Saturday, June 11, 2016

औरंगजेब आणि मालोजीराजे भोसले...


दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला
घृष्णेश्वराकडे जाताना सतावल्यावाचून राहणार नाही...



हे आपल्याकडेच असं का होतं? एका इतिहास पुरूषाला देवालयात स्थान मिळतं, तिनशे वर्षांनंतरही त्याच्या स्मृतीस्थळाची नित्य देखभाल केली जाते, त्यावर दिवाबत्ती लावली जाते, अनं दुसर्‍याच्या वाट्याला येते प्रचंड हेटाळणी...

मालोजीराजे भोसले आणि औरंगजेब...भारताच्या इतिहासातली अत्यंत महत्वाची पाने यांच्या पराक्रमाने भरली आहेत. दोघांच्या भूमिका हिन्दूस्थानच्या दृष्टीने तशा परस्परविरोधी. मालोजी राजांनी अचाट बाहुबलाच्या जोरावर मैदानात मराठी पराक्रमाचा जिथे झेंडा रोवला, हिंदवी स्वराजाचे स्वप्न रंगविणार्‍या शहाजी या पराक्रमी पुत्राला जन्म दिला, तर औरंगजेबने आपल्या अत्यंत धुर्त राजकारणाने भारतवर्षावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली, हिन्दूस्थानची संस्कृत बदलण्याचा प्रयत्न केला,

मालोजीराजांचा जन्म १५५२ सालचा, विजापूर सुल्तानाविरुद्धच्या युद्धात इंदापूर येथे ते कामी आले, साल अंदाजे १६२० असावे. औरंगजेबचा जन्म १६१८ दाहेड इथला. त्मृयाचा मृत्यू १७०७ अहमदनगर येथे. वेरूळ  व खुल्ताबाद अशा एका शेजारी एक असलेल्या ठिकाणी या दोघांच्या समाध्या आहेत, परंतू आज या दोघांच्या स्मृतीस्थळांना परस्परविरोधी भाग्य लाभल्याचे दिसून येते, ते पाहून मात्र कुठल्याही देशाभिमानी स क्लेश झाल्या शििवय राहणार नाही. सुट्टीत देवगिरीच्या यादवांनी बांधलेला जगप्रसिद्ध देवगिरीचा किल्ला

सहकुटुंब बघण्याचा आमचा निर्धार होता...हो! नाही करता करता आम्हाला

मुहूर्त गवसला ता ७ जुनचा...सात जुन म्हणजे पावसाच्या आगमनाची

वैजापूरच्या शेतात बागडणारे काळविट...या परिसरात दहा 

हजारच्या आसपाद काळविट असून शेतकरी त्यांची उपस्थिती भाग्याची मानतात...
पारंपारिक तारीख...गेल्या अनेक वर्षांपासून ही तारीख चूकतेय खरी, पण

आज सकाळ पासूनच आभाळ दाटलेले होते...उकाडाही प्रचंड होता...
अगोदर वेरूळला घृष्णेश्वराचे दर्शन घ्यायचे व मग पुढे देवगिरीला कुच

करायची, असा आमचा बेत...
वाटेत वैजपुरला एका शेताच्या बांधावर आम्ही कडूनिंबाच्या झाडाखाली

न्याहारीचा बेत हाणला, त्यावेळी दोन काळविटांचे मनोहारी दर्शन

घडले...मोहिमेची सुरूवात तर छान झाली होती...
वेरूळ गावच्या वेशीवर  घृष्णेश्वर व भद्रा मारूतीकडे निर्देश करणारे फलक

दिसले. पुढे एका फलकाने लक्ष्य  वेधून घेतले, 'आलमगिर औरंगजेबकी

मजार'. तेव्हाच ठरवलं, भारताच्या एका बलशाली बादशाहच्या स्मृतीस्थळाला

भेट द्यायची...पण अगोदर घृष्णेश्वर..
हल्ली एखाद्या बड्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची म्हटलं की अंगावर

काटा येतो...एक तर देवळात जाण्याकरिता भाविकांवर नाना बंधने...असंख्य

वळणा वळणाच्या लांबच लांब रांगा...त्यात पिशवी आत नेऊ नका...फोन

नेऊ नका...आवारात थांबू नका...त्याउपरही देवालयात प्रवेश मिळवलात तर

नीट दर्शन घेण्याची सुविधा नाही...ना दोन क्षण तल्लीन होऊन देवाची

आराधना करण्याची परवानगी...
आमच्याकडे सप्तश्रृंगीकड, शिर्डी, काळाराम मंदिर, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर

मंदिरात जाऊन दर्शन घेणे केवढे अडचणीचे बनले आहे, याचा अनूभव

आम्ही घेतच असतो...तसाच अनूभव पंढरपूर, तुळजापूर, जेजूरी या

ठिकाणीही घेतला आहे, त्यामुळे  घृष्णेश्वरात आख्खा कुटुंबकबिला नेण्याच्या

विचार अंमळ अडचणीचा होता...
परंतू धार्मिक व ऐतिहासिक अंगाने अत्यंत महत्वाच्या घृष्णेश्वराचे दर्शन

घ्यायचे होतेच...आज घृष्णेश्वराला अजिबात गर्दी नव्हती...विशेष म्हणजे थेट

मंदिराच्या जवळ गाडी नेण्याची परवानगी, तेव्हा झटपट दर्शन घेऊन पुढच्या

प्रवासाला निघायला मिळणार! ही भावना सुखावणारी होती...
घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर एका पुरातन मंदिराने लक्ष्य वेधून

घेतले...संपुर्णपणे दगडात घडवलेल्या या देवालयाचे कोरिवकाम व एकुण

स्थिती पाहता, ते फार पुरातन मंदिर असावे असे वाटत होते, परंतू या

मंदिराला लक्तरे निघालेल्या दुकांनांचा वेढा पडल्याचेही दिसून आले...लांबून

दोन फोटो घेऊन आम्ही  घृष्णेश्वराकडे निघालो...

या कथित देवालयाच्या चहुबाजूंनी लक्तरलेली दुकाने, 

मातीचे ढिगारे व कचर्‍याचा ढिग दृष्टीस पडतो...
मोबाईल...कॅमेरे फेकून द्या...
पहिल्या चिंचोळ्या द्वारात पोलिस ओरडत होता, मोबाईल व कॅमेरे आत

नेऊ नका...आमच्यातील पाच जणांकडे मोबाईल होते...माझा कॅमेरा व गाडी

चालकाचे दोन मोबाईल, यांचे करायचे काय? हा प्रश्न येण्यापूर्वीच समोरचा

दुकानदार खुणेने बोलावत असल्याचे जाणवले...फार गर्दी नसल्याने आम्ही

सर्वजण त्या दुकानात गेलो...तिथे मोबाईल व कॅमेरे सांभाळण्याची व्यवस्था

होती...प्रती डाग ५/- रूपये या दराने ४०/- रूपये मोजले व आम्ही

घ्रुष्णेश्वराच्या देवालयात मार्गस्थ झालो...फार पायपीट न घडवता आम्हाला

पटकन गाभार्‍यात जाता आले...
पुरूषांना गर्भगृहात टॉपलेस जावे लागते, तर महिलांना मात्र थेट गाभार्‍यात

प्रवेश दिला जातो...
लाल फत्तरात कोरलेल्या दगडात मंदिराचे बांधकाम लक्ष्यवेधी

आहे...खासकरून मंदिराचा कळस व आतील स्तंभ...काही जणांच्या ब्लॉगवर

मी ही छायाचित्रे बघितली आहेत...त्या भाग्यशाली लोकांना देवळाची

छायाचित्रे घेता आली...मला मात्र कॅमेरा नेण्याची संधी मिळू शकली

नाही...अर्थात मी तसा प्रयत्नही केला नाही...हल्ली कॅमेरे नेऊ नका...फोटो

काढू नका! भाविकांवर व पर्यटकांवर असे निर्बंध लादण्याची प्रथा रूढ झाली

आहे...याचा मला प्रचंड तिटकारा आहे...

शिवस्पर्षाचा गंध...
याच मंदिराच्या प्रांगणात माझ्या राजाने खुल्या असमंताखाली राजपुत्र

संभाजींसह मुक्काम केला होता...'पिता पूत्र कोठे थांबले असतील'...'त्यांनी

काय काय बघितले असेल', कशा अशा ना ना विचारांनी अंगावर रोम उभे

राहिले...
पुरंदरच्या तहात सर्वस्व गमावल्यानंतर संभाजींना पंधरा हजाराची मनसब

मोगल दरबारी मिळाली...शिवाजी राजांसाठीं शाही फर्मान निघाले...
''इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे. खातरजमेने यावे. म्हणजे भेटी अंती बहुत 

सत्कार पावुन माघारी जाण्याविषयी निरोप दिला जाईल''...

राजे मग उरल्या सुरल्या स्वराजाची उत्तम घडी बसवून निघाले आग्र्याला

बादशाहच्या भेटीला...औरंगाबाद मार्गे...
औरंगजेबने राजांसाठी खास पोषाख पाठवला होता...
''खुद शहजादा प्रमाणे अदब चालवावी, म्हणजे शिवाजी राजांच्या काफिल्याची 

उत्तम बडदास्त ठेवणे'' असे कडक फर्मान औरंगजेबने आपल्या तमाम

कुलफौजदार व महाल मोकासे यांना ताकिदपत्र देऊन पाठविले होते...
औरंगाबादचा सुभेदार सफशिकनखान मोठा घमंडी होता, त्याने शिवाजी

राजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परंतू राजांनी त्याची शेखी जिरवली

तेव्हा, बादशाहची गैरमर्जी होईल या भितीने खान सुतासारखा सरळ झाला...
औरंगाबादेत काही काळ मुक्काम केल्यानंतर राजे पुढच्या प्रवासाला देवगिरी,

वेरूळ मार्गे निघाले...
भोसले हे मुळचे वेरूळचे...घृष्णेश्वर त्यांचे कुलदैवत...तेव्हा राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली...बालसंभाजीसह राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. राजांनी नजिकच्या कैलास लेण्यांचे दर्शन

घेतले...''कोण कलाकार असतील ते'', कैलास मंदिराची रचना बघून,

''साधूतत्वाशिवाय अशी अजोड रचना शक्य नाही'' असे राजांचे उद्‌गार

होते...तिथले मुर्तीकाम व मंदिराची रचना बघून राजे स्तिमित झाले...
राजे परत घृष्णेश्वर मंदिरात परतले....मंदिराच्या प्रांगणात राजांनी दोनवेळा

भोजनप्रसाद घेतला...राजांनी मंदिराच्या बाहेर खुल्या आसमंतात रात्र

काढली...आग्य्राला बादशाच्या भेटीला निघताना केवढं बळ घेतलं असेल

राजांनी घृष्णेश्वराकडून...कोण कोणत्या विचारांची वादळं डोक्यात थैमान

घालत असतील...की राजे अधिक शांत झाले असतील इथल्या वातावरणात!

अशा या इतिहास प्रसिद्ध घृष्णेश्वराच्या दर्शनाने आम्ही सर्वजण हर्षोल्हासित

झालो...
शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे यांनी घृष्णेश्वर देवालयाचा जिर्णोद्धार

केला...शिवांजी राजांचे पिताश्री शहाजींचा जन्म वेरूळ गावचा...
घृष्णेश्वराचे समाधानकारक दर्शन घेऊन आम्ही वाहनतळाकडे आमच्या

गाड्यांकडे निघालो, परंतू घृष्णेश्वराबाहेर ऐटीत उभ्या असलेल्या त्या प्राचीन

देवालयासमोर आमची पावले पुन्हा घुटमळली...
लक्तरलेली दुकाने ओलांडून आम्ही देवालयाकडे जाण्यास निघालो, तेव्हा

मंदिराच्या चहुबाजूला आम्हाला कचर्‍याचे साम्राज्य दिसले...मंदिराच्या

पहिल्या पायरीवरच कोणीतरी चक्क प्रातर्विधी उरकली होती...इतके सुंदर

देवालय इतक्या घाणीत कसे? याची कोणी देखभाल का करत नाही?
आम्ही आत प्रवेश केला, पण आत देवाच्या मुर्ती ऐवजी एक समाधी दृष्टीस

पडली...आत प्रचंड कुबट वास येत होता...वटवाघळांच्या वस्तीमुळे त्यांच्या

मलमुत्रांने उग्रदर्प सर्वत्र सुटला होता...फार थांबण्याची आवश्यकता उरली

नव्हती...आम्ही तडक समाधीस्थळ सोडले व वाहनतळ गाठले...तिथल्या

दुकानदाराला विचारले, ही वास्तू कसली? मालोजी राजे भोसल्यांची समाधी

आहे! विजेचा एकच झटका बसला...भोसले घराण्याचे पराक्रमी

वंशज...घृष्णेश्वराचे सुंदर देवालय बांधणार्‍या मालोजी राजांच्या समाधीची

अवकळा बघवत नाही...
आज उभा महाराष्ट्र शिवाजी व शहाजींचे गोडवे गातो, पण शहाजींच्या

पराक्रमी पित्यांच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्गती व्हावी? बोचणारे अनेक

प्रश्न घेऊन आम्ही भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी प्रयाण केले...

भद्रा मारूती म्हणजे जमिनीवर झोपलेली हनूमानाची मुर्ती, अन्यथा हनुमान

हे उभ्या स्थितीतच दिसतात...निद्रास्थितीतले हनूमान तिन ठिकाणी बघायला

मिळतात, एक म्हणजे अलाहबादेत यमुना नदीच्या तिरावर व दुसरे जाम

सावली, मध्यप्रदेशात...
खुल्ताबादचे नाव पूर्वी भद्रावती होते...तिथला पराक्रमी राजा भद्रसेनवरून हे

नाव पडले असावे...हे रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे तिथे नित्य

नियमाने रामस्तूती गायली जायची...एकदा खुद्द हनूमान ही रामस्तूती

ऐकण्यासाठी भद्रावतीला आले...राम भजनात तल्लीन होऊन हनूमानाला झोप

लागली व ते तिथेच भाव समाधीत ते आडवे पडले...भद्रासेनाची रामस्तूती

संपल्यानंतर खुद्द हनूमानाला बघून ते चकित झाले व त्यांनी हनूमालाला

तिथे निवास करण्याची विनंती केली...तेव्हा पासून हनूमानाची भाव

समाधीतली मुर्ती विराजमान आहे...
औरंगजेबच्या समाधीस्थळाचे प्रवेशद्वार स्वच्छ रखरखाव असलेले...
याठिकाणी प्रचंड असा सिमेंट कॉंक्रिटचा सभामंडप तयार करण्यात आला

आहे...आतमध्ये सुद्धा फोन नेऊ नका...पिशवी नेऊ नका...कॅमेरा नेऊ

नका...पुन्हा या गोष्टी बाहेरच्या दुकानात जमा करण्याची कसरत...

पर्यटन मंत्र्यांनीच आता या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे...लोकांनी धार्मिक

पर्यटनाला जाताना सोबत मोबाईल फोन व कॅमेरे न्यायचे की नाही...जो तो

उठतो आणि या गोष्टींवर बंधने आणतो...बाहेर गावी या गोष्टी  एकतर

गाडीत ठेवणे सुरक्षित नाही...व एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे सोपविणे मोठे

जोखमीचे...दहशतवादाचा धोका जगात सर्वत्र असला तरी जगातील प्रमूख

पर्यटन स्थळी फोटो काढू दिले जातात ते कसे? ताजमहाल सारखी संरक्षित

वास्तू नाही...खजूराहो सारखे संरक्षित ठिकाण नाही...त्याठिकाणी सुद्धा फोटो

काढण्याची...फोन आत नेण्याची परवानगी आहेच ना...असो...
भद्रा मारूतीचे झटपट दर्शन आटोपले व आम्ही
खुलताबादेच्या वेशीच्या बाहेर पोहोचलो...एका भव्य मशिदीवर, मजार मोगल

सम्राट शहंशाह हजरत औरंगजेब (रह) हा फलक दिसला...हा रह म्हणजे

रेहमतुल्लाह या अर्थाने लिहीला असावा...याचा अर्थ ईश्वराची करूणा...
भारतावर निरंकुश सत्ता स्थापन करणार्‍या औरंगजेबचे स्मृतीस्थळ आहे तरी

कसे? आमची पावले या जुन्या वास्तूत वळली...पुर्णपणे काळ्या पाषाणात

हिन्दूस्तानच्या महापराक्रमी बादशाहची साधीशी कबर...
असंख्य कमानी व स्तंभात ही मशिद घडविली आहे...त्याला चुन्याची

रंगसभेदी व कडा हिरव्या व सोनेरी रंगात रंगविल्या आहेत...
आत गेल्यावर आम्हाला प्रथम हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी (रह) यांच्या

समाधीकडे नेण्यात आले...हे मुस्लीम धर्मातले २२वे व शेवटचे

खलिफा...औरंगजेब यांना आपला गुरू मानित...
हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांना दस्तूरखुद्द महंमद पैगंबर यांनी आपला

पोषाख दिला होता...हा पोषाख त्यांना अल्ला कडून मिळाला, तोच याठिकाणी

सुरक्षित ठेला आहे...रमजानच्या महिन्यात आठ दहा लाख भाविक या

पोषाखाचे दर्शन घ्यायला येतात, अशी माहिती आम्हीला मिळाली...
ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या बाहेर उजव्या बाजुला औरंगजेबचा

पुत्र आझमशाह व त्याच्या पत्नीच्या कबरी आहेत...कोणतेही छत नसलेल्या

या कबरी खुल्या आसमंताखाली आहे व त्यांना फक्त संगमरमरी दगडात

कोरलेल्या जाळ्या आहेत...
डाव्या बाजुला औरंगजेबची तशाच स्वरूपात समाधी आहे...परंतू तिचे

प्रवेशद्वार बाहेरून आहे...संभाजी राजांची हत्या केल्यानंतर पंचवीस वर्ष

औरंगजेब दख्खनमध्ये राहिला, परंतू दख्खन काही त्याला हाती लागला

नाही, अखेर नगरमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला...आपला देहांत

झाल्यावर आपले दफन गुरूचरणी व्हावे, वर कोणतेही छप्पर नसावे...टोप्या

शिवून कमावलेल्या रकमेतील फक्त १४ किंवा १२ आणे आपल्या कबरीवर

खर्च करावे अशी औरंगजेबची इच्छा होती...त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीची

ही कबर बांधली आहे...दहा बाय दहाची जागा असावी...तथापी चहुबाजूंना

संगमरमरी जाळीदार खिडक्या व प्रवेश द्वार संगमरमरात घडविले आहे...
कबरीचा जमिनीशी थेट संबंध असावा...असे औरंगजेबचे इच्छापत्र

होते...त्यावर सुगंध दरवळत रहावा याकरिता सब्जाचे एक रोप लावल्याचे

दिसून येते...संपूर्ण कबर ही संगमरममरात घडविली असून त्यावर पांढरी

चादर टाकण्यात येते व त्यावर गुलाबाची फुले टाकली जातात...औरंगजेबने

इच्छी व्यक्ती केली होती, त्याचे पालन आजही केल्याचे दिसून येते...
औरंगजेबच्या कबरीची आजही देखभाल ठेवली जाते...त्यावर सफेद चादर
टाकून रोज गुलाबाची फुले चढविली जातात...
ज्या भूमीवर त्याने अनन्वीत अत्याचार केले त्या औरंगजेबच्या वाट्याला

त्याच दख्खनेत तीनशे वर्षांनंतरही त्याच्या इच्छेनुसार सन्मान मिळाला...
वेरूळ व खुलल्ताबादेत दोन इतिहासपुरूषांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही

देवगिरीच्या किल्ल्याकडे कुच केली...देवगिरीचा वृत्तांत पुढील लेखात...

Friday, December 25, 2015

थर्टीफर्स्ट: हाईयस्ट पॉईंटवर


नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे...सर्वोच्च ठिकाणी एखाद्या डोंगरावर...एखाद्या कपारीत, गुहेत किंवा मंदिरात, किंवा एखाद्या नदीच्या खोर्‍यात मुक्काम करावा...सवंगड्यांसोबत किस्स्यांची मैफिल जमवावी...वाटल्यास सरणार्‍या वर्षाचे हिशेबठिशेब मांडावा...नवा संकल्प सोडावा, डोंगरावरची मंतरलेली पहाट, सूर्योदयाच्या साक्षीने नव्या वर्षाचे स्वागत करावे...

म्हणायला ती एक तारीख आहे...पण आमच्या सारख्या बहानेबाजांना त्याचे काय! आम्हाला तर सेलिब्रेट करायचे आहे, स्वत:ला एक्सप्रेस व्हायचे आहे, मग तो फिरंगी वर्षाचा अखेरचा दिवस का असेना...तोही चालेल. चला तर मग थर्डीफर्स्ट साजरा करूया!
या वर्षातल्या...२०१५मधल्या सगळ्या भल्या बुर्‍या गोष्टींचं आपल्या पुरतं संमेलन भरवूया. अर्थात जवळच्या दोस्त मंडळींच्या सोबतीने. पण हे संमेलन आपल्याला जमिनीवर भरवण्याची इच्छा नाही, म्हणजे आपल्याला हॉटेलात जाणे वगैरे आवडत नाही, असे नाही; पण आपल्याला हे सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाचे सेलिब्रेशन करायचे आहे...जमिनीपासून शेकडो मिटर किंवा फुट उंचीवरच्या ठिकाणावर.
...म्हणजे शहरातलं थर्टीफर्स्टचं वातावरण धम्माल असतं, पण आता तो गोंगाट नकोसा वाटतो. पूर्वी ढोल ताशा, डीजेचा दणदणात अंगात एनर्जी निर्माण करायचा, त्याचा आवाज कानातून डोक्यात शिरायचा, तासन तास भान हरपून थिरकायला खुप मजा यायची, पण गेल्या काही वर्षात इतका नानाविविध प्रकारचा गोंगाट वाढला आहे की, त्यातून आता सुटकाच ना ही, तेव्हा यांत्रिक पद्धतीच्या आवाजापासून लांब जावेसे वाटते. स्वत:ला एक्सप्रेस करायचे तर अशा प्रकारच्या गर्दी व गोंगाटापासून लांब जायला हवे, म्हणूनच आपल्याला या गोंगाटापासून दूर जायचे आहे. येणार ना तुम्ही?

 

तो असा मनस्वी भेटतो की...

आपलं टार्गेट आहे सह्याद्रीतला आडवाटेवरचा डोंगर. त्यातिथे काय काय वाढून ठेवलं आहे, नुसत्या कल्पनेने अंगात शहारे भराायला लागे आहेत. अहो! सह्यभेट म्हणजे साधी गोष्ट नव्हे.  तो असा मनस्वी भेटतो की, पुढचे अनेक दिवस त्यांची झिंग डोक्यात राहते आणि आठवणी तर दीर्घकाळ मनाच्या कप्प्यात साठवून राहतात. त्याची भेट कमालीची आनंदादायी, तेव्हा अशा सह्यगिरीच्या शिखर माथ्यावर मस्तपैकी मुक्काम ठोकण्याची काय मजा येईल, कल्पना करवत नाही. त्या डोंगरावर हुडहूडवून टाकणार्‍या थंडीचा खराखुरा आनंद घ्यायचा. स्वत:च्या हाताने चुलीवर मस्तपैकी आवडीचा बेत करायचा, टाक्यातलं नैसर्गिक मिनरल वॉटर प्यायचं आणि भल्या सकाळी उठून त्या भास्कराचं दर्शन घ्यायचं. डोंगरावरची पहाट, हा आपल्या मोहिमेचा हाय पॉईंट असेल.
सूर्य, आपला रोजचाच सोबती, पण आपल्या गावात त्याची जादु कळत नाही. डोंगरावरची पहाट म्हणजे एकदम डिफ्रंट बॉल गेम असतो. रानातून, डोंगरकड्यावरून दिवसभर मस्त पायपीट करून डोंगरमाथा गाठायचा, गुहेत किंवा टाक्याच्या बाजुला किंवा एखाद्या दूर्गशिखरायरच्या मंदिरात मुक्काम म्हणजे ए वन बेत ठरेल. रात्री मस्तपैकी शेकोटी भोवती एक एक करून सर्वांनी वर्षभरातल्या चांगल्या नी वाईट कामांची जंत्री मांडायची, तडीस नेण्यासाठी नवे संकल्प सोडायचे, गप्पा टप्पा, जोक्स वोक्स, गाणी बिणी सर्व पोतडीच खोलून टाकायची अनं धमाल थर्डीफर्स्ट साजरी करायची.
नव्या वर्षाी मग पक्षांच्या किलबिलाटासह भल्या सकाळी लवकर उठून स्लिपिंग बॅगच्या बाहेर पडायचं. आहे की नाही, नववर्षाची सर्वोत्तम सुरूवात! लागोलाग शेकाटी पेटवून पाणी गरम करायला ठेवायचं, सगळ्या झोपाळूंना जागं करायचं आणि निघायचं त्याच्या दर्शनाला. सकाळी सकाळी तो क्षितीजा आडून अलगद डोकावतांना बघण्या सारखे सुख नाही, तो क्षण आपल्याला मिस नाही करायचा.
त्याच्या नुसत्या आगमनाने आसपासच्या सृष्टीत केवढी चहल पहल होते...रंगाची काय ती जादू...क्षणा क्षणाला बदलणार्‍या छटा डोळ्यात अन डोक्यात मनमुराद साठवायच्या आहेत...त्या आसपासच्या डोंगररांगा व वृक्षराजींचा तो सिलहूवेट इफेक्ट...त्याचे अमिट चित्र हृदयात साठवायचे आहे...पक्षांची गगनभरारी नजरेत भरायची आहे आणि या वातावरणा आले मसाल्याचा घमघमीत चहा म्हणजे नववर्षाची आइडियल सुरूवात ठरेल.

काम तितकं सोपं नाही...

यंदाचा थर्डीफर्स्ट सह्याद्रीतल्या एखाद्या डोंगरमाथ्यावर साजरा करण्याची कल्पना आहे तर भन्नाट. पण काम तितकं सोपं नाही. राडेबाज मंडळींचा ससेमिरा नको, म्हणून आडवाटेचा गड निवडायचा. आपले किती अंतर प्रवास करण्याचे नियोजन आहे, यावर सर्व काही अवलंबून असेल. हरिश्‍चंद्रगड सारख्या लोकप्रिय ठिकाणी ओव्हरक्राऊडींगचा धोका कायम राहणार, त्यापेक्षा कमी वहिवाटीची ठिकाणे काय कमी आहेत का? वेळ थोडा असेल, कामावर लवकर हजर होणे गरजेचे असेल तरी फिकीरनॉट, तुमच्या जवळ पासचे ठिकाण सुद्धा निवडू शकतात की. आणि हो, आपल्या सारखेच निसर्ग व इतिहासाचा आदर करणारे दोस्तमंडळी अगोदरच येऊन थांबली असेल तरी काही बिघडत नाहंी, त्यांचे व आपले विचार जुळवून घ्यायचे, मनाचा हिरमोड होऊ द्यायचा नाही. उलट नवे दोस्त जोडता आले तर जोडायचे. हवं तर आपली वेगळा तळ बनवायचा, पण एकपेक्षा अधिक ग्रुप म्हणजे अडचण? असं मानण्याचे कारण नाही. हो! येणारे राडेबाज असतील तरी निसर्गाचा,आपल्या थोर इतिहासाचा मान राखण्याचे सांगुन बघावे, बहुतांशी लोक ताळ्यावर येतात, नाही तर सरळ फोन फिरवून प्रशासनाला कल्पना द्यायची. कारण गडांवर, डोंगरांवर गोंधळ माजवणार्‍यांना पोलिस, वन विभाग किंवा स्थानिक वन संरक्षण समितीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल यात शंका नाही. त्याकरिता गडावर जाण्यापूर्वीच नंबर्स मिळवून ठेवावेत.

अस्पष्टतेच्या चादरीआड...




चला तर मग लवकरात लवकर ठिकाण जॉटडाऊन करू, दोस्त मंडळींची लिस्ट बनवा. सोबत नेण्याच्या व न नेण्याच्या वस्तुंची यादी बनवा आणि लागा कामाला.
आपल्याकडे थंडीने चांगला जोर धरला आहे, त्यामुळे रानात व डोंगरावर सकाळी व सायंकाळी मंतरलेले वातावरण असेल याची खात्री बाळगा. त्यासाठी थोडं दूर प्रवास करण्याचे, पायथ्यापासून डोंगराचा माथा गाठण्याचे कष्ट सोसावे लागतील, पण या कष्टाचे चीज असे असेल की विचारू नका!
आडवाटेचा सोडा, तुम्ही तुमच्या परिचयाच्या डोंगरावर गेलात तरी तुम्हाला त्याची भेट मनस्वी आवडेल, कारण ही ठिकाणे अशी आहेत की त्यांचा कधी कंटाळा येणार नाही.
हवामान धुरस असल्याने आस पासचे डोंगर, दर्‍या म्हणाव्या तशा सुस्पष्ट दिसणार नाही, पण त्यातच खरी गंमत आहे. अस्पष्टतेच्या चादरीआडची सृष्टी काही औरच दिसते. तुमचा मोबाईल किंवा एसएलआर कॅमेरा नुसता धडाडू दे! सह्यकडे, डोंगरांवरच्या पुरातन वास्तू, पाण्याची  टाकी, गुहा, मंदिरे, पायर्‍या, गवाक्ष, पाने, फुले व अवघी वनसंपदा तुमच्या डोळ्याने टिपा की कॅमेर्‍याने प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय कराल यात शंका नाही.
एक मात्र काळजी घ्यायची, आपली आनंदयात्रा, तिचा शेवटही आनंदानेच करायचा. यासाठी डोंगरावर वावरण्याचे जे नियम ट्रेकर मंडळी पाळतात त्याचे कसोशिने पालन करायचे. सर्वात पहिली अट, ही काही कोणती स्पर्धा नाही, तेव्हा पुढे जाण्याची, डोंगर चढण्याची स्पर्धा निर्माण होऊ द्यायची नाही, कोणी करणार असेल तर त्याचा तिथेच दी एन्ड करून टाकायचा. काही वेळा सहज सोप्या वाटणार्‍या ठिकाणी सुद्धा तोल जाण्याचे, घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत, आणि डोंगरावर तुम्ही पडला तर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता असते. मदत आणि बचाव कार्य तर सर्वात कठिण होऊन बसते, त्यामुळे अशी वेळ येणार नाही हे भान कायम मनात ठेवायचे व आपल्या दोस्त मंडळींना त्याबद्दल जागृक करायचे. कोणी चांगल्या सूचनांची थट्टा करणारा असेल तर त्याला लगेच ताळ्यावर आणायचे.
डोंगराच्या पायथ्याच्या ठिकाणी वाडी वस्तीतून एखादा मार्गदर्शक घेणे प्रथम प्राधान्य ठेवावे, त्याकरिता योग्य ती रक्कम ठवरून घेणे. कोणी स्थानिक जर सोबत असेल तर त्यासाठी चांगली गोष्ट ती दुसरी नाही.  त्यामुळे कुठे अंधारात ये-जा करावी लागली तरी वाट चुकण्याचा संभव राहत नाही. डोंगरावरच्या वास्तू, महत्वाची ठिकाणे, पाणवठे यांची सहजपणे माहिती मिळते. शिवाय या मंडळींशी गप्पा मारून त्यांच्या परिसराची छान माहिती पण मिळू शकते.
सोबत गरम कपडे, शिधा सामुग्री, बॅटरी, पाण्याच्या बाटल्या, वही-पेन जरूर ठेवावे. ज्याठिकाणी जाणार असेल त्याची माहिती अगोदर वाचून काढावी, इतिहासाच्या खाणा खुणा बघायला, काही भौगोलिक वेगळेपण असेल तर ते बघायला उपयोगी ठरते.
ही ठिकाणे ना मद्यपान करण्याची ना मांसाहार शिजविण्याची, असे काही प्रकार करण्याची उत्कट इच्छा असेल तर तुमच्या गावातच थांबलात तर बरे. शिवाय असा काही कार्यक्रम केला तर, थर्टीफर्स्टच्या रात्री वर्षातले सर्वाधिक अपघात घडतात हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा जणू शिरस्ताच बनला आहे. हे दुर्दूैवी असल्याने पोलिस व प्रशासनही पहाटेपर्यंत मोक्याच्या ठिकाणी तपासणी करून तळीरामांना कोठडीत विश्रांतीसाठी पाठवते, तेव्हा खरी झिंग ही निसर्गभेटीची येऊ द्या!

काय करावे...काय करू नये!!

निसर्गाच्या सानिध्यात थर्डीफर्स्ट साजरा करण्यासारखी भन्नाट कल्पना नाही, त्यासाठी खर्च खुप थोडा येतो व वस्तूही फार थोड्या लागतात.
१.) मुक्कामाचा अवधी बघून वापरण्याजोगे कपडे. कपडे निवडताना संपुर्ण शरीर झाकणारे पुर्ण बाह्यांचे शर्ट किंवा टॉप व पूर्ण बॉटमची पॅन्ट. हवं तर एखादा जादा ड्रेस नेऊ शकता व नाईटसाठी सुटसूटीत ड्रेसही चालू शकतो. दिवसा मात्र भाजून काढणारे उन असू शकते. जंगलातून चालताना शरीराला काटे टोचू शकतात किंवा झाडांशी घर्षण होऊन अंग सोलवटू शकते, हे ध्यानात घेऊन शरीर पुर्ण झाकणारे कपडे असावे, हाफ, थ्री फोर्थ बिलकुल नको. हिवाळा असल्याने पर्याप्त गरम कपडे हवे.
२.) ग्रुपच्या आकारमानानुसार व मेन्यू नुसार भांडी घ्यावी व पर्याप्त शिधा सामुग्री प्रवासाच्या सुरूवातीलाच प्रत्येकाकडे समसमानपणे द्यावी. पोर्टेबल स्टोव्ह असणे आवश्यक व उपयुक्त ठरेल. त्यामुळे अकारण लाकुडफाटा जाळण्यापासून वाचवला जाऊ शकतो. पोर्टेबल नसेल तर नेहमीचा स्टोव्ह सुद्धा चालेल. स्टोव्ह करिता रॉकेल मात्र स्वतंत्र बाटलीत भरून घ्यावे. काकडी, संत्रा, मोसंबी, लिंबु या सारखे ताजे पदार्थ कमालीचे समाधान देतात.
३.) कॅमेरा व नोंदवही, दुर्बिण, चघळण्यासाठी सुकामेवा, आवळा कॅन्डी, इलेक्ट्रॉल पाऊडर व गरज भासल्यास घरी तयार केलेला चिवडा किंवा भाजलेले मुरमुरे सोबत न्यावे. पाकिटबंद पदार्थ डोगरांवरच काय, घरात सुद्धा खाणे सुरक्षित नाही, तेव्हा त्यांचा विचार नकोच. उलट त्यांच्या सेवनाने होणारे स्लो पॉयझनिंक ध्यानात घेऊन आपल्या आईने, ताई किंवा कुटुंबातल्या सदस्यांचा प्रेम व जिव्हाळा असेलेले घरचे पदार्थ सर्वात उजवे ठरतात.
४.) मद्य, मांसाबरोबरच आवाज करणार्‍या कुठल्याही वस्तु नको, त्यात वाद्य व फटाकेही आलेच. या गोष्टी कुठल्याही डोंगरावर नेण्यास बंदी आहे. त्यामुळे कारवाई होऊ शकते, हा भाग निराळा, परंतू आपल्या इतिहासाचा अनमोल ठेवा असलेल्या गडांवरचे पावित्र्य नष्ट होते व आपल्या हातून आपल्या महान वारशाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होते.
५.) डोंगरावरचे पाणीसाठे मर्यादित आहेत, त्याच प्रमाणे डोंगराच्या पायथ्याच्या वाडी वस्तीतही पाण्याची फार चांगली स्थिती नाही. आपल्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही, ते दुषित होणार नाही ही काळजी सदोदित घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अंघोळ करणे टाळावे, ते जर आपण योग्यरित्या करू शकलो, तर आपल्या नंतर येणार्‍यांना कुठलाही त्रास होणार नाही व स्थानिक मंडळी आपल्याला अडचण न समजता, समजुतदार पर्यटक म्हणून मानायला लागतील व त्यांचा सर्वांना फायदा होऊ शकेल.
६.) आपल्या हातून डोंगराच्या देवतेचे पूजन घडणार असेल ते ती चांगली गोष्ट असेल. त्याकरिता नारळ, धुपबत्ती व थोडा प्रसाद सोबत न्यायला हरकत नाही, शिवाय गडावरच्या पाण्यानेच त्यांना अभिषेकही घातला जाऊ शकतो.
७.) एक वेगळी कल्पना: असा भन्नाट कार्यक्रम फक्त मित्रांसोबतच होऊ शकतो असे नाही, कुटुंबाचाही विचार करा. यावेळेला कुटुंबालाच अशा एक्झॉटिक ठिकाणी नेता आले तर. नक्की विचारकरा. कुटुंबातल्या सगळ्यांना मानवेल, अशी निसर्गाची अनेक ठिकाणे आहेत जी रिसोर्ट व हॉटेल उद्योगाच्या पलिकडची आहेत. कुठल्याह सुख सोयी, रुम सर्व्हिस शिवाय कशी धमाल करता येऊ शकते, हे तुम्ही दाखवून देऊ शकते अशी ठिकाणे तुम्हाला बक्कळ सापडतील. जाणकारांशी चर्चा करून असे एखादे सर्वस्वी वेगळे ठिकाण शोधणे काही अवघड नाही. फक्त मंडळी पायी किती चालू शकते हा विषय आहे. आणि फार पायी चालणार नसेल तरी तशा प्रकारची ठिकाणे आहेत. नाहीच काही तर एखाद्या शेतावर किंवा एखाद्या कृषी पर्यटनाच्या ठिकाणी, वणी, ब्रम्हगिरी सारख्या ठिकाणी तुम्ही कुटुंबाला मुक्कामी नेऊ शकता. फक्त थोडी अधिक तयारी करावी लागू शकते, इतकेच, पण हा विचार जरूर करून बघा!

Friday, March 27, 2015

कोणाचा गुजरात? गांधींचा...सरदार पटेलांचा...मोदींचा

कोणाचा गुजरात? गांधींचा...
दक्षिण गुजरातेत खेडोपाडी हेच चित्र...असं वाटतं तुम्ही पंजाबात आला आहात की काय? ईतका पाणी ईथल्या पाटातून झुळू झुळू वाहताना दिसतं...नवसारी जवळच्या सरपोरमध्ये तर शेतकर्‍यांची वर्षात दुसर्‍यांदा भात पिक घेण्याची तयारी सुरू होती!

गिरीषभाई पटेल यांच्या हवेलीचा भलामोठा वासा आणि त्यावर शंभरवर्ष जुने बांबुचे छत!

ब्रिटिश स्थापत्याचा अप्रतिम नमुना...भडोच जवळचा हा सुवर्ण
पुल...लोखंडाचा ईतका सुरेख वापर क्वचित बघायला मिळतो...
सौंदर्याच्या पातळीवर हा पुल देखणा आहेच, पण टिकाऊपणा?
आपली आजची बांधकामे बघुन दया येते...भडोच जवळच नवा
पुल बांधलाय, पण तो अनेक ठिकाणी तडे पडल्यामुळे धोकादायक
बनला आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी असूनही लोग या गोल्डन
पुलावरूनच ये-जा करणे पसंद करतात...

गांधीजींची दांडी यात्रा म्हणे या पुलावरून गेली होती!

साबरमती आश्रम: या आश्रमात गांधीजी बारा वर्षे राहिले होते!


सरपोरचे शेतकरीमित्र गिरीषभाई पटेल यांची 'साबरमती आश्रमात टिपलेली छबी!

साबरमती आश्रमात गांधीजींची अनेक तैलचित्र...त्यांच्या हयातीत तयार झालेली आहेत!

साबरमती आश्रमातून दिवसा दिसणारा साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचा रूबाब...

...आणि रात्री साबरमती आश्रमातून दिवसा दिसणारा साबरमती रिव्हरफ्रंट असा डोळे दिपवतो!

ठेकेदार असो की, पुढारी की, सरकारचे अधिकारी... या मंडळींनी पैसे अजिबात खाल्ले नसावे, इतका कामाचा सुरेख दर्जा बघितल्यावर, एखाद्या मेाठ्या सार्वजनिक प्रकल्पात खाबुगिरीच झाली नाही? हा प्रश्न एक महाराष्ट्रीय नागरिक म्हणून नक्कीच डोकावतो! ईतकी आम्हाला महाराष्ट्रातल्या प्रकल्पात दर्जाहिन कामे बघण्याची सवय झाली आहे का?


अहमदाबादेतले हे सर्वात मोठे स्वामीनारायण पंथाचे मंदिर...लाकडावरची कलाकुसर व मंदिराचा सुंदर रखरखाव...पर्यटकांना जुन्या अहमदाबादेची ओळख करून देणारी पारंपारीक सैर या मंदिराचा गेल्या २२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला उपक्रम आहे...
साबरमती रिव्हर फ्रंट प्रकल्प अहमदाबादेची नवी ओळख आहे....याठिकाणी स्वच्छता व रखरखाव उत्तम आहे...नदीत अजिबात केरकचरा दिसत नाही....शहराचे सांडपाणी त्यात मिसळले जात नाही...इथले बगिचे नागरिकांसाठी खुले असतात...तिथल्या बाकांवर बसुन तु्म्ही निवांतपणा अनभवू शकतात...बाकी शहराची धावपळ, वाहतुकीची पसारा आपल्या पुण्या मुंबईपेक्षा कमी नाही...हा त्यात बेलगामपणा बर्‍याच अंशी कमी असल्याचे जाणवते!

स्वामीनारायण मंदिराचे प्रवेशद्वार...

कालीपुर येथील हेच ते प्रसिद्ध स्वामानारायण मंदिर!

कवी दलपतराम...यांचा अहमदाबादवासियांना कोण अभिमान...त्यांचे निवासस्थान जतन करून ठेवले आहे...त्यांच्या पंचधातूच्या पुतळ्यावर मुले तर उठता बसता खेळत असतात...



अशा चिंचोळ्या बोळातून पर्यटक हेरिटेज वॉकच्या निमीत्ताने अहमदाबादेच्या पोळ संस्कृतीचे जवळून दर्शन घेतात...हे पोळ म्हणजे काय तर शहरातील लहान लहान वसाहतीच...अशा वसाहती, त्यांचा आधार एक समान विचारधारेच लोक जिथे राहतात व ज्यांच्या परंपरा, नियम, नीती, परंपरा समान आहेत...अशा या गुण्या गोविंदाच्या वसाहती...एक एका पोळमध्ये चार चारशे कुटुंब सुद्धा राहतात, इतक्या या मोठ्या सुद्धा आहेत...
अहमदाबादेच्या हेरिटेज वॉकमध्ये दाखवितात ते हेच मराठी घर!

हा खरा मुखवास...वेगवेगळ्या प्रकारच्या सुपार्‍या...बडीशेप...व त्यांना सुगंध आणणारे पदार्थ...गुजराथी माणसाने मात्र समज करून घेतलाय की, प्ला्टिकच्या पाकिटात मिळणारा गुटखा म्हणजेच मुखवास...या गुटख्याने गुजरातची प्रतिमा रयाला नेली आहे...

सोळंकी...भिल्ल...वाघेला आणि नंतर दिल्लीच्या सुलल्तनाचे अधिपत्थ्य राहिलेलेले साबरमती नदी काठचे गुजराथचे सर्वात महत्वाचे शहर अहमदाबादचे खरे नाव कर्नावती...१४११मध्ये अहमदशहाने आजच्या अहमदाबाद नगराची स्थापना केली...
या अहमदशहाची कबर व शहरातील सर्वात मोठ्या जुम्मा मशिदीची अवस्था सोचनिय आहे...मळकटलेल्या...कळकटलेल्या वातावरणात आज ही शहरातील सर्वात महत्वाची वास्तू एकेकाळी शहराचे मोठे वैभव होते...


तेलात खोलवर तळलेली दाळिचे पदार्थ म्हणजे गुजराती माणसाची पहिली पसंद...परंतू आजच्या जमान्यात जिथे अन्नपदार्थाचा दर्जा घसरलाय आणि आधुनिक जीवनशैलीमुळे हेच पदार्थ लोकांच्या मुळावर उठलेत तिथे अशा पदार्थाचे बेसुमार सेवन कितपत योग्य आहेत?

फाफडा...अर्थात तेल व मीठ टाकलेले बेसन कडकडीत तेलात तळले जाते...परंतू याची सर्वात मोठी खासियत आहे ती बनविण्याची पद्धत...गुजराती माणसाचा हा आवडीचा पदार्थ...मला त्यात सोड्याचे प्रमाण खुप जास्त आढळले...

गांधींचा...सरदार पटेलांचा...मोदींचा...उद्योजकांचा...शेतकर्‍यांचा...व्यापार्‍यांचा?



शिवजयंती, अर्थात तिथी नुसार फाल्गुन कृष्ण तृतीया, इंग्रजी तारीख ८ मार्च २०१५

रोजी अचानकपणे अहमदाबेदेला जाण्याचा योग आला...
हातात दोनच दिवस होते...मोदींचा गुजरात सातत्याने बघणे होत आहे...या माणसाचे

मोठे कौतुक वाटते, महाराष्ट्रातले पाणी त्यांनी गुजरातला नेऊन तिथल्या शेतीसाठी

भरपूर पाणी नेले...अगदी आमचे कॉंग्रेस प्रणित सरकार असताना व आत्ता

भाजप-शिवसेनेची सत्ता असताना...त्यांच्या विकासाच्या मॉडेलपेक्षा त्यांचे पाणी

मिळविण्याचे मॉडेल मला जास्त विस्मयकारक वाटले...
बडोद्याजवळील करमसद या खेड्यात माझी मावशी राहते, त्यामुळे सरदारपटेलांचा

गुजरात बालपणापासूनच बघत आलो आहे...तेव्हा तो शेतकर्‍यांचा मुळीच नव्हता..होता

तो व्यापार्‍यांचा व काही प्रमाणात उद्योजकांचा...
म्हणतात ना! कवडीचे दान पलटते...इथे कवडीचे दान पलटले तरी कोणीच मागे जाताना

दिसत नाही...सगळेच पुढे...हा चमत्कार माझ्या महाराष्ट्रात का होत नाही?

तलवार, बंदूका, तोफा, बॉम्बगोळे अशा कुठल्याही शस्त्राशिवाय लढा दिला जाऊ शकतो!

ही विचार जगाला देणारे, नव्हे! तो प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविणारे राष्ट्रपिता

महात्मा गांधीचा गुजरात बघूया म्हटलं! गांधी तत्वज्ञान थोडे थोडे झिरपत असते

आपल्या मनात...यंदा या तत्वज्ञानाचा वेगळा पैलू बघायला मिळाला!
साबरमती आश्रमाला भेट देणे म्हणजे...एक रोमांचित करणारा अनूभव...काय गवसले या

भेटीत? माझ्या साठी जसा हा शोध अनमोल, तद्वताच तो समुच्या जगासाठी कमालीचा

महत्वाचा...तुम्ही त्याचे महत्व लवकरात लवकर ओळखणे गरजेचे आहे...खात्रीपूर्वक

सांगतो...जितके लवकर ओळखाल, तितके महत्वाचे!

नाशिकहून प्रथम आम्ही पोहोचलो ते नवसारीला...पुणे सुरत या महाराष्ट्र मार्ग परिवहन

मंडळाच्या एशियाडने...६० किलो मिटरचा नेत्रदिपक सापुतारा घाट उतरल्यानंतर वासंदा

अभयारण्या पासून ५ किलो मिटर अंतरावर सरपोर हे इनमिन २०० उंबर्‍यांचे खेडे आमचा

पहिला मुक्काम...याला खेडे म्हणावे की आणखी काही...या गावात दृष्टीस पडावे असे

एकही दुकान नाही...राज्य महामार्गावर वसलेले असूही बस थांब्यावर निवारा

नाही...गावात वर्दळ, गडबड-गोंगाट असा काहीही जाणवत नाही...या गावात लोक राहतात

की नाही? अशी शंका यावी, इतकी शांतता...रस्त्याच्या कडेला, पाराखाली, मंदिरावर असे

कुठेही घोळके दिसले नाहीत...घरे म्हणजे जुन्या प्रशस्त हवेल्या किंवा मग सरळ सरळ

टुमदार कॉंक्रिटमध्ये बांधलेले बंगले...पंचवीस टक्के घरे रिकामी-कारण काय तर,

विदेशात नोकरी...

आम्ही गिरीषभाई पटेल यांच्या जुन्या हवेलीत मुक्काम केला...हा पटेल समाज म्हणजे

पक्का शेतकरी...संपुर्ण नवसारी परिसरात शेतीला भरपूर पाणी मिळते, त्यामुळे जास्त

पाण्यावर उगवणारी स्पायडर लिली जातीची फुले येथे फार मोठ्या प्रमाणावर घेतली

जातात...आपल्याकडे लग्नात वधु-वरास हार घातला जातो, त्यात या लिलीच्या पांढर्‍या

फुलांचा भरपूर वापर होतो...देवांनाही पांढरी फुले चढविण्याचा रिवाज...शिवाय यांचा

हलका, मादक गंध दिर्घकाळ टिकतो...दहा दहा फुलांचे गड्डे रबराने बांधुन त्याचे डाग

तयार केले जातात व हा माल देशभरात बसने किंवा खासगी वाहतुकीच्या मदतीने

पाठविला जातो...दुसर्‍याच दिवशी फुले बाजारात येतात व हार वाल्यांना ताजी ताजी

मिळतात...या हाराची किंमत सर्वाधिक येते...माझा गिरीभ्रमणातला मित्र राहुल सोनवणे

याच्यामुळेच गिरीषभाई सारख्या मितभाषी शेतकर्‍याची ओळख झाली...त्याच्या हवेलीचा

पाहूणचार मिळाला...

गिरीषभाईंचे घर म्हणजे तीन भावंडांचे एकत्रित कुटुंब, प्रत्येकाला प्रशस्त स्वयंपाक घर,

बैठकीची मोठी खोली व मागे अंगण...अंगणात गायीचा गोठा, विहीर, स्वच्छतागृह...बंब

पेटविण्याची जागा...परसबाग असा देखणा रूबाब...
सागवानी चौकोन तासलेल्या भल्या लंब्या वाशांवर जाडजुड बांबु ठेऊन त्यावर मध्यम

आकाराचे आडवे बांधु रचून केलेले माळे या परिसरात सर्वच हवेल्यांचे खास

वैशिष्ट्य...अशा प्रकारच्या घरात कधी उन्हाचा चटका लागत नाही, की कधी थंडीचा

कडाका, असे गुण वैशिष्ट्य सांगतांना, गिरीषभाईंनी हवेलीला व त्याच्या बांबुच्या देखण्या

छताला शंभर वर्षे पूर्ण झाल्याची माहिती दिली...

'बांबुला वाळवी लागल्याने त्रस्त असून, लवकरच ही जुनी हवेली पाडून त्याठिकाणी

नव्यापद्धतीचे घर उभे करणार' असल्याचे त्यांनी सांगितले...बांबु तोडण्याचा काळ व मुहुर्त

फार महत्वाचा आहे...तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पौष महिन्यात आमावस्येला किंवा

त्याच्या नंतर तिनएक दिवसात तो तोडला तर त्याला कधी किड लागत नाही! असे

बांबुच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी खात्रीपूर्वक सांगतात! मला वाटतं, शे-सव्वाशे

वर्षांपूर्वी या बांबुचा वापर करताना सरपोरच्या कारागिरांनी या गोष्टींचा कटाक्ष पाळला

होता की नाही? अशी शंका मनात आली...

गिरीषभाईंचे काही नातलग न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेत व्यापार निमीत्ताने स्थायीक

झाल्यामुळे त्यांना आपल्या हवेली सोबतच आणखी दोन हवेलींची देखभाल ठेवावी

लागते...घरात गाईचा गोठा आहे व आठ पैकी सर्व दुभत्या गाईंचे दूध ते स्वत: किंवा

त्यांच्या सौभाग्यवती काढत असतात...गाईचे शेण व गोमुत्र त्यांच्या लिलीच्या बागांना,

तसेच उस व आंब्याला जाते...

शेतीप्रधान सरपोर म्हणजे दक्षिण गुजरातच्या वैभवाचे प्रतिक...या गावात, विकास

कशाला म्हणतात? हे बघुन माझे डोळे दिपले...प्रत्येक घराला दररोज ३० लिटर शुद्ध

केलेले पिण्याचे पाणी, वापरण्यासाठी बर्‍यापैकी स्वच्छ पाणी...पिण्याच्या पाण्याचा

आधुनिक फिल्टरेशन प्लांट...त्यावर देखरेख करण्यासाठी सरकारचा एक पूर्णवेळ

कर्मचारी...

शेतीसाठी दर पंधरवड्याला कॅनॉलचे पाणी येते...ते बघुन आपण पंजाबमध्ये असल्याचा

भास होतो...त्यामुळे भरपूर पाण्याच्या पिकांची या ठिकाणी रेलचेल आहे...जास्त पाण्यावर

होणार्‍या लिलीच्या बागात एक दोन मजुर नियत्यनियमाने फुले खुडताना

दिसतात...एकदा लावली की ही झुडपे कायमस्वरूपी फुले देतात...
प्रत्येक शेता पर्यंत पक्का, बांधलेला, दर्जेदार रस्ता, ज्यावर खड्डे असण्याची संभावना

खुपच कमी...गावातील अंतर्गत रस्ते कमालीचे उत्तम...सद्या कॉंक्रिटच्या पेव्हर

ठोकळ्यांची रचता करून हे रस्ते तयार केलेत...परंतू पाच वर्षे झाली तरी ते दुभंगले

नाहीत, यावरून कामात घोटाळा झाला नसावा, याची प्रचिती येते, अन्यथा आमच्या

नाशिकला पेव्हरच्या रस्त्यांचा केव्हाच निकाल लागलाय...ठेकेदार, नेते व अधिकार्‍यांनी

त्या पैशाचे केव्हाच ढेकर दिलेत...

अंतर्गत गावाचे व गावांना जोडणारे रस्ते इतके छान पद्धतीचे की, गोव्याच्या रस्त्यांची

आठवण व्हावी...सर्वत्र उन्हाची रखरख असताना, या परिसरातील शेतमळे पिकपाण्यामुळे

हिरवेकंच...प्रत्येक बांधावर अनेक मोठमोठे वृक्ष! हा स्वर्ग निर्माण करणार्‍या नेतृत्वाला

सलाम! तोच मनामध्ये लालसा निर्माण झाली, आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला हे दिवस

येऊ शकतील? या परिसरात वर्षात दोनदा भात घेतला जातो, दुसरा भात हा उन्हाळ्यात,

इतका पाण्याने समृद्ध असा हा दक्षिण गुजरातचा कृषीप्रधान परिसर रात्री अंधार दाटेपर्यंत

बघत राहिलो...दुसर्‍यादिवशी भल्या सकाळी अहमदाबादेच्या दिशेने कुच केली...

गुजरातचे रस्त्यांचे जाळे समृद्ध आहे, हे सांगणे न लागे!, परंतू बडोदा-अहमदाबाद

द्रुतगतीमार्ग बघितल्यानंतर तुमचे डोळे विस्फारतील...शंभर किलो मिटरच्या या मार्गावर

दुतर्फा नाना तर्‍हेची झाडी लावण्यवात आली...महामार्ग तयार करतानाच ती लावण्यात

आली होती...ती पूर्णपणे जगविण्यातही आली, आता फाल्गून महिन्यात फुलणार्‍या

काटेसावर, पळस, बहावा आदी महत्वाच्या वृक्षांचे बहर डोळेभरून बघायला

मिळाला...रस्त्याच्या दुतर्फा हिरवी कंच शेती व नानाविविध पिके बघून, डोळ्यावर येणारी

डुलकी आपण रोखून धरतो व या मार्गाचा थाट डोळ्यात समावण्याचा प्रयत्न

करतो...तंबुखुची लांबच लांब शेती मात्र मनाला खुपत होती...इतक्या तंबाखुची गरज

काय? असा तंबाखुविरोधी विचार चटकन मनाला स्पर्ष करून जातो...

वाटेत आम्हाला भरूच गावाला जाताना ब्रिटिशकालीन गोल्डन पुल लागला...या पुलाचा

रूबाब गिरीषभाई व त्यांचा शेतकरी सहकारी शैलेशभाई तोंडभरून कथन करत

होते...अंकलेश्वर व भरूच यांना जोडणारा, नर्मदेच्या अफाट पात्रावरचा हा पुल १८८१

साली पुर्ण झाला...त्यावेळी त्यावर ४५.६५ लक्ष रूपये खर्च आला होता...गांधीजींचे

मीठसत्याग्रही याच मार्गावरून गेले असावेत...

अहमदाबादेत मला जे यंत्र हवे होतो...त्याचा प्रथम सौदा पक्का केला! दुपारचे गुजराती

पद्धतीचे भोजन साबरमती आश्रमात घेऊ या इराद्याने, पत्ता विचारत विचारत आमचा

प्रवास सुरू झाला, तोच पहिला धक्का दिला एका विक्रेत्याने - आपको साबरमती आश्रम

जाना है तो? अॅड्रेस क्या है?

साबरमती आश्रमात आणखी एक धक्का बसला, त्याठिकाणी भेट देणार्‍यांसाठी

भोजनालच नाही...आमची गाडी पुन्हा वळवून नजिकच्या हॉटेलात दुपारचे जेवण उरकून

परत साबरमती आश्रमात दाखल झालो...
महात्मा गांधींनी स्थापन केलेला हा अत्यंत महत्वाचा आश्रम...या आश्रमात त्यांची

खोली, विविध वस्तू, पुस्तक दालन, गांधींकालखंडाचा पट उलगडणारे माहिती व चित्र

प्रदर्शन, पुस्तक भांडार बघण्यासारखे...

पुस्ताक भांडारात गांधीजींवरची कितीतरी पुस्तके...या समुद्रातून आपल्याला कोणते

पुस्तक हवे आहे? असा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न मनात होता...तोच उत्तर सापडले,

त्यांच्या आंदोलनावर, त्यांच्या तत्वज्ञानावरची पुस्तके सर्वच ठिकाणी मिळू शकतील, त्या

ऐवजी माझ्या संकल्पीत लघुपटाच्या विषयाला पुरक ठरू शकेल, अशा ग्राम

स्वराज्यावरचे पुस्तक मिळाले....हिन्दी आवृत्ती, किंमत रूपये ६०/- मात्र...लगेच उचलले!

दुसरे पुस्तक अत्यंत महत्वाचे गांधींजींचे आहार विषयक पुस्तक! Diet and Diet

Reforms...गांधींची शरीरयष्टी बघून, वाटायचे, ते तर सारखे उपोषण करत, खुप कमी

खात, स्वत:ला भरपूर कष्ट देण्याची त्यांची सवय...परंतू या पुस्तकात गांधींचा आहार

किती पोषक होतो, हे बघुन अचंभित व्हायला होते...स्पष्टच आहे, जगातले मातब्बर

सत्ताधिश ब्रिटिशांना आपल्या तत्वांनी हालवणारे गांधी शरीराने कमजोर नसावेत!

'आपलाच तो भ्रम होता'...झालेही तसेच....त्यांचा आहार खुपच सकस होता, संतुलीत

होता व परंपरेला धरून होता, तरी ते प्रयोग केल्याशिवाय अंतिम मतापर्यंत पोहचत

नसत...
गांधीजी खुप चांगला आहार घेत...पॉलिश केलेला तांदुळ त्यांच्या तत्वज्ञानानुसार

ससर्वाधिक निषेद्य...त्याच प्रमाणे साखर...वनस्पती तुप आणि  यांत्रिक पद्धतीने तयार

केले जाणारे खाद्य तेल...शरीराला आवश्यक असणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स व इतर घटक

व्यवस्थित मिळावे, अशी आपल्या आहाराची जुनी रचना...गांधीजींनी मात्र जो आहार

निर्धारीत केले, त्याची शास्त्रीय पद्धतीने तपासणी सुद्धा करून घेतली...अनुभव घेतला व

नंतर त्याचा लोकांना या पद्धतीचा आहार घेण्याचा सल्ला दिला...त्यांच्या हरिजन, यंग

इंडिया या नियतकालीकातील लेखांबरोबरच गांधीजींनी आहारावर स्वत: केलेल्या

लिखाणाचा खजिनाच या पुस्तकरूपाने प्राप्त झाला आहे...
आपण आज अन्नपदार्थाचा दर्जा खालावल्याचे म्हटतो...त्याचे दृष्य परिणामही सद्य

सर्वात्र दिसत आहेत...धडधाकट, सुस्थितीतला कोणी तरी परिचीत दगावतो, तेव्हा कळते,

कर्करोग झाला होता...चरबीचे प्रमाण अधिक होते...हृदयविकार होता...यकृत, मुत्रपिंड

निकामी झाले होते...हे असे आजार काही अचानक उद्‌भवत नाहीत...पण त्याचा झटका

मात्र अचानक बसू शकतो...गांधीजींनी मात्र त्याच वेळी व्यापारी, उत्पादक व विक्रेते

कशापद्धतीने नकली माल बाजारात आणून लोकांच्या आरोग्याशी खेळताहेत यावर

लिखाण केल्याचे या पुस्तकात वाचायला मिळते...

आपण सगळ्यांनीच आपल्या अहारपद्धतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे...मानवी

शरीराला ८०% अल्कलीयुक्त व केवळ २० टक्के आम्लयुक्त आहाराची गरज आहे...आता

तुम्हीच विचार करा...तुमच्या आहारात कसले प्रमाण अधिक व कसले कमी आहे...सांगणे

न लागे की आजच्या वेगवान युगात अल्कलीयुक्त आहार घरी सुद्धा व्यवस्थित तयार

केला जाऊ शकत नाही...कारण ९०%च्या जवळपास अन्नपदार्थ हे आम्लयुक्त

मिळतात...त्यामुळे कर्करोग, हृदयरोग या सारखे आजार ही आधुनिक

जीवनशैलीची...बदललेल्या अन्नपदार्थाची देणगी आहे...
साखरेचा वारेमाप वापर वाढलाय...तांदुळ पॉलिश केलेलाच विकला जातो...कारण हातांना

काढण्यासाठी कोणालाही वेळ नाही...दुर्गम आदीवासी सुद्धा मिलवरचा निकस तांदुळ

खाताना दिसतात...तुप पुर्णपणे सिन्थेटिक बनले आहे...तेल यंत्रावरचे...तेलाच्या घाण्या

नामशेष झालेल्या...अन्नपदार्थाला चव...गंध व रंग आणणारे क्रुत्रिम पदार्थ पुर्णपणे 

आम्लयुक्त...गायीचे दुध मिळणे दुरापास्त...भाज्या, धान्यांचे देशी वाण नामषेष किंवा

अती दुर्मिळ...तेव्हा गांधींच्या युगात वाजलेली धोक्याची घंटा आता केवढी प्रखर झाली

आहे? याची जाणीव असू द्या व शुद्ध, सात्विक आहाराकडे वळा...

गांधीजींच्या 'हरिजन' व 'यंग इंडिया' इत्यादी नियतकालिकांतून त्यांनी आहार विषयावर

लिखाण केले आहे...त्यांनी ज्यावेळी लिहीण्यास वेळ नसे, त्यावेळी ते विविध विषयांवर

जगातील मान्यवर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेत...अशा अनेक लेखांचा संग्रहच आहे हे

गांधीजींचे, 'डायट अॅन्ड डायट रिफॉर्म'...आजवर, गांधीजी शाकाहारी होते, या पलिकडे

त्यांच्या आहारपद्धतीबद्धल कधी जाणूनच घेतले नव्हते...परंतू नाशिकमध्ये डोंगरभटक्यांचा

आमचा चमु जीवनशैलीचा अवलंब केल्यापासून आहाराबद्दल बरीच माहिती ग्रहण करू

लागलो आहोत...या मालिकेत  'डायट अॅन्ड डायट रिफॉर्म', हे पुस्तक अत्यंत मोलाचे

ठरणार आहे...तुम्हा सर्व वाचकांनी ते स्वत:कडे बाळगावे व आपली मनोभूमिका तशा

पद्धतीची ठेवली तर पुढचे जीवन कितीतरी अधिक सुखकारक ठरेल...भरपूर काम

करण्यासाठी उपयोगी ठरेल व मानसिक, शारीरिक बळ वाढविण्यास अतिशय पुरक ठरेल!

असा माझा विश्वास आहे...
साखर पुर्णपणे बंद, मिठ बर्‍याचदा वर्ज, तेल घाण्यावरचेच, तुप देशी, वनस्पती वर्ज, दुध

फक्त व फक्त गायींचे, म्हशीचे नको...शरीराचा पीएच कसा सांभाळाल? नकली अन्न

तयार करणार्‍यांची व विकणार्‍यांची अभद्र साखळी...अशा कितीतरी गोष्टींवर मौलिक

माहिती देणारे हे पुस्तक...

माझ्या या दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यात मला कितीतरी गोष्टींची भेट मिळाली, त्यात

आहार व ग्रामस्वराज्य या विषयावरचे पुस्तक अग्रस्थानावर आहे...

गुजरातच्या विकासाबद्दल आता फार काही बोलण्यासारखे नाही, आपले महाराष्ट्रातील

नेते, त्याबद्दल फक्त इर्षाच करत राहिलेत! तिथले लोक मात्र प्रत्यक्ष फळे चाखु लागली

आहेत...पूर्वी महाराष्ट्र अव्वल होता, आता आम्हाला गुजरात व्हावेसे वाटते, कधी

कर्नाटक, तर कधी हरियाणा, केरळ! इतके आम्ही मागे पडलो आहोत! पण याबद्दल

आपल्यालाच खेद व खंत! 'त्यांना नाही'!

हेरिटेज वॉक
या दौर्‍यात आणखी एक गोष्ट मनोमन आवडली, ती म्हणजे अहमदाबादेची हेरिटेज

वॉक...स्वामिनारायण मंदिराच्या वतिने, शहरातील बांधकाम, रोटरी व इतर संस्थांनी या

वॉकचे नियोजन केले आहे...१९९७ पासन अखंडपणे एकही दिवस न चुकता ही वॉक

होते...सौभाग्यवती उर्वशी रामैय्या व त्यांचे पती यांच्यापैकी कोणी एक जण ही वॉक

घेऊन जातो...उर्वशी यांना दहा वर्षांची मुलगी आहे...परंतू वर्षाचे ३६५ दिवस न चुकता

त्या पर्यटकांना घेऊन जात असतात...त्यांच्या सादरीकरण व संवाद केलेला दुहेरी सलाम!

गुजरातेत मला न आवडलेल्या गोष्टींपैकी, तळलेल्या पदार्थांचा आहारात असलेला

अतिरेकी वापर...यंत्राच्या तेलात तळले जाणारे हे चवदार पदार्थ गांधी तत्वज्ञानाच्या

पुर्णपणे विरोधातले...शिवाय या पदार्थांना चव आणण्यासाठी साखर, 'लिंबु पाऊडर', असे

गोंडस पण फसवे नाव असलेले सायट्रिक आम्ल व मिठाचे अती प्रमाण...आणखी एक

अतिशय वाइट सवय म्हणजे गुटखा बंदी असूनही वेगवेगळ्या पुढ्या मिसळून खाल्ला

जाणारा गुटखा...किती टक्के गुजराती लोक तंबाखु खात असतील ६०%च्या वर तर

नक्कीच! कारण मी महिलांना यातुन वगळत आहे...

साबरमती नदी सुशोभिकरण
गुजराथेतला मनाला भावणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणजे साबरमतीनदीचे

सुशोभकिरण...नदीच्या दुतर्फा प्रत्येकी १०.४ किलो मिटरचा विस्तार, अत्यंत मजबुत,

देखणे व आखीवरेखीव बांधकाम केले आहे...त्यावर बागा...चालण्याचे मार्ग, धावणे,

सायकलिंग अशा प्रकारांना प्रोत्साहन...
नदीत कचराच दिसला नाही...विद्युतीकरण, स्वच्छता व रखरखाव असा हा भला थोरला

प्रकल्प भारतातल्या तमाम नदीप्रदुषण विरोधी चळवळीला समर्पित झाला आहे...दुख

याचेच की आमच्या नाशिकच्यो गोदावरीसकट इतर सर्व नद्या मात्र कमालीच्या

प्रदुषित...
या नदीलगत १०,००० (दहा हजार) झोपडपट्टी धारक होते...सरकारने ५ एफएसआय

घोषित करून या झोपडपट्टीवासियांच्या निवासाची व्यवस्था केली...जी जागा मिळाली,

त्यातील दहा टक्के जागा नदीच्या सुशोभिकरणासाठी वापरून उर्वरीत जागेचा विकास

केला व त्यातून या प्रकल्पाचा पैसा उभा राहिला...
आमच्या नाशिकच्या गोदापार्कचा प्रकल्पा प्रत्येकी ५ किलो मिटर्सचाच, नदी लगत

मोठ्या प्रमाणावर (अहमदाबाद इतक्या तर नक्कीच नाही) झोपडपट्ट्या नाहीत, तरी पण

या प्रकल्पाला सुगीचे दिवस यायला तयार नाही...साबरमती नदीच्या तुलनेत गोदेचे पात्र

या ठिकाणी कितीतरी लहान आहे...तरी पण सबळ नेतृत्व न लाभल्याने हा प्रकल्प

आधांतरी लटकतोय!

Thursday, November 22, 2012

पर्यटन विकास: गड-कोटांच्या सत्वाची पुन्हा कसोटी!

किल्ले चंद्राई (चांदवड): अफाट खर्चाचा गाडीरस्ता
नाशिक, २१ नोव्हेंबर २०१२: `पर्यटन', हा शब्द अगदी सुटसुटीत आहे. त्यावरून इतका गोंधळ कसा होतो.  मला पर्यटन विकास हा शब्द कमालीचा अस्वस्थ करू लागला आहे, जेव्हा पासून तो गडकिल्ल्यांवर जाऊन पोहोचलाय. गावकुसातील पर्यटनस्थळा प्रमाणेच ही मंडळी गडकिल्ल्यांवरच्या पर्यटनाकडे बघु लागल्याने डोंगरच्या डोगर फोडले जाऊ लागलेत...डोंगरकडांवर कैक मिटर, किलोमिटर लांबीचे रेलिंग पाईप बसविले जाऊ लागलेत...गरज नसतना सौर दिवे...सिमेंट कॉंक्रिटच्या पायर्‍या...जिथे वर्दळच नाही अशा ठिकाणी घाट बांधले जाऊ लागलेत...हा आपल्या इतिहासावर, गडांच्या अस्तित्वार घाला तर आहेच, शिवाय जनतेच्या घामाच्या पैशाची उधळपट्टी आहे...अशा प्रकारचे पर्यटन म्हणजे महाराष्ट्राला जडलेला रोग, त्याचा मी संक्षिप्तपणे वेध घेत आहे. तज्ज्ञांनी, अधिकार्‍यांनी, चळवळ्यांनी तो सखोलपणे घ्यावा ही अपेक्षा!

किल्ले चंद्राई (चांदवड): चंद्रेश्वर मंदिरापर्यंत भलामोठा घाट बांधण्यात आला आहे...
थेट वरपर्यंत गाडी नेण्याची सुविधा! कशासाठी? त्याठिकाणी ना गडाचे अवशेष ना खिळवून
 ठेवू शकेल, असे निसर्गसौदर्य ना जुन्या काळच्या खाणाखूणा...
रामसेजवर रात्रीच्या वेळी कोण फिरायला जाणार. पण जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रमाणात लाईट लाऊन ठेवले. रात्रीच्या वेळी कुठली माणसे या सहज सोप्या गडावर जातील. तिथे पार्ट्याच होणार, दुसरे काही नाही.
किल्ले रामसेज: आता त्यावरचे सौर पॅनल, बॅटर्‍या,
 इतकेच नव्हे तर लाईट सुद्धा गायब आहेत...जिथे कोणत्याही 
संरक्षणाची व्यवस्था नाही...वीजेच्या दिव्यांची अजिबात गरज नाही...
अशा ठिकाणी हा लाखोंचा खर्च अनाठायी आहे....
किल्ले चंद्राई (चांदवड): सिमेंटच्या पायर्‍या
किल्ले रामसेज: सिमेंटच्या पायर्‍या
किल्ले रामसेज
नाशिकमध्ये दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या किल्ले रामसेजवर पर्यटन केंद्र उभारण्याची घोषणा पालकमंत्री, जि्ल्हाधिकार्‍यांनी केली आहे. त्याचे `दृष्ट' परिणाम, रामसेजगडावर गेल्यास दिसू शकतील. चांदवडच्या चंद्राई किल्ल्यावर नुकतीच भेट देऊन आलो, तिथल्या पर्यंटन विकासाची झलक मी सचित्र पेश करणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक शिलालेख व भरपूर प्रमाणावर जुने बांधकाम शिल्लक असलेल्या मालेगाव जवळच्या गाळणा किल्ल्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचे घाटत आहे. दुर्गम मार्कंडेय पर्वतावर पर्यटन विकास करण्याची मागणी समोर आली आहे. शिवाजी महाराजांनी महिनाभर वास्तव्य केलेला पट्टा, अर्थात विश्रामगड, प्राचिन इतिहासाचा अमुल्य ठेवा जोपासणारा किल्ले हरिश्चंद्रगड आदी ठिकाणी पर्यटक केंद्र साकारण्याच्या बातम्या वाचण्‌यात आल्या आहेत.
प्रदक्षिणा
अती प्राचीन अशा प्रदक्षिणा मार्गाची अवस्था यंदा बघायला मिळाली. एखाद्या हार्ट पेशंटला सुद्धा आता फेरी मारता येऊ शकते. आपल्या एसी कारमध्ये ड्राईव्हरला गाडी सुरू करायला सांगायची, पायी ठेचकाळत चालणार्‍यांना टाटा करत अगदी आरामात प्रदक्षिणा पूर्ण करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे.

आपण अगोदर पर्यटन हा शब्द जाणून घेऊ या...
दैनंदिन कामकाज करणारे व्यवसायिक, नोकरदार, गृहिणी किंवा वर्षभर अभ्यास करणारे विद्यार्थी, खेळाडू यांना हवापालट करण्याची गरज भासते. कुठेतरी लांबवर जाऊन यावे. तिथली प्रेक्षणीय स्थळे बघावीत. तिथल्या भोजनाचा आस्वाद घ्यावा. जमल्यास काही शॉपिंग करावे, थोडा किंवा भरपूर आराम करावा या दृष्टीने पर्यटनाला जातात. (सद्या धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, व्यावसायानिमीत्त केले जाणारे पर्यटन बघायला मिळते.)
आरामाची गरज

पर्यटकाला मुळात आरामाची गरज असते. कुटुंब कबिला घेऊन किंवा मित्र, सहकारी सोबत घेऊन तो बापुडा जीव कामाचा ताण हलका करण्याकरिता कुठे तरी जात असतो. त्याला मानसिक विश्रांती हवी असते, व शरीराला सुद्धा फार श्रम देण्याची तयारी नसते. व्यावसायिक हंगाम संपल्यानंतर, संशोधन पुर्ण केल्यानंतर किंवा एखादा मोठा कार्यक्रम पार पाडल्यानंतर सुद्धा लोक पर्यटनाला जातात. मोठ्या निवडणूकीनंतर सुद्धा अशीच सुट्टी घालविली जाते. त्यात उमेदवार, त्याचे पाठीराखे, कार्यकर्त्यांचा समावेश होतो.

...तर अशा पर्यटनासाठी आपल्या आजुबाजुच्या परिसरात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. जगभरात तुम्ही पर्यटनाला कोठेही जाऊन येऊ शकतात, तुमच्या क्षमते प्रमाणे तुम्हाला अमर्याद पर्यटनाची संधी आहे. स्वत:च्या वाहनाने असेल किंवा एखाद्या टूर ऑफरेटरच्या मार्फत लोक सर्वदूर फिरून येतात.

आपल्याकडे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास नावाचे शासकीय महामंडळ आहे. प्रत्येक ठिकाणी या मंडळाचा व्याप आहे. अधिकारी, नोकरचाकर, कार्यालये, निवास संकुल, भोजनगृह असा सर्व व्याप सांभाळून आहे. लोकप्रिय ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक ठिकाणी पर्यटन विभागाने लोकांकरिता स्थल दर्शन, निवास, भोजन व प्रावासाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.  बुकिंगच्याही सुविधा आहेत. आपल्याकडे ना पर्यटन स्थळांची कमी आहे, ना पर्यटकांची.

पर्यटनाचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की, एखाद्याने महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फिरण्‌याचे उद्दीष्ट ठेवले तरी त्याला दहा-पंधरा वर्षे सुद्धा पूरणार नाहीत.  असे असताना त्यात आता वनविभाग व स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालये उडी घेऊ पाहत आहेत. पर्यटकांकडून तिकीट रूपाने काही रक्कम वसूल करायची. लोकांना आकर्षित करायचे व भरपूर उत्पन्न मिळवायचे असा त्या मागचा दृष्टीकोण! इतके दिवस जमिनीवरच्या स्थळांना प्राधान्य देणार्‍या पर्यटन विकास मंडळाने आपला मोर्चा आता डोंगरांवरील, दूर्गम ठिकाणांकडे वळविला आहे. म्हणे महाराष्ट्रातल्या दिडशे किल्ल्यांचा विकास करणार.
सिमेन्टच्या पायर्‍या
रामसेज किल्ला, हजार फुट उंचीचा असेल. त्यावर सिमेन्टच्या पायर्‍या तयार करण्यात आल्या. सौर उर्जेवर चालणारे दिले रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात आले. या गडाचा इतिहास दैदिप्यमान आहे. मराठ्यांनी मोगली फौजांना चांगले तीन वर्ष जेरीस आणले, पण त्यांना गड काही घेता आला नाही. २५,००० (पंचवीस हजार)ची फौज जेरीस आली, शेवटी त्यांना नाद सोडावा लागला. औरंगजेब कमालीचा चढफडत राहिला. शौर्याचे प्रतिक असलेल्या रामसेजवर रात्रीच्या वेळी कोण फिरायला जाणार. पण जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रमाणात लाईट लाऊन ठेवले. रात्रीच्या वेळी कुठली माणसे या सहज सोप्या गडावर जातील. तिथे पार्ट्याच होणार, दुसरे काही नाही.

डोंगरांवरच्या अशा पर्यटन स्थळांचा रखरखाव काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी  मोठा कर्मचारी वर्ग लागणार. त्यांचे पगार-पाणी, वीज-पाण्याचा खर्च करायचे म्हंटले तर, सरकारला त्यापोटी फार उत्पन्न सुद्धा मिळणार नाही.
कैक किलो मिटर लांबीचे रेलींग
मला वाटतं, ज्याठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर पुरातत्वीय महत्वाचे अवशेष नाहीत, अशा ठिकाणी कैक किलो मिटर्सचे रेलिंग बसविणे. गडावर जाण्यासाठी अफाट खर्च करून मोटरगाडीचा पक्का रस्ता तयार करणे हे वायफळपणाचेच नव्हे, तर मुर्ख पणाचे लक्षण आहे...पण अधिकारी काही मुर्ख नाहीत, तेव्हा त्यांना त्यातून भरपूर कमाई मिळत असल्यामुळेच हा अनाठायी खर्च करण्यात आला आहे.
चांदवडच्या एतिहासीक किल्ल्याच्या पायथ्याला ५०० फुट उंचीवर
 असलेल्या या कड्यावर इतके भव्य पाईपचे रेलिंग कशासाठी 
लावण्यात आले...त्याठिकाणी सप्तश्रृंगी गडासारखी किंवा 
मांढरादेवी सारखी मोठी गर्दी कधी उसळत नसते...मग 
येथे कोणाचे नियंत्रण करणार?

चांदवाडच्या चंद्राई किल्ल्यावर कैक किलो मिटर लांबीचे रेलींग बसविण्यात आले आहे. जणू  लाखोंच्या संख्येने जनता गडावर जाणार व रेटारेटी करून डोंगरावरून खाली कोसळणार? मला वाटतं, ज्याठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर पुरातत्वीय महत्वाचे अवशेष नाहीत, अशा ठिकाणी कैक किलो मिटर्सचे रेलिंग बसविणे. गडावर जाण्यासाठी अफाट खर्च करून मोटरगाडीचा पक्का रस्ता तयार करणे हे वायफळपणाचेच नव्हे, तर मुर्ख पणाचे लक्षण आहे...पण अधिकारी काही मुर्ख नाहीत, तेव्हा त्यांना त्यातून भरपूर कमाई मिळत असल्यामुळेच हा अनाठायी खर्च करण्यात आला आहे.

गडावरच्या महानिर्वाणी आखाड्याला त्यानिमीत्ताने लॉटरी लागली म्हणायची. आता त्यांनी तिथे मोठ मोठे सभामंडप थाटले आहेत. एक गोष्ट पक्की ध्यानात घ्यावी, की या ठिकाणी सिमेंट ओतणे सोपे आहे. पण पाऊस, वारा व प्रखर ऊन्ह पाहता, आजकालची बांधकामे फार तग  धरणार नाहीत. खुप जास्त पुरातत्वीय अवशेष नसल्याने दूरदेशीच्या पर्यटकांची येथे झुंबड उडणार नाही, हे नक्कीच. त्यामुळे स्थल दर्शनातून सरकारला फार तुटपुंजे उत्पन्न मिळू शकेल.

महाराष्ट्रात आणखी दिडशे किल्ल्यांचा अशा प्रकारे जिर्णोद्धार केला जाणार आहे. त्याठिकाणच्या पुरातत्वीय अवशेषांची देखभाल करा. ढासळलेरे दगडी बुरूज, पायर्‍या. भिंती, मंदिरांची डागडूजी करा हवे तर, पण तिथे सिमेंटच्या पायर्‍या व लाईट आणने अप्रस्तुत आहे. त्याचा उपयोग मद्य प्रासनासाठीच अधिक होईल. नाहीतरी दुर्ग अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, संशोधक हे दिवसा उजेडातच आपले निरीक्षण करतात. रात्री हवं, तर मुक्काम सुद्धा करतात, पण त्यासाठी इतका खर्च करण्याची गरज नाही. कारण तळमणीचे अभ्यासक, असोत, जिज्ञासू असोत, की भाविक, त्यांना स्थळ भेटीत जास्त रस असतो. तिथल्या सुखसोयीत नाही.
वाईट प्रवृत्तीचाच शिरकाव
पुरातत्वीय अवशेषांची देखभाल करा. ढासळलेरे दगडी बुरूज, पायर्‍या. भिंती, मंदिरांची डागडूजी करा हवे तर, पण तिथे सिमेंटच्या पायर्‍या व लाईट आणने अप्रस्तुत आहे. त्याचा उपयोग मद्य प्रासनासाठीच अधिक होईल. नाहीतरी दुर्ग अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, संशोधक हे दिवसा उजेडातच आपले निरीक्षण करतात. रात्री हवं, तर मुक्काम सुद्धा करतात, पण त्यासाठी इतका खर्च करण्याची गरज नाही. कारण तळमणीचे अभ्यासक, असोत, जिज्ञासू असोत, की भाविक, त्यांना स्थळ भेटीत जास्त रस असतो. तिथल्या सुखसोयीत नाही.
बांधकामे करण्यात चपळाई...परंतू इतिहासेचे मुकसाक्षादार
असे इस्तत: विखुरलेले असतात...परंतू या अधिकार्‍यांना
जाब विचारणारे कोणी नाही...ज्यांनी नियंत्रण ठेवावे,
ते वरिष्ठ मुग गिळून गप्प बसतात...का? तर त्यांचे
हित टक्केवारीत जास्त असते!
आपल्या पूर्वजांनी दुर्गम ठिकाणी धार्मिक व ऐतिहासिक महत्वाच्या गोष्टी अफाट कष्ट करून उभ्या केल्या, त्यालोकांनी आपल्या पायावर त्याठिकाणी यावे याकरिता. त्यांच्या आरामासाठी नव्हे. लोकांनी आपल्या पायांचा वापर करावा. शुद्ध हवा घ्यावी. झर्‍यांचे स्वच्छ पाणी प्यावे. प्राणी-पक्षांचे निरीक्षण करावे, हा मुळ उद्देश. सिमेंटच्या पावर्‍यांमुळे खरे भाविक, खरे अभ्यासक दूर राहतील. वाईट प्रवृत्तीचाच जास्त शिरकाव होईल. मग गडांवरचे पाण्याचे साठी दुषित व्हायला वेळ लागणार नाही. याचा त्रास तिथल्या प्राणी जीवनाला तर होईलच, शिवाय निकोप आयुष्य जगणार्‍या स्थानिक रहिवाशांना सुद्धा होईल.  

Saturday, January 7, 2012

संत्या गेला...हास्य तरी टिकवू!

Hereafter the PIMPAL PAR
of NEHRU CHOWK will feel
the void of our near and dear
friend in photographer V.Santosh


गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा सोमवारपेठ परिसर अक्षरश: सुन्न झाला आहे...गणेशवाडी भागातील जनताही एका धक्क्यातून बाहेर पडलेली नाही...संत्या गेला...व्ही.सोतोष - फोटोग्राफर आपल्यात नाही...तो निघालाय अनंताच्या प्रवासाला...आम्हा सगळ्यांना सोडून...

त्या नव्या प्रवासात तो काय अनूभवत असेल...साल्याची तिथेही चांगली मजा असेल...आम्ही मात्र या रहाट गाड्यातल्या चाकाभोवती घुटमळत राहणार...अजुन काही काळ तरी...तसा तो इथे सुद्धा हसतमुखच जगला...

त्याचं दोन ओठ जुळवून ते पसरवत नेणारं हास्य म्हणजे एक ट्रेड मार्कच..
अगोदरच पसरट मिशी...त्यात ते हास्य भारी खुलायचं...पठ्ठ्याला कोणतं बाळकडू मिळालं होतं कुणास ठाऊक...समोर आल्या आल्या त्याच्या ट्रेडमार्क हास्याची झलक मिळायचीच...असं कुणी सांगावं की, संत्या आज समोर आला...पण आपलं ट्रेडमार्क पसरट हास्य त्याने दाखविले नाही...

संत्याचा मित्रपरिवार म्हणजे काही फार मोठा पसारा नव्हता...बहुतांशी परिसरातलेच...नेहरू चौकात निरंतरांच्या ओट्यावर आआल्यावाचून त्यांचा दिवस सरत नाही अशांपैकी संत्याही होता...माझ्या घराला खेटून निरंतरांचा वाडा असल्याने त्याचे ते पसरट हास्य मी अगणितवेळा अनुभवले आहे...


दिवाळीत माझ्या वर्कशॉपवर
दिवाळीत माझ्या वर्कशॉपवर अचानक तो सायंकाळच्या वेळेला आला होता...माझ्याशी कधी कधी फोटोग्राफीबद्दल थोडंफार बोलायचा...पण त्याने माझ्या आकाशकंदिल बनविण्याच्या छंदाचे त्यावेळी तोंडभरून कौतुक केले होते...मी मात्र का...कुणास ठाऊक त्याच्याशी आरोग्य विषयावर बोलण्यावरच भर दिला...

‘पुण्यात माझी एन्जियोग्राफी करून आलोय‘ हे सांगितले तेव्हा...तुला काय गरज...तु तर भला तंदुरूस्त दिसतोस...डॉक्टर मंडळी काहीही सल्ला देतात असं काहबाही बोलला...घरचं खावं...मुला-बाळांसोबत, कुटुंबासोबत थोडे सुखाचे क्षण घालवावे...हसत रहावे....थोडं फार जॉगिंग सकाळी करावं...आहारावर नियंत्रण ठेवावं...अशी थियरी त्याने त्यावेळी बोलून दाखविल्याचे मला चांगले स्मरते.

वीस बावीस वर्षे नाशिकच्या मेनस्ट्रीम पत्रकारितेत, त्यात बारा, पंधरा वर्षे क्रीडापत्रकारिता केल्यामुळे आणि शालेय वयापासूनच विविध खेळ खेळण्याचा, ते बघण्याचा, त्यावर लिखाण-डॉक्युमेन्ट्रीज करण्याचा आणि ओघाने क्रीडाक्षेत्रातील असंख्य  व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे माझ्यावर फिटनेस, आरोग्य, आहारशास्त्र या सारख्या गोष्टींचे संस्कार घडलेत...याचा अर्थ मी फुलप्रुफ तंदुरूस्त आहे...दुडूदूडू पळत असतो असे नाही...पण तरीही एखादा हसतमुख, पापभिरू माणूस आपल्या मित्रांना न सांगता असा पुढे निघून जाणे म्हणजे कसा चटका लावते याची अनुभूती सोमवारपेठ, गणेशवाडी भागात अनेक जण अनुभवत आहेत.

...चहा घेतल्यानंतर पाणी
आपल्या माहितीचा इतरांना किती उपयोग होतो...मोठी मेणसे तर परंपराच कथन करत असतात...आणि आपली परंपरा जगात थोर...तरीही आम्ही ती का अव्हेरतो...चहा घेतल्यानंतर पाणी पित जाऊ नको म्हंटले तर आम्हाला पाणी पिण्याचा अधिकच चेव येतो...दोन आहारात पुरेसे अंतर असावे...पोट पुर्ण भरू नये...जेवताना व जेवल्यानंतर फार पाणी घेऊ नये...अंबट...गोड पदार्थांची मात्रा नियंत्रीत असावी...कडू...तुरट प्रकारांचे सेवन आवर्जुन करावे...संद्याकाळीच जेऊन घ्यावे...उशिरा जेऊ नये...न्याहारी नियमीत घ्यावी...अशा किती तरी गोष्टींचे अमुल्य सल्ले म्हणजे तर आमच्या कानावरून वार्‍या  प्रमाणे निघुन जातात...

आपल्या पूर्वजांनी दिलेली संशोधन व अनुभवाची शिदोरी  आम्ही अशी वाया घालवतो....बनतो फक्त चवीचे गुलाम...त्यामुळे ज्या चविने बटाटेवडे चघळतो...ती मजा आम्ही आईने बनविलेली कारल्याची भाजी खाताना घेऊ शकत नाही...आमच्या शरीरात पिष्टमय पदार्थांची भरपूर मात्रा जात असते...त्या तुलनेत प्रथिने...उपयुक्त आम्ल व इतर घटकांचे संतुलन राखण्याचा जाणिवपूर्वक विचार आम्ही कुठे करतो...आम्ही तर चविचे गुलाम....

...वकिलवाडीत काल गप्पांचा फड
ज्या दुधातुन मानवी शरीराला फार काही मिळत नाही ते आम्ही चांगले चाळीस रूपये लिटर दर मोजुनही आणतो...त्या चाळीस रूपयात किती भाज्या येतील...पण भाज्या म्हणून किती प्रमाणावर शरीरात जातात...खरे तर दुधाच्या...तेला-तुपाच्या रकमेत आम्हाला प्रथिने मिळविण्याचे स्वस्तातले कितीतरी स्त्रोत आहेत...सोयाबिन...मोड आलेली कडधान्ये...राजमा...चणे...हिरव्या भाज्या...असे कितीतरी स्वस्त पदार्थ...पण आम्हाला हवी असते चव...आम्ही तर चविचे गुलाम...वकिलवाडीत काल गप्पांचा फड रंगला तेव्हा फाळके फिल्म सोसायटीच्या फडक्यांनी अरब अमिरातीत त्यांच्यावर (किंवा त्यांच्या हृदयावर गुदरलेली आपबिती सांगितले...त्यानंतर अन्नपदार्थांबद्दल त्यांनी कसा दृष्टीकोण बदलला...बारा-पंधरा वर्षांपूर्वी ऍन्जियोप्लास्टी पश्‍चात राहणीमानात कसे बदल केले हे कथन केले...अर्थात कारण होता संत्याच...

भारतीय मंडळींनी मोठ्या प्रमाणावर आपल्या पारंपारीक आहारपद्धतीला सोडचिठ्ठी दिली...पण खरे तर प्रत्येक ऋतुता...सणासुदिला घरात केल्या जाणार्‍या पदार्थांचे महत्व अनन्यसाधारण....आम्ही फक्त म्हणतो की आमचा आहार जगात श्रेष्ठ...पण खरा भारतीय आहार हल्ली घेतं कोण...प्रथिने व इतर घटकांचे शरीरात संतुलन आहे की नाही याचा विचार करतं तरी कोण...हृदयक्रीयेला अडथळा असा सहजासहजी येत नाही...नव्वद...पंचाण्णव टक्क्यांच्यावरर अवरोध असल्याशिवाय मुख्य रक्तवाहिन्यातले प्रवाह असे सहजासहजी बंद पडत नाही...ऐंशी, नव्वद टक्के अवरोध निर्माण होण्याची वाट बघण्यापेक्षा आत्ताच तपासणी करून घ्यायला हवी...आहाराकडे चव म्हणून न बघता भोजनाकडे औषध म्हणून बघितले तर...आमचेही उरलेले दिवस सुखात कटतील नाही...पुढे संत्याच्या भेटीला जायचे आहेच...पण इथला मुक्काम असा अकाली आटोपायचा का?

Thursday, February 10, 2011

व्हॉली क्रॉसिंग...

आसू...आणि हासू...
Vihangam..... A group of trekkers
passing through the Talwade
Valley ... an angle from around
4000ft height from the Sea level ... 
कधी मित्रांसोबत, कधी परिवारासोबत, तर कधी विविध संस्थेच्या गटांसोबत सह्याद्रीतल्या डोंगरकपारी भटकण्याचा माझा छंद गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून अव्ह्यातपणे सुरू आहे. या चंदेरी कालखंडात निसर्गाची नानाविविध रूपे अनूभवायास मिळाली; त्यातलाच एक भन्नाट अनूभव रविवारी (ता. 3 फेब्रुवारी 2011) लाभला...पण हाय रे दुर्दैव...हा आनंद तरी किती क्षणभंगूर ठरला....त्याच या कटू-गोड आठवणी...(सविस्तरवाचा ब्लॉगवर)