Wednesday, February 17, 2010

जिव्हाग्री टेकलें कवींठ


---
नाशिक, ता. 11 : गेल्या काही दिवसांपासून शेतांमधली कवठाची झाडे भरगच्च फळांनी लगडली आहेत.

कैंसें एकचि केवढें पसरलें। त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकलें ।।
जैसें कां कवींठ घातलें। वडवानळीं।।
(एकच मुख-कसे व केवढे पसरले आहे? ज्या प्रमाणे वडवानळामध्ये कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्हींही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.)भारतीय संस्कृतीमध्ये वनमहात्मय धार्मिक आणि तात्त्विक विचारसरणीमध्ये जोपासले आहे. श्‍लोक 30मध्ये ज्ञानेश्‍वर माऊंलींनी सर्वव्यापी श्रीकृष्णाची तुलना करताना कवठाच्या अविट गोडीची महत्ती सांगितली आहे.
संस्कृतमध्ये कपित्थ, हिंदीत कैथा किंवा कैथ बेल, बंगालीत कोंथ बेल अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कवठाला इंग्रजीत वुड ऍपल म्हणतात.

No comments:

Post a Comment