कोणाचा गुजरात? गांधींचा...
गांधींचा...सरदार पटेलांचा...मोदींचा...उद्योजकांचा...शेतकर्यांचा...व्यापार्यांचा?
शिवजयंती, अर्थात तिथी नुसार फाल्गुन कृष्ण तृतीया, इंग्रजी तारीख ८ मार्च २०१५
रोजी अचानकपणे अहमदाबेदेला जाण्याचा योग आला...
हातात दोनच दिवस होते...मोदींचा गुजरात सातत्याने बघणे होत आहे...या माणसाचे
मोठे कौतुक वाटते, महाराष्ट्रातले पाणी त्यांनी गुजरातला नेऊन तिथल्या शेतीसाठी
भरपूर पाणी नेले...अगदी आमचे कॉंग्रेस प्रणित सरकार असताना व आत्ता
भाजप-शिवसेनेची सत्ता असताना...त्यांच्या विकासाच्या मॉडेलपेक्षा त्यांचे पाणी
मिळविण्याचे मॉडेल मला जास्त विस्मयकारक वाटले...
बडोद्याजवळील करमसद या खेड्यात माझी मावशी राहते, त्यामुळे सरदारपटेलांचा
गुजरात बालपणापासूनच बघत आलो आहे...तेव्हा तो शेतकर्यांचा मुळीच नव्हता..होता
तो व्यापार्यांचा व काही प्रमाणात उद्योजकांचा...
म्हणतात ना! कवडीचे दान पलटते...इथे कवडीचे दान पलटले तरी कोणीच मागे जाताना
दिसत नाही...सगळेच पुढे...हा चमत्कार माझ्या महाराष्ट्रात का होत नाही?
तलवार, बंदूका, तोफा, बॉम्बगोळे अशा कुठल्याही शस्त्राशिवाय लढा दिला जाऊ शकतो!
ही विचार जगाला देणारे, नव्हे! तो प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविणारे राष्ट्रपिता
महात्मा गांधीचा गुजरात बघूया म्हटलं! गांधी तत्वज्ञान थोडे थोडे झिरपत असते
आपल्या मनात...यंदा या तत्वज्ञानाचा वेगळा पैलू बघायला मिळाला!
साबरमती आश्रमाला भेट देणे म्हणजे...एक रोमांचित करणारा अनूभव...काय गवसले या
भेटीत? माझ्या साठी जसा हा शोध अनमोल, तद्वताच तो समुच्या जगासाठी कमालीचा
महत्वाचा...तुम्ही त्याचे महत्व लवकरात लवकर ओळखणे गरजेचे आहे...खात्रीपूर्वक
सांगतो...जितके लवकर ओळखाल, तितके महत्वाचे!
नाशिकहून प्रथम आम्ही पोहोचलो ते नवसारीला...पुणे सुरत या महाराष्ट्र मार्ग परिवहन
मंडळाच्या एशियाडने...६० किलो मिटरचा नेत्रदिपक सापुतारा घाट उतरल्यानंतर वासंदा
अभयारण्या पासून ५ किलो मिटर अंतरावर सरपोर हे इनमिन २०० उंबर्यांचे खेडे आमचा
पहिला मुक्काम...याला खेडे म्हणावे की आणखी काही...या गावात दृष्टीस पडावे असे
एकही दुकान नाही...राज्य महामार्गावर वसलेले असूही बस थांब्यावर निवारा
नाही...गावात वर्दळ, गडबड-गोंगाट असा काहीही जाणवत नाही...या गावात लोक राहतात
की नाही? अशी शंका यावी, इतकी शांतता...रस्त्याच्या कडेला, पाराखाली, मंदिरावर असे
कुठेही घोळके दिसले नाहीत...घरे म्हणजे जुन्या प्रशस्त हवेल्या किंवा मग सरळ सरळ
टुमदार कॉंक्रिटमध्ये बांधलेले बंगले...पंचवीस टक्के घरे रिकामी-कारण काय तर,
विदेशात नोकरी...
आम्ही गिरीषभाई पटेल यांच्या जुन्या हवेलीत मुक्काम केला...हा पटेल समाज म्हणजे
पक्का शेतकरी...संपुर्ण नवसारी परिसरात शेतीला भरपूर पाणी मिळते, त्यामुळे जास्त
पाण्यावर उगवणारी स्पायडर लिली जातीची फुले येथे फार मोठ्या प्रमाणावर घेतली
जातात...आपल्याकडे लग्नात वधु-वरास हार घातला जातो, त्यात या लिलीच्या पांढर्या
फुलांचा भरपूर वापर होतो...देवांनाही पांढरी फुले चढविण्याचा रिवाज...शिवाय यांचा
हलका, मादक गंध दिर्घकाळ टिकतो...दहा दहा फुलांचे गड्डे रबराने बांधुन त्याचे डाग
तयार केले जातात व हा माल देशभरात बसने किंवा खासगी वाहतुकीच्या मदतीने
पाठविला जातो...दुसर्याच दिवशी फुले बाजारात येतात व हार वाल्यांना ताजी ताजी
मिळतात...या हाराची किंमत सर्वाधिक येते...माझा गिरीभ्रमणातला मित्र राहुल सोनवणे
याच्यामुळेच गिरीषभाई सारख्या मितभाषी शेतकर्याची ओळख झाली...त्याच्या हवेलीचा
पाहूणचार मिळाला...
गिरीषभाईंचे घर म्हणजे तीन भावंडांचे एकत्रित कुटुंब, प्रत्येकाला प्रशस्त स्वयंपाक घर,
बैठकीची मोठी खोली व मागे अंगण...अंगणात गायीचा गोठा, विहीर, स्वच्छतागृह...बंब
पेटविण्याची जागा...परसबाग असा देखणा रूबाब...
सागवानी चौकोन तासलेल्या भल्या लंब्या वाशांवर जाडजुड बांबु ठेऊन त्यावर मध्यम
आकाराचे आडवे बांधु रचून केलेले माळे या परिसरात सर्वच हवेल्यांचे खास
वैशिष्ट्य...अशा प्रकारच्या घरात कधी उन्हाचा चटका लागत नाही, की कधी थंडीचा
कडाका, असे गुण वैशिष्ट्य सांगतांना, गिरीषभाईंनी हवेलीला व त्याच्या बांबुच्या देखण्या
छताला शंभर वर्षे पूर्ण झाल्याची माहिती दिली...
'बांबुला वाळवी लागल्याने त्रस्त असून, लवकरच ही जुनी हवेली पाडून त्याठिकाणी
नव्यापद्धतीचे घर उभे करणार' असल्याचे त्यांनी सांगितले...बांबु तोडण्याचा काळ व मुहुर्त
फार महत्वाचा आहे...तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पौष महिन्यात आमावस्येला किंवा
त्याच्या नंतर तिनएक दिवसात तो तोडला तर त्याला कधी किड लागत नाही! असे
बांबुच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी खात्रीपूर्वक सांगतात! मला वाटतं, शे-सव्वाशे
वर्षांपूर्वी या बांबुचा वापर करताना सरपोरच्या कारागिरांनी या गोष्टींचा कटाक्ष पाळला
होता की नाही? अशी शंका मनात आली...
गिरीषभाईंचे काही नातलग न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेत व्यापार निमीत्ताने स्थायीक
झाल्यामुळे त्यांना आपल्या हवेली सोबतच आणखी दोन हवेलींची देखभाल ठेवावी
लागते...घरात गाईचा गोठा आहे व आठ पैकी सर्व दुभत्या गाईंचे दूध ते स्वत: किंवा
त्यांच्या सौभाग्यवती काढत असतात...गाईचे शेण व गोमुत्र त्यांच्या लिलीच्या बागांना,
तसेच उस व आंब्याला जाते...
शेतीप्रधान सरपोर म्हणजे दक्षिण गुजरातच्या वैभवाचे प्रतिक...या गावात, विकास
कशाला म्हणतात? हे बघुन माझे डोळे दिपले...प्रत्येक घराला दररोज ३० लिटर शुद्ध
केलेले पिण्याचे पाणी, वापरण्यासाठी बर्यापैकी स्वच्छ पाणी...पिण्याच्या पाण्याचा
आधुनिक फिल्टरेशन प्लांट...त्यावर देखरेख करण्यासाठी सरकारचा एक पूर्णवेळ
कर्मचारी...
शेतीसाठी दर पंधरवड्याला कॅनॉलचे पाणी येते...ते बघुन आपण पंजाबमध्ये असल्याचा
भास होतो...त्यामुळे भरपूर पाण्याच्या पिकांची या ठिकाणी रेलचेल आहे...जास्त पाण्यावर
होणार्या लिलीच्या बागात एक दोन मजुर नियत्यनियमाने फुले खुडताना
दिसतात...एकदा लावली की ही झुडपे कायमस्वरूपी फुले देतात...
प्रत्येक शेता पर्यंत पक्का, बांधलेला, दर्जेदार रस्ता, ज्यावर खड्डे असण्याची संभावना
खुपच कमी...गावातील अंतर्गत रस्ते कमालीचे उत्तम...सद्या कॉंक्रिटच्या पेव्हर
ठोकळ्यांची रचता करून हे रस्ते तयार केलेत...परंतू पाच वर्षे झाली तरी ते दुभंगले
नाहीत, यावरून कामात घोटाळा झाला नसावा, याची प्रचिती येते, अन्यथा आमच्या
नाशिकला पेव्हरच्या रस्त्यांचा केव्हाच निकाल लागलाय...ठेकेदार, नेते व अधिकार्यांनी
त्या पैशाचे केव्हाच ढेकर दिलेत...
अंतर्गत गावाचे व गावांना जोडणारे रस्ते इतके छान पद्धतीचे की, गोव्याच्या रस्त्यांची
आठवण व्हावी...सर्वत्र उन्हाची रखरख असताना, या परिसरातील शेतमळे पिकपाण्यामुळे
हिरवेकंच...प्रत्येक बांधावर अनेक मोठमोठे वृक्ष! हा स्वर्ग निर्माण करणार्या नेतृत्वाला
सलाम! तोच मनामध्ये लालसा निर्माण झाली, आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला हे दिवस
येऊ शकतील? या परिसरात वर्षात दोनदा भात घेतला जातो, दुसरा भात हा उन्हाळ्यात,
इतका पाण्याने समृद्ध असा हा दक्षिण गुजरातचा कृषीप्रधान परिसर रात्री अंधार दाटेपर्यंत
बघत राहिलो...दुसर्यादिवशी भल्या सकाळी अहमदाबादेच्या दिशेने कुच केली...
गुजरातचे रस्त्यांचे जाळे समृद्ध आहे, हे सांगणे न लागे!, परंतू बडोदा-अहमदाबाद
द्रुतगतीमार्ग बघितल्यानंतर तुमचे डोळे विस्फारतील...शंभर किलो मिटरच्या या मार्गावर
दुतर्फा नाना तर्हेची झाडी लावण्यवात आली...महामार्ग तयार करतानाच ती लावण्यात
आली होती...ती पूर्णपणे जगविण्यातही आली, आता फाल्गून महिन्यात फुलणार्या
काटेसावर, पळस, बहावा आदी महत्वाच्या वृक्षांचे बहर डोळेभरून बघायला
मिळाला...रस्त्याच्या दुतर्फा हिरवी कंच शेती व नानाविविध पिके बघून, डोळ्यावर येणारी
डुलकी आपण रोखून धरतो व या मार्गाचा थाट डोळ्यात समावण्याचा प्रयत्न
करतो...तंबुखुची लांबच लांब शेती मात्र मनाला खुपत होती...इतक्या तंबाखुची गरज
काय? असा तंबाखुविरोधी विचार चटकन मनाला स्पर्ष करून जातो...
वाटेत आम्हाला भरूच गावाला जाताना ब्रिटिशकालीन गोल्डन पुल लागला...या पुलाचा
रूबाब गिरीषभाई व त्यांचा शेतकरी सहकारी शैलेशभाई तोंडभरून कथन करत
होते...अंकलेश्वर व भरूच यांना जोडणारा, नर्मदेच्या अफाट पात्रावरचा हा पुल १८८१
साली पुर्ण झाला...त्यावेळी त्यावर ४५.६५ लक्ष रूपये खर्च आला होता...गांधीजींचे
मीठसत्याग्रही याच मार्गावरून गेले असावेत...
अहमदाबादेत मला जे यंत्र हवे होतो...त्याचा प्रथम सौदा पक्का केला! दुपारचे गुजराती
पद्धतीचे भोजन साबरमती आश्रमात घेऊ या इराद्याने, पत्ता विचारत विचारत आमचा
प्रवास सुरू झाला, तोच पहिला धक्का दिला एका विक्रेत्याने - आपको साबरमती आश्रम
जाना है तो? अॅड्रेस क्या है?
साबरमती आश्रमात आणखी एक धक्का बसला, त्याठिकाणी भेट देणार्यांसाठी
भोजनालच नाही...आमची गाडी पुन्हा वळवून नजिकच्या हॉटेलात दुपारचे जेवण उरकून
परत साबरमती आश्रमात दाखल झालो...
महात्मा गांधींनी स्थापन केलेला हा अत्यंत महत्वाचा आश्रम...या आश्रमात त्यांची
खोली, विविध वस्तू, पुस्तक दालन, गांधींकालखंडाचा पट उलगडणारे माहिती व चित्र
प्रदर्शन, पुस्तक भांडार बघण्यासारखे...
पुस्ताक भांडारात गांधीजींवरची कितीतरी पुस्तके...या समुद्रातून आपल्याला कोणते
पुस्तक हवे आहे? असा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न मनात होता...तोच उत्तर सापडले,
त्यांच्या आंदोलनावर, त्यांच्या तत्वज्ञानावरची पुस्तके सर्वच ठिकाणी मिळू शकतील, त्या
ऐवजी माझ्या संकल्पीत लघुपटाच्या विषयाला पुरक ठरू शकेल, अशा ग्राम
स्वराज्यावरचे पुस्तक मिळाले....हिन्दी आवृत्ती, किंमत रूपये ६०/- मात्र...लगेच उचलले!
दुसरे पुस्तक अत्यंत महत्वाचे गांधींजींचे आहार विषयक पुस्तक! Diet and Diet
Reforms...गांधींची शरीरयष्टी बघून, वाटायचे, ते तर सारखे उपोषण करत, खुप कमी
खात, स्वत:ला भरपूर कष्ट देण्याची त्यांची सवय...परंतू या पुस्तकात गांधींचा आहार
किती पोषक होतो, हे बघुन अचंभित व्हायला होते...स्पष्टच आहे, जगातले मातब्बर
सत्ताधिश ब्रिटिशांना आपल्या तत्वांनी हालवणारे गांधी शरीराने कमजोर नसावेत!
'आपलाच तो भ्रम होता'...झालेही तसेच....त्यांचा आहार खुपच सकस होता, संतुलीत
होता व परंपरेला धरून होता, तरी ते प्रयोग केल्याशिवाय अंतिम मतापर्यंत पोहचत
नसत...
गांधीजी खुप चांगला आहार घेत...पॉलिश केलेला तांदुळ त्यांच्या तत्वज्ञानानुसार
ससर्वाधिक निषेद्य...त्याच प्रमाणे साखर...वनस्पती तुप आणि यांत्रिक पद्धतीने तयार
केले जाणारे खाद्य तेल...शरीराला आवश्यक असणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स व इतर घटक
व्यवस्थित मिळावे, अशी आपल्या आहाराची जुनी रचना...गांधीजींनी मात्र जो आहार
निर्धारीत केले, त्याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी सुद्धा करून घेतली...अनुभव घेतला व
नंतर त्याचा लोकांना या पद्धतीचा आहार घेण्याचा सल्ला दिला...त्यांच्या हरिजन, यंग
इंडिया या नियतकालीकातील लेखांबरोबरच गांधीजींनी आहारावर स्वत: केलेल्या
लिखाणाचा खजिनाच या पुस्तकरूपाने प्राप्त झाला आहे...
आपण आज अन्नपदार्थाचा दर्जा खालावल्याचे म्हटतो...त्याचे दृष्य परिणामही सद्य
सर्वात्र दिसत आहेत...धडधाकट, सुस्थितीतला कोणी तरी परिचीत दगावतो, तेव्हा कळते,
कर्करोग झाला होता...चरबीचे प्रमाण अधिक होते...हृदयविकार होता...यकृत, मुत्रपिंड
निकामी झाले होते...हे असे आजार काही अचानक उद्भवत नाहीत...पण त्याचा झटका
मात्र अचानक बसू शकतो...गांधीजींनी मात्र त्याच वेळी व्यापारी, उत्पादक व विक्रेते
कशापद्धतीने नकली माल बाजारात आणून लोकांच्या आरोग्याशी खेळताहेत यावर
लिखाण केल्याचे या पुस्तकात वाचायला मिळते...
आपण सगळ्यांनीच आपल्या अहारपद्धतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे...मानवी
शरीराला ८०% अल्कलीयुक्त व केवळ २० टक्के आम्लयुक्त आहाराची गरज आहे...आता
तुम्हीच विचार करा...तुमच्या आहारात कसले प्रमाण अधिक व कसले कमी आहे...सांगणे
न लागे की आजच्या वेगवान युगात अल्कलीयुक्त आहार घरी सुद्धा व्यवस्थित तयार
केला जाऊ शकत नाही...कारण ९०%च्या जवळपास अन्नपदार्थ हे आम्लयुक्त
मिळतात...त्यामुळे कर्करोग, हृदयरोग या सारखे आजार ही आधुनिक
जीवनशैलीची...बदललेल्या अन्नपदार्थाची देणगी आहे...
साखरेचा वारेमाप वापर वाढलाय...तांदुळ पॉलिश केलेलाच विकला जातो...कारण हातांना
काढण्यासाठी कोणालाही वेळ नाही...दुर्गम आदीवासी सुद्धा मिलवरचा निकस तांदुळ
खाताना दिसतात...तुप पुर्णपणे सिन्थेटिक बनले आहे...तेल यंत्रावरचे...तेलाच्या घाण्या
नामशेष झालेल्या...अन्नपदार्थाला चव...गंध व रंग आणणारे क्रुत्रिम पदार्थ पुर्णपणे
आम्लयुक्त...गायीचे दुध मिळणे दुरापास्त...भाज्या, धान्यांचे देशी वाण नामषेष किंवा
अती दुर्मिळ...तेव्हा गांधींच्या युगात वाजलेली धोक्याची घंटा आता केवढी प्रखर झाली
आहे? याची जाणीव असू द्या व शुद्ध, सात्विक आहाराकडे वळा...
गांधीजींच्या 'हरिजन' व 'यंग इंडिया' इत्यादी नियतकालिकांतून त्यांनी आहार विषयावर
लिखाण केले आहे...त्यांनी ज्यावेळी लिहीण्यास वेळ नसे, त्यावेळी ते विविध विषयांवर
जगातील मान्यवर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेत...अशा अनेक लेखांचा संग्रहच आहे हे
गांधीजींचे, 'डायट अॅन्ड डायट रिफॉर्म'...आजवर, गांधीजी शाकाहारी होते, या पलिकडे
त्यांच्या आहारपद्धतीबद्धल कधी जाणूनच घेतले नव्हते...परंतू नाशिकमध्ये डोंगरभटक्यांचा
आमचा चमु जीवनशैलीचा अवलंब केल्यापासून आहाराबद्दल बरीच माहिती ग्रहण करू
लागलो आहोत...या मालिकेत 'डायट अॅन्ड डायट रिफॉर्म', हे पुस्तक अत्यंत मोलाचे
ठरणार आहे...तुम्हा सर्व वाचकांनी ते स्वत:कडे बाळगावे व आपली मनोभूमिका तशा
पद्धतीची ठेवली तर पुढचे जीवन कितीतरी अधिक सुखकारक ठरेल...भरपूर काम
करण्यासाठी उपयोगी ठरेल व मानसिक, शारीरिक बळ वाढविण्यास अतिशय पुरक ठरेल!
असा माझा विश्वास आहे...
साखर पुर्णपणे बंद, मिठ बर्याचदा वर्ज, तेल घाण्यावरचेच, तुप देशी, वनस्पती वर्ज, दुध
फक्त व फक्त गायींचे, म्हशीचे नको...शरीराचा पीएच कसा सांभाळाल? नकली अन्न
तयार करणार्यांची व विकणार्यांची अभद्र साखळी...अशा कितीतरी गोष्टींवर मौलिक
माहिती देणारे हे पुस्तक...
माझ्या या दोन दिवसांच्या गुजरात दौर्यात मला कितीतरी गोष्टींची भेट मिळाली, त्यात
आहार व ग्रामस्वराज्य या विषयावरचे पुस्तक अग्रस्थानावर आहे...
गुजरातच्या विकासाबद्दल आता फार काही बोलण्यासारखे नाही, आपले महाराष्ट्रातील
नेते, त्याबद्दल फक्त इर्षाच करत राहिलेत! तिथले लोक मात्र प्रत्यक्ष फळे चाखु लागली
आहेत...पूर्वी महाराष्ट्र अव्वल होता, आता आम्हाला गुजरात व्हावेसे वाटते, कधी
कर्नाटक, तर कधी हरियाणा, केरळ! इतके आम्ही मागे पडलो आहोत! पण याबद्दल
आपल्यालाच खेद व खंत! 'त्यांना नाही'!
हेरिटेज वॉक
या दौर्यात आणखी एक गोष्ट मनोमन आवडली, ती म्हणजे अहमदाबादेची हेरिटेज
वॉक...स्वामिनारायण मंदिराच्या वतिने, शहरातील बांधकाम, रोटरी व इतर संस्थांनी या
वॉकचे नियोजन केले आहे...१९९७ पासन अखंडपणे एकही दिवस न चुकता ही वॉक
होते...सौभाग्यवती उर्वशी रामैय्या व त्यांचे पती यांच्यापैकी कोणी एक जण ही वॉक
घेऊन जातो...उर्वशी यांना दहा वर्षांची मुलगी आहे...परंतू वर्षाचे ३६५ दिवस न चुकता
त्या पर्यटकांना घेऊन जात असतात...त्यांच्या सादरीकरण व संवाद केलेला दुहेरी सलाम!
गुजरातेत मला न आवडलेल्या गोष्टींपैकी, तळलेल्या पदार्थांचा आहारात असलेला
अतिरेकी वापर...यंत्राच्या तेलात तळले जाणारे हे चवदार पदार्थ गांधी तत्वज्ञानाच्या
पुर्णपणे विरोधातले...शिवाय या पदार्थांना चव आणण्यासाठी साखर, 'लिंबु पाऊडर', असे
गोंडस पण फसवे नाव असलेले सायट्रिक आम्ल व मिठाचे अती प्रमाण...आणखी एक
अतिशय वाइट सवय म्हणजे गुटखा बंदी असूनही वेगवेगळ्या पुढ्या मिसळून खाल्ला
जाणारा गुटखा...किती टक्के गुजराती लोक तंबाखु खात असतील ६०%च्या वर तर
नक्कीच! कारण मी महिलांना यातुन वगळत आहे...
साबरमती नदी सुशोभिकरण
गुजराथेतला मनाला भावणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणजे साबरमतीनदीचे
सुशोभकिरण...नदीच्या दुतर्फा प्रत्येकी १०.४ किलो मिटरचा विस्तार, अत्यंत मजबुत,
देखणे व आखीवरेखीव बांधकाम केले आहे...त्यावर बागा...चालण्याचे मार्ग, धावणे,
सायकलिंग अशा प्रकारांना प्रोत्साहन...
नदीत कचराच दिसला नाही...विद्युतीकरण, स्वच्छता व रखरखाव असा हा भला थोरला
प्रकल्प भारतातल्या तमाम नदीप्रदुषण विरोधी चळवळीला समर्पित झाला आहे...दुख
याचेच की आमच्या नाशिकच्यो गोदावरीसकट इतर सर्व नद्या मात्र कमालीच्या
प्रदुषित...
या नदीलगत १०,००० (दहा हजार) झोपडपट्टी धारक होते...सरकारने ५ एफएसआय
घोषित करून या झोपडपट्टीवासियांच्या निवासाची व्यवस्था केली...जी जागा मिळाली,
त्यातील दहा टक्के जागा नदीच्या सुशोभिकरणासाठी वापरून उर्वरीत जागेचा विकास
केला व त्यातून या प्रकल्पाचा पैसा उभा राहिला...
आमच्या नाशिकच्या गोदापार्कचा प्रकल्पा प्रत्येकी ५ किलो मिटर्सचाच, नदी लगत
मोठ्या प्रमाणावर (अहमदाबाद इतक्या तर नक्कीच नाही) झोपडपट्ट्या नाहीत, तरी पण
या प्रकल्पाला सुगीचे दिवस यायला तयार नाही...साबरमती नदीच्या तुलनेत गोदेचे पात्र
या ठिकाणी कितीतरी लहान आहे...तरी पण सबळ नेतृत्व न लाभल्याने हा प्रकल्प
आधांतरी लटकतोय!
गिरीषभाई पटेल यांच्या हवेलीचा भलामोठा वासा आणि त्यावर शंभरवर्ष जुने बांबुचे छत! |
साबरमती आश्रम: या आश्रमात गांधीजी बारा वर्षे राहिले होते! |
सरपोरचे शेतकरीमित्र गिरीषभाई पटेल यांची 'साबरमती आश्रमात टिपलेली छबी! |
साबरमती आश्रमात गांधीजींची अनेक तैलचित्र...त्यांच्या हयातीत तयार झालेली आहेत! |
साबरमती आश्रमातून दिवसा दिसणारा साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचा रूबाब... |
...आणि रात्री साबरमती आश्रमातून दिवसा दिसणारा साबरमती रिव्हरफ्रंट असा डोळे दिपवतो! |
स्वामीनारायण मंदिराचे प्रवेशद्वार... |
कालीपुर येथील हेच ते प्रसिद्ध स्वामानारायण मंदिर! |
कवी दलपतराम...यांचा अहमदाबादवासियांना कोण अभिमान...त्यांचे निवासस्थान जतन करून ठेवले आहे...त्यांच्या पंचधातूच्या पुतळ्यावर मुले तर उठता बसता खेळत असतात... |
अहमदाबादेच्या हेरिटेज वॉकमध्ये दाखवितात ते हेच मराठी घर! |
फाफडा...अर्थात तेल व मीठ टाकलेले बेसन कडकडीत तेलात तळले जाते...परंतू याची सर्वात मोठी खासियत आहे ती बनविण्याची पद्धत...गुजराती माणसाचा हा आवडीचा पदार्थ...मला त्यात सोड्याचे प्रमाण खुप जास्त आढळले... |

No comments:
Post a Comment