्विक विचारसरणीमध्ये जोपासले आहे. श्लोक 30मध्ये ज्ञानेश्वर माऊंलींनी सर्वव्यापी श्रीकृष्णाची तुलना करताना कवठाच्या अविट गोडीची महत्ती सांगितली आहे.
संस्कृतमध्ये कपित्थ, हिंदीत कैथा किंवा कैथ बेल, बंगालीत कोंथ बेल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कवठाला इंग्रजीत वुड ऍपल म्हणतात.
Wednesday, January 27, 2010
उत्साह वाढवताहेत बक्षिसे...अन् शुभेच्छा!
इतिहासाची पुनरावृत्ती;
ध्यानी मनी नसताना एखादी घटना घडते..."तुम्हाला राजीमाना द्यावा लागेल'...असे शब्द कानी पडतात...चुक नसताना आलेले हे बालंट नोकरी जाण्याच्या भावनेपेक्षाही जास्त बिकट...असा प्रसंग मी 2009 साली अनुभवला होता...आज त्यात घटनेचा पुढचा अंक...या वेळचा प्रसंगी मात्र सर्वस्वी निराळा...ज्या घटनेमुळे माझी नोकरी जाण्याची पाळी आली होती, त्याच प्रसंगात यंदा मी बक्षिसाचा मानकरी ठरलो.
Subscribe to:
Posts (Atom)
-
राजाची वाट त्र्यंबकेश्वरच्या जंगलात, 'घोड्याची वाट', म्हणून एक जुना घाट मार्ग आहे. १ जानेवारी १६६४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सु...
-
एका अल्पाईन ट्रिपची गोष्ट रतनवाडी...सांदण दरी...कोकणकडा हा ट्रेक नव्हता...ती होती निव्वळ सहल. एक दिवसाचा एन्जॉय! कमीत कमी खर...
-
नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिड...