Saturday, September 21, 2019

AARE Kalwansathi kon re


आरे...कळवणसाठी कोण रे...
आरेच्या जंगलात जितकी झाडे मेट्रो रेल्वेच्या कारशेडकसाठी कापली जाणार आहेत तितकी झाडे एखाद्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कापली जाणार असतील तर? सद्या कळवण ते नांदूरी या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कित्येक मोठी झाडे कापली जात आहेत. ही संख्या शेकडोच्या घरात जाणार हे नक्की. 

साल्हेरच्या संग्रामात अतुलनिय शौर्य गाजविणार्‍या सरदार सूर्याजी काकडेंची काळाच्या उदरात हरवेली समाधी शोधून काढण्याचे मोलाचे कार्य दूर्गवीर प्रतिष्ठान, सटाणाच्या दूर्गप्रेमींनी अलिकडेच केले ते तिथल्या बागुल घराण्यातील काही जुन्या जाणत्यांकडून माहिती घेऊन. त्यांच्या समाधीचा परिसर स्वच्छ करण्याच्या उपक्रमाला हजेरी लावण्यासाठी साल्हेरला जात असताना नांदूरीवरून अभोण्याकडे न जाता आम्ही थोडी वाकडी वाट करत कळवणहून जाण्याचा निर्णय घेतला. हेतू हा की, प्रचूर मात्रेत पसरलेल्या कळवणच्या डोंगररांगांचे दुसर्‍या बाजूने दर्शन घेऊन एखादी नविन भटकंती आखावी. या प्रवासात काळीज पिळवटून टाकणारे दृष्य कळवण रस्त्याच्या दुतर्फ दृष्टीस पडले.
सुरूवातीला वाटले की, लाकूडतोड्यांनी झाडे तोडली असतील. नंतर समुळ कत्तल झालेली झाडांची मालिकाच सातमाळा रांगेशी स्पर्धा करताना दृष्टीस पडली. सह्याद्री भटकताना असे चित्र काही वेळा बघायला मिळते आणि मन सुन्न होऊन जाते.  आरेतल्या वृक्षतोडीला विरोध दर्शविण्यासाठी सद्या मोठी चळवळ उभी राहिली. तसे भाग्य दुर्गम भागातल्या वृक्षांच्या वाट्याला येताना दिसत नाही.

नाशिकवरून निघायला आम्हाला अंमळ उशिर झाला. साडे आठ वाजता प्रस्थान केले. मोटरसायकलीने एका बाजूने ९० किलो मिटर अंतर कापायचे. समाधीचा परिसर बघून जमल्यास स्वच्छतेत सहभाग घ्यायचा अणि साल्हेरच्या सर्वोच्च माथ्यावर जाऊन त्याच दिवशी परत यायचे म्हणजे दुसर्‍या दिवशी कामावर हजर रहता येईल. ही अकस्मात ठरलली योजना खाशी व्यस्त असल्यामुळे आणि भटकंतीचा तोच उद्देश असल्यामुळे कळवणच्या रस्ता रूंदीकरणात किती झाडे कापली गेलीत, किती कापली जाऊ शकतील याचा वेध घेता आला नाही. ती कामगिरी आता त्या भागातल्या वृक्षप्रेमींनी, पर्यावरणवाद्यांनी, गडकिल्ल्यांवर हरवत चालेल्या वनसंपदेबद्दल काळजी वाटणार्‍यांनी, त्यापरिसरातील नागरिकांनी या वृक्षतोडीचा वेध घेऊन पार पाडावी.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली इतकी मोठी झाडे कापली जाणार असतील तर, किती झाडे कापली, आणखी किती कापणार, एका मोठ्या झाडाच्या बदल्यात दहापट अधिक झाडे लावली जाणार का? कुठे लावणार? त्यांची किमान पाच वर्षे कोण देखभाल ठेवणार? त्यांचे संगोपन कशा प्रकारे केले जाणार? यावर देखरेख ठेवावी.

पश्चीम घाटाची क्षमता संपलीय
झाडे काय फक्त जंगलात आहेत? ती तर सगळीकडेच. ती अविरत कमी कमी करण्याचे काम माणूस, सरकार, खाण मालक, घाट विकासक, रस्ता ठेकेदार असे चहुबाजूंनी करत चाललेत तशी त्यांच्या आश्रयाने जगणारे जीव हद्दपार होत आहेत, कायमचे नाहीसे होत आहेत. ज्या सुखासाठी माणूस हे सगळे करत आहे, तो तर दरवर्षी वाढत जाणार्‍या संकटांना आमंत्रण देत आहे. पाऊस, पूर, दुष्काळ, नापिकी, पिकांवर वाढते रोग, भाज्या, फळे, धान्यांचा विषयूक्त दर्जा अशा दृष्टचक्रात तो, गाळात रूतावा तसा रूतत चालला आहे.

अर्थात झाडांवरचे हे संकट फक्त कळवणच्या रस्त्यांपूरते नाही, जिथे जिथे रस्त्यांची कामे सुरू आहेत तिथे तिथे हेच चित्र. एक रस्ता आरेत मेट्रो कारशेडसाठी कापल्या जाणार्‍या झाडांइतकेच या एक एका रस्त्यांसाठी झाडांची आहूती घेत असावा.

भरमसाठी लोकसंख्यावाढ आणि वाहतूक वर्दीळीत कमालीची वाढ झाल्यामुळे, 'पाण्याच्या योजना' आणि 'रस्ते विकास' ही काळाची गरज आहे! असे मानणारा मोठा वर्ग हे समजून घ्यायला तयार नाही की, आपल्याकडे आपण या दोन्ही क्षेत्रात विकासाची, बांधकामाची कमाल पातळी गाठली आहे. म्हणाल तर त्याची छोटीशी चुणूक यंदा कोल्हापूर, सांगली, सातार्‍याच्या पुराने दाखवून दिली.

पश्चिम घाटात रस्ते विकासाची कमाल पातळी गाठली गेली आहे. हे रस्ते पर्यावरणस्नेही नाहीत. त्यामुळे मोठा पाऊस झाला की, हेच रस्ते धरणाच्या भिंतीसारखे काम करतात. महामार्गाच्या रस्त्यांचा विचार केला तर ती कैक किलोमिटर लांब पसरलेली भिंत तयार होतो. त्याखालून पाणी पलिकडे वाहून जाण्याचा व प्राण्यांच्या निष्कासन मार्गांचा कोणताच अभ्यास न झाल्याने आधुनिक अभियंत्यांनी जीवनवाहिनी रस्त्यातून मरणवाहिन्या बनवल्यात.
काय बिघडले असते जर रस्ते बांधताना त्याच्याखालून पाण्याच्या निष्काशनासाठी व प्राण्यांच्या निष्कासनासाठी योग्य अंतराने मोठे व मोठ्या संख्येने निष्काषन मार्ग (under passes) तयार केले असते. आपण पैसा वाचविताना निसर्ग आपल्याला एक दिवस धडा शिकवेल याचा कोणताच विचार केला नाही. इथे सगळा विचार माणून नावाच्या प्राण्याचा. तो तर इतर सर्व प्राण्यांपेक्षा स्वत:ला वेगळा समजू लागला आहे. सामना १ विरुद्ध ९९ आसा कमालीचा विषयम. तरीही हा एक सगळ्यांना भारी ठरू पाहत आहे तो एक टक्का!

कमाल पातळी पाणी योजनांची
घाट, रस्ते, महामार्ग, शहरे नी गावातले रस्ते हे मृत्यूचे सापळे बनल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. तीच गत पाणी योजनांची. औरंगाबादेत नुकतीच मराठवाडा पाणी परिषद झाली, त्यात भारतातील नदीजोड प्रकल्पाचा पहिला प्रयोग राबविणारे माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांनी त्यांची निरिक्षणे नोंदविली, महाराष्ट्राने पाणी योजना राबविण्याचे शिखर गाठले गेले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी अडीचशे योजना. यातील कित्येक योजना या पावसाअभावी कारड्या. त्याने माणसाची पाण्याची गरज भागू शकत नाही की, दुष्काळ संपु शकत नाही. नव्या योजनांसाठी पैसा नाही. जमिनही नाही.

झाडांमुळे फक्त शुद्ध हवा मिळते? पाने, फळे, फुळे मिळतात? त्यावर फक्त पक्षीजीवन? लहान मोठ्या जिवांची ती आश्रयस्थाने? वृक्ष, वेली, झुडपे जमिनीत पाणी मुरविण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. बाबांनो भरमसाठ विंधन विहीरीतून (borewells) अविरतपणे पाण्याचा उपसा सरू आहे. माणूस आपल्या गरजा भागविण्यासाठी जितके पाणी उपसतो, त्याच्या फक्त ७ टक्के पाणी जमिनीत पुनर्भरण केले जात आहे. पृथ्वीतलावरचे एकुण एक जीव हे सृष्टीचक्राचा भाग बनून जमिन सुपिक बनविण्यात, झाडे, वेलींना व एकमेकांचे अन्न निर्माण करण्याचे काम करतात तद्वताच ते जमिनीत पाणी मुरविण्यासाठी त्यांच्या नित्यकर्मातून सहाय्य करतात.
प्राणी, पक्षांच्या मलमुत्रांतून जमिनीत सुक्ष्म जीव, काही माठे किडे निर्माण होतात, त्यांच्या नित्य जगण्यातून जमिन भूसभूशीत बनते व ती पाणी मुरविण्याचे काम करते. आपल्याला फक्त गांडूळ ठाऊक आहे. तो जमिन सुपिक बनविणारे आणि कैक मिटर खोलवर खड्डे खणून पाणी मुरविणारा सगळ्यात बादशाह जीव. पण त्याच्यापेक्षा कमी अधिक सहाय्यभूत हे सगळेच जीव ठरतात. वाघ, सिंह, हत्ती आदी मोठे जीव तर ठरतात, पण डोळ्यांना न दिसणारे जीव सुद्धा जमिनीत पाणी मुरविण्याच्या प्रक्रियेला सहाय्यभूत ठरतात. चोविस तासांच्या सरासरी पावसात एक दहा वर्षांन अधिक जुने झाड एक पाण्याच्या टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरविण्याचे काम करते, असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

हे तत्थ्य यापूर्वीच सांगितले गेले आहे की, पृथ्वी ७१ टक्के पाण्याने वेढली आहे, त्यामुळे सरासरी ७१ टक्के पाऊस हा समुद्रात पडतो. जमिनीवर तीसच टक्के पाऊस पडू शकतो. त्यातील ९६.५ टक्के पाणी हे समुद्र व महासागरात समाविष्ट आहे. १.७ टक्के भूगर्भात तर १.७ टक्के बर्फरूपात गोठलेल्या अवस्थेत आहे. सजिवांकरिता उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी १ टक्का पाणी हे नद्या, नाले, धरण, बंधारे, तलाव आदीयंच्या माध्यमातून उपरलब्ध आहेत तर ३० टक्के पाणी हे भूगर्मात.

गेल्या पन्नास शंभर वर्षात माणसाने यातीले १ टक्का पाणी मिळविण्यासाठी अब्जावर्धी, खर्वावधी रकमा खर्च केल्या. विंधन विहीरी आणि अत्याधुनिक पंप बसवून भुगर्मातून बेसुमार उपसा केला, पण पूनर्भरण मात्र ७ टक्के इतके घटत गेले. त्यामुळे जमिनीखालचे जलस्तर हे धोकादायकरित्या खालावले आहे. ते वाढविण्याची प्रक्रीया आज या घडीला सुरू केली तर त्याला पुढच्या चाळीस पन्नास वर्षांचा काळ लागणार आहे. काही वेळेला पाऊस झाला नाही तरी भूगर्भातले हे पाणी माणसासाठी उपकारक ठरायचे ते विहीरींच्या माध्यमातून. आता ती सोयच माणसाने स्वत:च्या हातून बिघडवून टाकली आहे.
माणसाने घरांचे पाणी जमिनीत पुनर्भरण केले तर ते फायद्याचे आहे. पण त्याही पेक्षा जास्त उपयूक्त आहे ते जमिनीत पाणी मुरविणारे कारखाने. अगदी फुकट काम करणारे. जंगलातली किंवा शेतातली एक ग्रॅम सजिव माती घेतली तर त्यात ३३ कोटी सुक्ष्मजिवाणू असतात. ते जशी जमिन भूसभूशीत व सुपिक बनवतात त्याच सोबत पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या चक्राचा भाग बनते.
जोवर जमिनीवर पाला, पोचोळा रूपी कर्बाचे आच्छादन होते तोवर पाणी मुरविणारे हे कारखाने अविरतपणे काम करत होते. आता जंगले कमी झालीत. गवतीमाळ घटले. इतकेच काय डोंगरमाथ्यावरचे सगळेच्या सगळे गवत कसे कापून नेता येईल किंवा चराई करता येईल याकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी आमच्या आठ दिवसांच्या सातमाळा डोंगरयात्रेत हे चित्र जवळून बघायला मिळाले.

झाडे तोडू नकाच. डोंगर व त्या परिसलातली वृक्षसंपदा म्हणनू खालच्या वाडी, वस्त्यांकरिता जमिनीत पाणी मुरविणारी अनन्यसाधारण महत्व असलेली ही नैसर्गिक यंत्रणा आहे. सह्याद्रीत बहुतांशी डोंगर परिसरात ८० टक्क्यांच्या वर वृक्षतोड झाली आहे. सातमाळा डोंगर रांगेत हे प्रमाण भयावहरित्या मोठे आहे. झाडे म्हणजेच खरा विकास, झाडे म्हणजेच पाणी.

आरेचे जंगल वाचवा! कळवण रस्त्यावरची झाडे वाचवा! 
रस्त्यांचे जाळे कमी करा!
घाट रस्ते बांधणे थांबवा!
नव्याने खाणी बंद करा!
नदीतली वाळू उपसा पूर्णपणेबंद करा!
मोठ्या रस्त्यांच्या खालून पाणी व वन्यजिवांचे 
पुरेशा संख्येत नियमीत निष्काशसन मार्ग बनवा...


तोरणमाळ: वृक्षांचे नृशंस हत्याकांड करून थाटले जात आहेत घाटरस्ते आणि रिसोर्ट

कमळगड उन्हाळ्याच्या मध्याचा...जावळीचे जंगल अजूनही काही प्रमाणावर शाबूत

कमळगड: झाडांचा पाल पाचोळा...या खाली राबतात अगणीत पाणी मुरविणारे नैसर्गिक कारखाने

तांबोळ्यावरून दिसणार सेलबारी डोलबारी रांगेतले उजाड डोंगर

मार्कंडेय: डोंगरांच्या माथ्यावर वर्षभर पाणी मिळते...

तिवारी वस्ती, जावळ्या: डोंगरमाचीवर भरपूर वृक्षसंपदा टिकून...म्हणून टाक्यात पाणी

राजदेर: डोंगरांवर चर खोदून पाणी मुरविण्यापेक्षा झाडे वाढवून मुरविणे विनाखर्च व फायद्याचे

राजगड: दृष्ट न लागो...चंद्राला लाजविणारे चंद्रकोर टाके...महाराज _ /\ _

राजगड: बालेकिल्ल्यावर सुद्धा वर्षभराचा पाणीसाठा शक्य त्यावेळच्या अपार वृक्षसंपदेमुळे

फाशीचा डोंगर, नाशिक: वनखाते अशा चर खोदतात हे ठिक पण त्यावर भरपूर पैसा व श्रम खर्च होतात...त्याला खुप मर्यादाही!

ब्रम्हगिरी: ज्ञानदेवो म्हणे वृक्षही वृक्ष न होणें। असोनी नसणें सुमनीं जैसा।। 
सोनगीर: शिखरावरील भागाच चुना मातीच्या नळीतून पाणी नेण्याची पुरातन व्यवस्था


कात्रा खिंडीतले टाके

ममदापूर: मुलांना जलसंवर्धनाचे संस्कार...वृक्षरोपणाचे संस्कार देणे काळाची गरज

कात्रा: कळसुबाई हरिश्चंद्रगड परिसरातले वनक्षेत्र

कलाडगडाच्या पश्चिम बाजूस असलेली मुळा नदी


कोळेश्वर पठार: उन्हाळ्यात सुद्दा डोंगरावर पाणी वाहते ते भरपूर झाडीझाडोर्‍यामुळे



Wednesday, September 18, 2019

साल्हेर साल्हेर राहो


साल्हेरशी खरोखरच असे खेळले जाऊ नये. महाराष्ट्रातला हा सर्वात उंच किल्ला आहे. तिथला इतिहास अजोड आहे. तिथली जैवविविधता बेजोड आहे. विकासाचे भलतेच वारे त्याचा लौकिक धुलिस मिळवू शकते. येणार्‍या पिढ्यांसाठी याचा इतिहास आणि भूगोल शिल्लक तर ठेवाल! याचे भान नाही ठेवले तर महाराष्ट्राच्या इतिहासात हा मोठा आत्मघात ठरेल.
साल्हेर साल्हेर राहो
साल्हेरची जैवविविधता थक्क करणारी आहे. खरे तर सारा सह्यद्री जगातले जैवविविधतेचे अनोखे ठिकाण आहे. तिथल्या जैवविविधतेला मानवी विकासाची बाधा झाल्यामुळे ती कमालीची धोक्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दहा वर्षांपूर्वीच त्यास जैवविविधतेस सर्वाधिक धोका पोहोचलेल्या जगातील ६४ स्थळांपैकी ७वे सर्वात बाधित स्थळ म्हणून घोषित केले आहे. जगभरातील अभ्यासकांच्या ठायी सह्याद्रीतून अनेक जिव हद्दपार होत आहेत. वाघ, हत्ती सारखे मोठे जीव आता केवळ नावा पूरतेच उरले आहेत. सिंह, चिते नामशेष झाले आहेत. लहान जीवांची तर गणनाच नाही. असे असताना नुकतेच महाराष्ट्रातल्या शंभरएक किल्ल्यावर पर्यटनस्थळ उभारण्याचा मनोदय महाराष्ट्र सरकारने व्यक्त केले आहे. तिथे हॉटेल थाटणार. लग्न सोहळे रंगणार या बातम्या मन सुन्न करणार्‍या आहेत.


सद्या साल्हेरवर पावसाळी फुलांचा मेळा भरला आहे. संपुर्ण साल्हेर हा जांभळ्या गुलाबी, तेरड्याने सजला आहे. अक्षरश: लाखोंच्या संख्येने तेरडा फुलला आहे.  वरच्या टप्प्यात पिवळी फुले आहेत. गडमाथ्याच्या भोवती फिकट निळी रानफुले आहेत. तर रेणूका मातेच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुलाबी, पांढरी फुले फुलली आहेत.
कोणे एके काळी साल्हेरला घनदाट जंगल होते. ते आता पुर्णपणे नामशेष झाले आहे. याची सुरूवात केली ती इंग्रजांनी. तिवस हे जगाच्या पाठीवर साल्हेर परिसरातच आढळायचे. अतिशय टणक लाकुड देणार्‍या या झाडाची इंग्रजांनी रेल्वेचे स्लिपर्स बनविण्यासाठी तुफान कत्तल केली. परिसरातल्या लाकुडतोड्यांनी त्याची इतकी कत्तल केली की, अनमोल असा तिवस आता शोधायचे म्हटले तर दिसत नाही. मानवी वरवंट्यात फक्त तिवस सापडला नाही, बागलाणच्या या गौरवशाली जंगलाची इतकी अफाट प्रमाणावर तोड झाली की, सह्याद्रीतले सगळ्यात उंच डोंगर असूनही आज हा परिसर पावसाला पारखा झाला आहे. मोजक्याच भागात चांगला पाऊस होतो. आता उरली सुरली जैव संपन्नता सरकारच्या अशा प्रयत्नांनी नष्ट होणार हे सांगायला कोण्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.

साल्हेरचे दरवाजे शाबूत आहेत. जुन्या हिंदू राजांनी कातळात देखणे शिल्प कोरून हे दरवाजे बनवलेत. सुंदरशा गुहा खोदल्यात. गडाला देखण्या पायर्‍यांची गडाला वाट आहे. कित्येक तळी, टाकी आहेत. त्याचा इतिहास, त्यावरची पाने, फुल अशा पद्धतीनेसंवर्धन केले जाऊ शकतात की सार्‍या जगाला हेवा वाटावा. पुरातत्व विभागाने दोन वर्षांपूर्वीच शासनाला महाराष्ट्रातील १८ गडांची सूची संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पाठविली होती. प्राथमिक अधिसूचित साल्हेर, धोडप (नाशिक), पारगड, गगनगड, कलानंदीगड, पावनगड, सामानगड (कोल्हापूर) दातेगड, वर्धनगड, भूषणगड, वंदनगड (सातारा) यांचा समावेश प्रलंबित आहे तर, अंतिम अधिसूचनेसाठी हातगड (नाशिक), लळिंग (धुळे), खर्डा (अहमदनगर), निविती (सिंधुदुर्ग), कर्नाळा, खांदेरी (रायगड), मौजे साटवलीची गढी ( रत्नागिरी) प्रलंबित आहेत.
पावसाळ्याचे चार महिना साल्हेर त्याच्यावर पाय टिकू देत नाही इतका त्यावर पाऊस असतो. त्याच्या पुरातन पायवाटा कमालीच्या निसरड्या बनलेल्या असतात. महाराष्ट्र सरकारला त्यावर पर्यटनस्थळ उभारणे सर्वथैव गैरकायदा वगैरसोयीचे ठरेल.

साल्हेरवर रिसोर्ट, हॉटेल, विवाह कार्यालये थाटण्याचा विचार न केवळ मुर्खपणाचा तो मन सुन्न करणारा आहे. तिथे काहीच बदल करता येणार नाही. केवळ पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारके सूचित नाही म्हणून त्यावरच्या  अनमोल पुरातत्वीय अवशेषांकडे दुर्लक्ष करून सरकारला त्यावर कोणतेच बांधकाम करता येणार नाही. उलट ही सूची त्यांनी तातडीने मंजूर करावी याकरिता दुर्गप्रेमी व दुर्गसंवर्धन संस्थांनी आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ नेऊन सरकारला विनंती करावी.

साल्हेरवर रिसोर्ट, हॉटेल, विवाह कार्यालये थाटण्याचा विचार न केवळ मुर्खपणाचा तो मन सुन्न करणारा आहे. तिथे काहीच बदल करता येणार नाही. हजार कोटी रूपये खर्च केले तरी जुने वैभव वागवणारे बांधकाम पुन्हा निर्माण करता येणार नाही. मग त्यात गडाच्या सौंदर्याला, तिथल्या इतिहासाला बाधा आणील असे आजच्या पद्धतीचे काम करून कसे चालेल.
गडाची दगडीवाट नविन बांधकाम न करता दुरूस्त करावी. पायवाट ही दगड गोटे काढून थोडी स्वच्छ करावी. गडावरच्या गुहा, मंदिरे लेणी हे झाडलोट करून स्वच्छ करण्याची व्यस्था बसवावी. गडावर आजवर बसवलेले मार्गदर्शन फलक, दिशादर्शक बाण आदी काहीच टिकू शकले नाहीत इतके तिथले प्रतिकुल हवामान आहे. तेव्हा सरकार जो काही खर्च करणार तो वायाच जाणार आहे. शिवाय तिथे उंची राहणीमान असलेली मंडळी मोठ्या संख्येने येत नाही. येथे बहुतांशी लोक अंगापिंडाने मजबूत व मनाने सह्याद्रीमय असल्यामुळे ते सगळा कुटुंब कबिला घेऊन गड पायी चढतात व उतरतात. त्यांना ना दोरवाटेची गरज आहे ना पदपाथाची ना बांधिव पायर्‍यांची. राहण्यासाठी हॉटेलची आवश्यक्ता नाही, त्या ऐवजी गुहा, मदिरे स्वच्छ वा दूरूस्त करावीत.
सटाण्यातील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या प्रयत्नांनी सूर्याजी काकडेची नव्याने उजाडेत आलेली समाधी.
आधिनिक साहित्या त्यावर टिकत नाही म्हणून जुन्या पद्दतीने बांधकाम वा दुरूस्ती करावी. थोड्या खर्चात गड सावरावा. पायथ्याला वनखात्याने कित्येक छत्र्या उभ्या केल्या आहेत. त्याचा पर्यटक लाभ घेत नाहीत असे स्थानिकांचे म्हणने आहे. त्याही जिर्ण झाल्या आहेत. हा सगळा खर्च वायफळ ठरला आहे. आणखी काही कोटी ओतुन पैसा मातीमोल करण्यापेक्षा कित्येक पिढ्या इथला निसर्ग व इतिहास आठवणीत ठेवतील अशा प्रकारचा या गडाचा विकास व सुधारणा करावी.

स्थानिक लोकांतून गडाचा इतिहास व जैवविविधता याची माहिती देणारे गडमार्गदर्शक प्रशिक्षण देऊन तयार करावेत. स्थानिकांनाच जेवण नाष्ता आदी बनविण्याचे व ते स्वच्छ पणे सादर करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून द्यावा. मोठ्या हॉटेल चेनकडे किंवा केटररकडे गड देऊन काय उपयोगाचा. त्याने बाजारू पद्दतीच्या सोयी व सुविधा मिळतील. ज्या आज सर्वत्र मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. साल्हेरचा लाल तांदूळ हा सुद्धा याच परिसरात आढळतो. तो रासायनिक खते न वापरता पिकवण्यास प्रोत्साहन दिले तर जगाच्या पाठीवर त्याचा डंका वाजेल.
दुर्गवीरचे कार्यकर्ते समाधीस्थळाची स्वच्छता करताना.

साल्हेर संग्रामात शिवाजी महाराजांचा महत्वाचा सरदार सूर्याजी काकडे आहे पाच एक हजार मराठ्यांसह कामी आल्याचा गौरवशाली इतिहास आहे. सूर्याजीरावांची समाधी काळाच्या उदरात हरवली होती. आजवर तिसर्‍या दरवाजानंतर लागणार्‍या सपाटीवरची समाधी ही सूर्याजी काकडेंची समाधी म्हणून मानली जात होती. त्याबद्दल सबळ असे पूरावे नव्हते. सटाण्याच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने बागुल राजांच्या वंशजांशी संपर्क साधला. तिथल्या एका बुजुर्गाने सूर्याजी काकडेची समाधी कोणत्याठिकाणी होती याची माहिती दिली. त्यावरून शोध घेण्यात आला. रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी या समाधीची दुर्गवीर्‍या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
अनेक राजवटींचा या गडाला इतिहास लाभला आहे. इतिहास, पराणातील अनेक थोर मंडळींनी या गडाला भेटी दिल्याचे दाखले दिले जातात. त्यावर अभ्यास करून गडाच्या पायथ्याल दृकश्राव्य सादरीकरणाची व्यवस्था करता येऊ शकते. साल्हेर साल्हेरच राहू द्या. तो काही फक्त सर्वात उंच किल्ला नाही, महाराष्ट्राच्या इतिहासाचा, भुगोलाचा व जैवविविधतेचा तो मानबिंदू आहे.
गडनिवासिनी कालिकादेवी मंदिर परिसरात जुन्या तटबंदीलगतचा तळे

मातीत दबल्या गेलेल्या विशाल तटबंदीचे अवशेष.


दगडा जवळ सुद्धा हट्टाने उगवलेला तेरडा सर्वत्रच

तेरड्याच्या ताटव्यामागे लपलेला टकारा

पावसाळ्याचा जोम तेरडा


गडावरची प्रत्येक वाट मोहक फुलाच्या ताटव्यातून

टकार्‍यालगतचा हा कडा सूदूर तरड्याने बहरलेला

साल्हेरवाडीकडचे कडे हिरवे जांभळे बहरलेले

पहिला बुरूज साल्हेरवाडीच्या बाजूने त्याला घेराव तेरड्याचा

थोडा वेळ पांढरे ढग बाजूला होऊन स्वच्छ किरणांना वाट करून देताना

प्रत्यक्षात पहिला दरवाजा कोणी तरी कुंचल्यातून आज सजवला होता

पलिकडची कथा...पहिल्या दरवाजाच्या मागे असा स्वर्ग फुलला 

महादरवाजाचे छोटे देखणे प्रवेशद्वार

दुसर्‍या दरवाजावरचा मराठी शिलालेख

त्या शौर्याला हिरवाईची मानवंदना

फक्त आणि फक्त तेरड्यातून उलगडलेली वाट जणू टकार्‍याकडे घेऊन जातेय

आखीव नाही रेखीव नाही...इथे सगळेच मोठे कलात्मक

पाना फुलांचे साज गाठे स्वर्गाची वाट

जुनी कातळ वाट

कठिणतेची कसोटी शेवटच्या कातळद्वाराच्या उभ्या पायर्‍या

काही क्षण ढगाचा तलम पडदा सरला साल्हेरवाडीचे घ्या रम्य दर्शन

शेवटच्या दरवाजाची हिरवी छटा खास पावसाळी स्वागतासाठी 
कोणा तरी वीराने नक्कीच या दगडावर विश्राम केला असेल



काय ते वैभव...टोपली कारवीतून उलगडली वाट

टोपली कारवीच्या वाटेचा थाट

जेव्हा ही कारवी फुलेल तेव्हा.. 
यांचे कार्यक्षेत्र ठरलेले शेवटच्या दरवाजापासून माथ्यापर्यंत



शूर वीर साधूचरित वा वन्यजीवांचे पाणवठे

साल्हेरच्या गुहांच्या भेटीत लाभतात ढग सतत 
गुहेत दोनच स्तंभ एक सुंदर कोरी दुसरा साधा रूंद



कवीराज भुषणाची वंदना


साल्हेर संग्रामाचे रसदार वर्णन
यांचं ठरलय...ही निळसर फुले फक्त शेवटच्या दरवाजानंतरच दिसतात
कार्वी आणि गवताच्या मध्ये शिरकाव करून यांनी आपली जागा शोधलीय...



दभूत..अमूर्त मातीटाके फक्त मुक्या जीवांसाठीच!

गंगासागर तलावाच्या वरच्या टप्प्यातल्या डाव्या गुहेच्या दालनातला एकमात्र कोरीव खांब

गंगासागरच्या वरची गुहा उजवीकडे मारूतीची मुर्ती मध्यभागी आणि डावीकडे अशी तीन दालने

निळी पिवळी जुगंलबंदी


गंगासागर तलाव...चार महिने तो असाच ढग नी धुक्यात वेढलेला...

केवढी ही शांतता...यात रेणूगामातेची जुनी कातळकोरिव मुर्ती तर शेजारी गणपतीची मुर्ती
जुने वैभव संपलेय...आता झाडे झुडपे यास सजवताहेत...



रेणूका मंदिराच्या प्राकारात असे सुंदर नक्षिदार खांब

ही प्रजाती थोडी खास...मंदिर परिसरातच यांची आरास...

साल्हेर 'सर' केल्यावर अशी फुले दर्शनाने घालवी सारे श्रम...

सह्याद्रीत आम्ही सर्वत्र...येथू रेणूकाईच्या सेवेसी...

सजिव चित्र: ही रंगसंगती...काळ्या पाषाणावर...

यज्ञवेदी...पाषाणात...पुराणकाळाशी नाते जोडी

इथे साधे सरळ काहीच नाही...पाण्याचे टाकेही आकंठ सजलेले...
शिवश्क्तीला वंदावे...मग पाणी भरावे...उरकावी नित्य कर्मे



सवय, सराव असेल तरच: ओल्या निसरड्या पायर्‍यांमुळे..पावसाळ्यात साल्हेर धोकादायक

तिथे उन वारा पाऊस...त्यात काही टिकतच नाही...मग ही कशाची हौस!

लालसर छटा म्हणजे तेरड्याचे ताटवे... 
सूर्याजींची समाधी सापडली आहे...हे कोण वीर असतील ज्यांना मोठा मान दिला...



अनामवीरा तुझे नाव कळेल का कधी आम्हा...

जड यंत्र आलय...उरले सुरले जीव इथले पळवून तो लावणार

तट राखण्या जल हव...तेही सुंदर सजलेले... 
टोलेजंग किल्ल्याचे जलसाठेही सुंदरतम



काय सुंदर नियोजन...वर कडा सुंदर...खाली टाके अतीसुंदर


निसर्ग इतिहास प्रेमींनो तुमच्यासाठी जांभळ्या पायघड्या...

हिरवी जांभळी टवटवी...तसूभरही कमी पडणार नाही...याची दक्षता घेती ढग! 
यथेच्छ भोजन सुरू आहे...पर्यटक येण्यापूर्वी घ्या आटोपून



फुलांनी सजल्या वाटा...अवमानू नका त्या कधीच!

थांबा...पहा...येथून फक्त वन्यजीवांनाच वाटा...तुम्ही जा वळसा मारून!

कलती ताटवे हिरवी जांभळी त्यावर तलम ढगांची नक्षी

गाव घ्या पाहून शेवटचे इथून पुढे ढगात हरवत्या वाटा...

लाल फुलांची...हिरव्या मनांची...वाट वाकडी धरू नका


शोधतो मी स्वत:स...सह्यागिरीच्या स्वर्गात


मी साल्हेर बोलतोय..,

allowTransparency="true" allow="encrypted-media">