Friday, October 23, 2026

ब्रम्हगिरीचे उत्कर्षायन

 

दिसते तर साधारणशी गडवाट, पण याला जलरंगाचे कसे काय जुळतात तत्व.

ओहळ भलेही वाळली असेल, प्रवाह भलेही थांबले असतील, पण या शिळेची रचना त्या श्वेत खळाळत्या प्रवाहाची आठवण करून देतातच, इथेही जलरंगाच्या चित्राचा स्पर्ष.

उन सावलीचा खेळ, भल्या सकाळी, दगडाच्या पायवाटेला समावट बांबूची कमान महिरफी..

या पार्‍या चढून गेलात की, माझा स्वर्ग महाल झोपडीतला प्रवेश घडतो