वणव्यात अर्धाधिक जळालेला चामरलेणीचा डोंगर |
आठवड्याभरात चित्र इतकं बदलू शकतं?एक तो दिवस, जेव्हा पाऊण तासातब्रम्हगिरीवर जाता येई. एक हा दिवस की,थोडंसं धावणे सूद्धा जमू नये. पाठीचा कुठलासास्नायू दुखावला आणि करंड्याच्या भटकंतीवरपाणी सोडावे लागले. म्हंटलं आज रविवार,जर बरं वाटतय तर शरीराचा परिक्षा घेऊनपाहू. गाठला चामरलेणीचा डोंगर. त्याचंवेगळंच रूप बघायला मिळालं. तंदूरूस्तीतबर्यापैकी उत्तीर्ण करताना एक वेगळाच धडा तोशिकवून गेला.
'लिडर'ने करंड्याची भटकंती घोषित केली. ती चुकविण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्र्यंबकमध्ये छानशी तंदूरूस्ती राखता आली होती. तोच माशी शिंकली. पाठीचा स्नायू असा काही दुखावला, की, चालायला सुद्धा त्रास. एक आठवडा कसाबसा काढला. अहमदाबादेची व्यवसायिक यात्रा पार पडली. परतल्यावर त्रास कायम होता. भल्या सकाळी चामरलेणीच्या डोंगराची वाट धरली. शिखर माथ्यावर न जाता लेणीं परिसरास फेरी मारून परत येण्याचा मनसुबा रचला. चालताना जाणवलं, त्रास आपोआप मिटला आहे, आज शिखर माथा गाठायला हरकत नाही.
आज रविवार असूनही चामरलेणीवर कमालीची शांतता होती. व्यायामप्रेमी मंडळींची अगदी तुरळक उपस्थिती.
वर जातांना डाव्या बाजुचा डोंगर जळालेला दिसत होता. कोणी तरी वणवा पेटवला होता. तो आता शांत होता.
गवत हे डोंगर पर्यावरणाचे अभिन्न अंग. काही किटक, पक्षी, प्राणी त्याच्या आश्रयाने जगतात. सह्याद्रीत
बहुतांशी डोंगरावर चराई व गवत कापून विकण्याची प्रथा गेल्या पाच पन्नास वर्षात वाढीस लागलेली, त्यामुळे
अगोदरच प्रभावित झालेली गवतीमाळ सृष्टी! माझी गमवलेली तंदूरूस्ती परतली होती, त्याचा विसर
पडून डोंगर वणव्याच्या खुणात गुरफटत गेलो. हळूवार चालत जळालेला डोंगर न्याहाळत उतरई सरू झाली.
दुतर्फा वणव्याने काळे राख झालेले गवती पट्टे दिसत होते.
उत्तर बाजूच्या टोकाकडे आल्यावर एका उंचवट्यावर पुढचे काहीच दिसत नाही, असं वाटतं डोंगरवाट संपली
आहे. पुढे भिषण कडा वाट रोखून आहे. पण तसे काही नाही, त्याच्या जवळ गेल्यावर एक वाट खाली उतरवते.
तिथला घसार्याचा पट्टा प्रसिद्ध आहे. यापूर्वी अनेकदा तो विनासायास पार झाला आहे. आज त्या ठिकाणी पाय
थबकले. घसरून जाऊ असे वाटू लागले. मग सगळ्यात जास्त घसारा आहे, तिथे परिक्षा द्यावीशी वाटली. त्यावरून
सावकाशपणे शेवटपर्यंत चालता आले. पण शेवटची तीन पावले टाकवली गेली नाही. माघार घेतली. माहितीच्या ठिकाणी माघार? स्वत:लाच म्हंटलं कितीवेळा हा परिसर सर्व ऋतूत
केला आहे. अशी माघार शोभते का? का नाही? आज धीर खचण्याचे कारण कळले नाही. कदाचित वणव्यात
जळालेल्या काळ्या गवतातून चालताना निराशा आली असेल.
पूर्व बाजूचे गवत वणव्यापासून वाचले होते. तिथूनच वेगवान वारे वाहत असल्याने खाल पर्यत धक पोहोचली नव्हती. लोकांच्या चालण्यामुळे मळलल्या वाटेने आगपट्ट्याचे काम केले. खाली उतरल्यावर सुंदरसा काटेसावर आणि एक पळस लालभडक, केशरी रंगात फुललेले दिसले. जळूनही डोंगर दुखी नव्हता. त्याने जणू शिकवण दिली,
नवा गडी नवा राज
नवा दिवस नवी सुरूवात
जळलं मेलं जळो मरो
प्रसन्नतेने नवी सुरूवात
सूर्य पहावे उगवतीचा
त्यातून घ्यावे तेज
अपयशाच्या खुणा पुसाव्या
झटकावे निस्तेज.
''जळूनही हसावं,
नव्याने सुरू व्हावं'',
हा धडा त्याने आज दिला.
- प्रशांत, २१/२/२०२१
।।जय हो।।
'नवा गडी नवा राज', आठवण करून देताना... |
पळसाला पाने तिन...आता कळलं ना का म्हणतात ते! |
वणव्याच्या खुणातून बाहेर पडल्यावर असे दृष्य म्हणजे बक्षिस! |
कडक उन्हात भडक पळस |
घर प्रसन्नतेने नटले...मागे रामसेजची उत्साहवर्धक छबी... |
या वरून सेल्फी फोटो घेणार? |
तर मग जपून...दगडावर फार जण उभे राहू नका...तो आधांतरी आहे. |
अर्धी बाजू वाचली आहे... |
जाळलो तरी संपलेलो नाही... |
जळाल्यावरही हसावंच... |
खुणा अग्नीकांडाच्या... |
खुणा अग्नीकांडाच्या... |
खुणा अग्नीकांडाच्या... |
काळे राख गवत |
श्रम करा...डोंगर चढा...सह्यसृष्टी नजरेत भरा... |
छान...साहस करा...काळजी घ्या... |
गिरीपुष्पाचे रखरकीत रान |
No comments:
Post a Comment